Tuesday, 3 January 2017

“लोकराज्य” चे सामूहिक वाचन : जिल्ह्यातील अभिनव उपक्रम यशस्वीरित्या संपन्न जिल्ह्यातील सर्व 1 हजार 813 शैक्षणिक संस्थांमध्ये झाले वाचन







 उस्मानाबाद,दि.3:- जिल्हा प्रशासन , शिक्षण विभाग जिल्हा परिषद आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील  1 हजार 813 शैक्षणिक  संस्थांमध्ये शासनाचे मुखपत्र लोकराज्य चे सामूहिक वाचन हा  अनोखा उपक्रम  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त  आज सकाळी 11.00 वाजता जिल्ह्यात उत्स्फूर्तपणे राबविण्यात आला .
यावेळी  श्रीपतराव भोसले हायस्कूल आणि आर्य चाणक्य हायस्कूल येथे  उस्मानाबाद शहरातील मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .  याप्रसंगी  जिल्हा परिषदेचे  मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आनंद रायते यांनी  उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देवून  विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले . श्री. रायते म्हणाले की , लोकराज्य  हे मासिक भविष्यास दिशादर्शक आहे . लोकराज्य  चा  त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर  खरोखरीच  सकारात्मक परिणाम  झाला असल्याचे  सांगून  ते पुढे म्हणाले की ,  समाजातील  प्रत्येक  घटकाला लोकराज्य   मासिक उपयुक्त आहे . लोकराज्य   चे सर्वांनी वर्गणीदार व्हावे . त्याचबरोबर  प्रत्येक शाळेत, महाविद्यालयात रोजच्या रोज लोकराज्य चे  वाचन केले जाईल , अशी  सूचनाच  त्यांनी  शिक्षणाधिकारी  सचिन जगताप  यांना सर्व शैक्षणिक संस्थांना  करण्याबाबत केली.
यावेळी  शिक्षणाधिकारी (प्राथ) श्री. सचिन जगताप ,  जिल्हा माहिती अधिकारी श्री. मनोज शिवाजी सानप , उप शिक्षणाधिकारी श्रीमती  रोहिणी कुंभार , श्रीमती आशा बंडगर आदी उपस्थित होते .
शासनाचे मुखपत्र लोकराज्य च्या सामूहिक वाचनाबरोबरच  आज  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त  श्रीमती आशा बंडगर यांनी लिहिलेल्या  सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित नमन क्रांतीज्योतीला ! या लेखाचेही सामूहिक वाचन यावेळी करण्यात आले .
प्रास्ताविकामध्ये जिल्हा माहिती अधिकारी श्री. मनोज शिवाजी सानप म्हणाले की , सावित्रीबाई फुले ह्यांनी संपूर्ण स्त्री जीवनाला आकार देण्याचे ऐतिहासिक कार्य केले आहे , त्यामुळे  आजच्या स्त्रियांना उंच भरारी घेण्यासाठी त्यांच्या पंखामध्ये  बळ निर्माण झालेले आहे . त्याच बरोबरच  श्री. सानप  यांनी शासनाचे मुखपत्र लोकराज्य चे महत्व यावेळी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना सांगितले व  वर्गणीदार होण्याचे  आवाहनही केले . पुढील  एका आठवड्यात प्रत्येक शैक्षणिक संस्थेमधून लोकराज्य   सभासद नोंदणी  करण्यात येणार आहे .
या सामूहिक वाचनाच्या उपक्रमानंतर जिल्हा परिषदेच्या उमेद या स्पर्धा परीक्षा केद्रांतील विद्यार्थींनींकडून स्पर्धा परीक्षेचे महत्व पटवून सांगणारी एक नाटिकाही यावेळी आर्य चाणक्य हायस्कूलच्या प्रांगणात सादर करण्यात आली .
यावेळी श्रीपतराव भोसले हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. सुधीर पडवळ , शिक्षक श्री. कोळी ,  श्री. हजारे ,  श्री. घारगे व शिक्षकेतर कर्मचारी , आर्य चाणक्य शाळेचे प्रतिनिधी श्री. मिलिंद पाटील ,  श्री. शेषाद्री डांगे , मुख्याध्यापक श्री. मनीष देशपांडे , मुख्याध्यापिका श्रीमती सुलभा देशमाने ,  संगीत शिक्षिका  श्रीमती मीरा पवार ,  श्री. बाबासाहेब जगताप ,  श्री. प्रशांत जाधवर ,  श्री. उमाकांत कुलकर्णी , श्रीमती पाठक , उमेद चे समन्वयक श्री. घोलप आणि श्री. शेख आदी उपस्थित होते . ****