Thursday, 5 January 2017

पत्रकार दिनानिमित्त जिल्हा प्रशासनाकडून आणि जिल्हा माहिती कार्यालयाकडून प्रसारमाध्यम प्रतिनिधींना शुभेच्छा !


उस्मानाबाद, दि.5:- दिनांक ६ जानेवारी १८३२ रोजी दर्पण या वृत्तपत्राची मुहूर्तमेढ बाळशास्त्री जांभेकरांनी रोवली.मराठी पत्रकारितेचा पाया भक्कमपणे उभारण्यासाठी ज्यांनी मोलाचे कार्य केले त्या दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांची आठवण म्हणून ६ जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून  सर्वत्र साजरा केला जातो. 

     या दिनानिमित्त  जिल्हयातील  सर्व  प्रसारमाध्यम  प्रतिनिधींना जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख तसेच जिल्हा माहिती अधिकारी मनोज  शिवाजी सानप आणि जिल्हयातील सर्व शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांकडून प्रसारमाध्यम प्रतिनिधी जिल्हयाच्या सर्वांगीण विकासाकरिता मोलाचे योगदान देत असून यापुढेही  हे  योगदान असेच उत्तरोत्तर वाढत जावो अशा शब्दात शुभेच्छा सर्व पत्रकार बांधवांसाठी व्यक्त करण्यात आल्या आहेत.