उस्मानाबाद,
दि.7:- दिनांक ६ जानेवारी १८३२ रोजी दर्पण या वृत्तपत्राची मुहूर्तमेढ बाळशास्त्री
जांभेकरांनी रोवली.मराठी पत्रकारितेचा पाया भक्कमपणे उभारण्यासाठी ज्यांनी मोलाचे
कार्य केले त्या दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांची आठवण म्हणून ६ जानेवारी हा दिवस
“पत्रकार दिन” म्हणून सर्वत्र साजरा केला जातो.
यानिमित्त जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने जिल्हयातील सर्व
पत्रकारांकरिता जिल्हा नियोजन सभागृह, मध्यवर्ती
प्रशासकीय इमारत येथे दि.10
जानेवारी 2017 रोजी सकाळी 11.00 वाजता एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
आहे.
या
कार्यक्रमादरम्यान जिल्हयातील प्रमुख शासकीय विभागांच्या विभागप्रमुखांचा व प्रसारमाध्यम
प्रतिनिधींचा सुसंवाद,पत्रकार बांधवांची आरोग्य तपासणी हे उपक्रम राबविले जाणार
आहे.
तरी
जिल्हयातील व तालुका स्तरावरील सर्व
पत्रकार बांधवांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आग्रहाचे निमंत्रण जिल्हा
माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी केले आहे.
***