Monday, 2 January 2017

नाशिक येथील कारागृहातून उस्मानाबाद जिल्हयातील चार कैदी फरार


उस्मानाबाद,दि.2:- विविध गुन्ह्यात सिध्द झालेले जिल्हयातील चार कैदी नाशिक येथील नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह जेलरोड, नाशिक येथून संचित व अभिवचन रजेवरून फरार झाले आहेत.
 गणेश बबन सोलकर, वय-33 मु. राजापुरा गल्ली परंडा, दि.15 फेब्रूवारी 2009 पासून फरार आहे, विष्णू श्रीहरी क्षीरसागर वय-35 मु.पो. ईर्ला दि.24 जानेवारी 2011 पासून फरार आहे, रफीक उर्फ अहमद अरब वय 54 मु. पो. निजामोद्धीन जवळा, ता. परंडा हे दि. 15 फेब्रुवारी 2007 पासुन फरार आहे, तर तानाजी धर्मराज पाटील वय 38 मु.पो. दहिफळ ता. कळंब हे दि. 9 मे 2009 पासून फरार आहे. हे कैदी नाशिक येथील कारागृहातून संचित व अभिवचन रजेवरून फरार आहेत.  तरी  या कैद्यांबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास किंवा कैदी आढळल्यास त्वरीत संबंधित पोलीस स्टेशन दूरध्वनी क्रमांक – 0253-2465276 या क्रमांकावर नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह, अधीक्षक नाशिक यांच्याशी संपर्क साधावा. असे नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह, अधीक्षक यांनी कळविले आहे.

***