Tuesday, 3 January 2017

सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन


उस्मानाबाद,दि.3:- क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 186 व्या जयंतीनिमित्त  जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले.

           उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) सचिन बारवकर यांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी तहसिलदार (पुरवठा) राजकुमार माने, तहसिलदार (संगांयो) राहुल पाटील, नायब तहसिलदार (सा. प्र) ए.जे. पठाण, नायब तहसिलदार (आस्थापना) ए.पी. जाधव आदीसह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.