Monday, 2 January 2017

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त “लोकराज्य” चे सामूहिक वाचन



एकाच  दिवशी-एकाच वेळी अशा प्रकारच्या वाचनाचा  राज्यातील पहिला अनोखा उपक्रम

उस्मानाबाद,दि. 2:- जिल्हा प्रशासन , शिक्षण विभाग जिल्हा परिषद आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील  1 हजार 813 शैक्षणिक  संस्थांमध्ये शासनाचे मुखपत्र लोकराज्य चे सामूहिक वाचन हा उपक्रम  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 3 जानेवारी 2017 रोजी सकाळी 11.00 वाजता राबविण्याचे निश्चित करण्यात आले आहे .  
 “लोकराज्यया मासिकामधील शासकीय लेखांविषयीच्या माहितीचा विद्यार्थ्यांना भविष्यातील स्पर्धा परिक्षांसाठी निश्चित उपयोग होणार आहे. विद्यार्थी जीवनापासूनच  विद्यार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांची माहिती  या मासिकाच्या वाचणामुळे मिळणार आहे.  त्यामुळे लोकराज्यहे शासनाचे मुखपत्र सर्वांनीच वाचायला हवे. या मासिकाच्या माध्यमातून आपण आपल्या गाव विकासासाठी, स्वत:च्या विकासासाठी निश्चितच ज्ञान वाढवू शकतो.
संपूर्ण राज्यातील पहिले लोकराज्यग्राम, पहिली लोकराज्य वारकरी शिक्षण संस्था, पहिली लोकराज्य बहुउद्देशीय सामाजिक संस्था, आणि पहिली लोकराज्य महिला सामाजिक संस्था,मोबाईल रिपेअरिंग बॅच ,  कृषी विज्ञान  केंद्रातील  शेतकरी प्रशिक्षण वर्ग ,  व्यसनमुक्ती केंद्र , येरमाळ्याची  विद्यानिकेतन ही  राज्यातील  पहिली लोकराज्य शाळा  झाली ,   जीवन विमा कार्यालय ,   महिला ब्युटी पार्लर  प्रशिक्षण बॅच राज्यातील पहिले  लोकराज्य प्रशिक्षण बॅच  बनण्याचा बहुमान उस्मानाबाद जिल्हयाला मिळाला आहे
याच पार्श्वभूमीवर एकाच  दिवशी - एकाच वेळी अशा प्रकारच्या वाचनाचा  राज्यातील हा पहिलाच उपक्रम आहे .
या सामूहिक वाचनाच्या उपक्रमानंतर जिल्हा परिषदेच्या उमेद या स्पर्धा परीक्षा केद्रांतील विद्यार्थींनींकडून स्पर्धा परीक्षेचे महत्व पटवून सांगणारी एक नाटिका सादर केली जाणार आहे .
विद्यार्थ्यांना, मुख्याध्यापकांना, शिक्षकांना, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना  या उपक्रमामुळे  एक दिशा मिळेल आणि विशेष  म्हणजे  या उपक्रमाची  ओळख  संपूर्ण राज्याकरिता  पथदर्शी  उपक्रम म्हणून होईल , हा उपक्रम राज्यात उस्मानाबाद पॅटर्न म्हणून गणला जाईल.असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

***