उस्मानाबाद
दि. 4:-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च 2017
मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (10 वी) परीक्षेला प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांची
आवेदनपत्रे दिनांक 4 नोव्हेबर ते 5
डिसेंबर 2016 पर्यंत नियमित शुल्कासह व दि. 6 ते 13 डिसेबर 2016 पासून रुपये
1000/- च्या जुन्या चलनी नोटा बंद झाल्याने विद्यार्थ्यांन शुल्क भरताना येणाऱ्या
अडचणी लक्षात घेता मुदतीत विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे ऑनलाईन भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावी व शुल्क भरण्याचा
कालावधी नंतर कळविण्यात येईल, असे संबंधितांना
यापूर्वी कळविण्यात आले होते.
त्यामुळे शाळेतील
विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क खाली नमूद केलेल्या पदध्तीनुसार भरण्याची कार्यवाही
करण्यात यावी.
सद्य:स्थितीत ज्या माध्यमिक शाळा परीक्षा शुल्क प्रचलित चलनासह रोखीने भरु शकत असतील त्यांनी
प्रचलित पदध्तीने बँकेत रोख रक्कम चलनाने भरावी व विद्यार्थ्यांची यादी संबंधित
विभागीय मंडळात जमा करावी.
ज्या शाळा प्रचलित चलनासह रोखीने रक्कम भरु शकत नसतील अशा
शाळांनी संबंधित विभागीय मंडळाचे सचिव यांच्या नावे धनाकर्ष काढून (डी.डी.) चलन व
धनाकर्ष, विद्यार्थ्यांची यादी संबंधित विभागीय मंडळ कार्यालयात जमा करावी. ज्या
शाळाना RTGS/ NEFT द्वारे रक्कम जमा करावयाची आहे त्यांनी संबंधित विभागीय मंडळाच्या
खात्यावर RTGS/ NEFT द्वारे रक्कम जमा करावी. तसा भरणा केल्यास चलनावर बँकेचा
(UTR) क्रमांक नमूद करुन चलनाची प्रत व
विद्यार्थ्यांची यादी संबंधित विभागीय मंडळात जमा करावी.
डी. डी., चलन व
विद्यार्थ्यांची यादी विभागीय कार्यालयात दिनांक
2 जानेवारी 2017 पासून स्विकारण्यात येईल, असे सचिव, राज्य मंडळ पुणे यांनी
कळविले आहे.
****