Tuesday, 3 January 2017

वेतन पडताळणी पथकाचा दौरा


            उस्मानाबाद,दि.3- लेखा व कोषागारे विभागाच्या मराठवाडा विभागाचे वेतनपडताळणी पथक दि.11 ते 13 जानेवारी  2017 या कालावधीत उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर  येत आहे. या दौऱ्यात हे पथक सेवापुस्तकांची  पडताळणी करणार आहे.

         दि.11 जानेवारी रोजी पोलीस अधीक्षक, उस्मानाबाद यांचे कार्यालय तर 12 ते 13 जानेवारी 201या कालावधीत जिल्हा/ तालुका स्तरावरील इतर कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तकांची पडताळणी करण्यात येणार आहे. सेवापुस्तके पडताळणीस सादर करताना पुढील एक वर्षात सेवानिवृत्त होणारी प्रकरणे, मयत, न्यायालयीन/ लोकायुक्त प्रकरणे प्राधान्याने सादर करावीत. संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांनी महाकोष मधील वेतनिका प्रमाणित डीडीओ लॉगीन करुन डिडिओ लॉगीन करण्यासाठी बीडीएससाठी वापरण्यात येत असलेले युजर आयडी व  पासवर्ड वापरावे. ज्या कर्मचाऱ्यांची सेवापुस्तके पडताळणीसाठी सादर करावयाची आहेत त्या कर्मचाऱ्यांचे सेवार्थ एम्प्लॉई आयडी टाकून दाखल  करावे, असे आवाहन सहसंचालक, लेखा  व कोषागारे, औरंगाबाद यांनी केले आहे.  ****