उस्मानाबाद,दि.5:- बळीराजा
चेतना अभियानांतर्गत कृषी विज्ञान केंद्र, तुळजापूर, कृषी विभाग व आत्मा,
उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने
जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या
अध्यक्षतेखाली कृषी विज्ञान केंद्र, तुळजापूर येथे दि.4 जानेवारी 2017 रोजी
कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमात दोन महिला कृषी गटांना मिनी डाळ
मिल, दहा गटांना स्पायरल सेपरेटर, दहा गटांना वॉटर व्हिल व पाच गटांना सोलर
ड्रायरचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा
अधीक्षक कृषी अधिकारी श्री. शिरीष जमदाडे,
आत्माचे प्रकल्प संचालक श्री. विजय हिरेमठ,सहयोगी प्राध्यापक,
अंबाजोगाई,डॉ. विलास टाकणखार,प्रकल्प उपसंचालक, आत्मा श्री. सुभाष चोले, आदींची
प्रमुख उपस्थितीत होती.
सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक शास्त्रज्ञ
(गृहविज्ञान) प्रा. वर्षा मरवाळीकर, यांनी केले. सूत्रसंचलन शास्त्रज्ञ(मृदविज्ञान)
डॉ. भगवान आरबाड,यांनी तरआभार प्रदर्शन शास्त्रज्ञ (उद्यानविद्या) प्रा. गणेश मंडलिक यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शास्त्रज्ञ (पशु विज्ञान) डॉ. अनिता जिंतूरकर,व शास्त्रज्ञ
(कृषीविद्या) प्रा. अपेक्षा कसबे यांनी परिश्रम घेतले.