उस्मानाबाद,दि.6:-
जिल्हा माहिती कार्यालयात दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या
जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन
करुन अभिवादन करण्यात आले व दर्पण दिन साजरा करण्यात आला.
जिल्हा माहिती अधिकारी श्री. मनोज
शिवाजी सानप व कृषी विभागाचे प्रशासन अधिकारी श्री.जी.टी.गोरे यांच्या हस्ते
दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन
करण्यात आले. यावेळी कृषी विभागाचे
तांत्रिक अधिकारी श्री.सांगविकर, जिल्हा माहिती कार्यालयाच्या श्रीमती आशा बंडगर,
भिमा पडवळ, आश्रुबा सोनवणे, दिलीप वाठोरे, अनिल वाघमारे, शशिकांत पवार, चित्रा
घोडके, विलास माळी, पत्रकार आकाश नरोटे, महेबूब फकीर आदींची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती.