हरभरा पिकासाठी उपाय योजना
उस्मानाबाद,दि.3:- हरभरा
पिकावर काही ठिकाणी घाटे अळीचा प्रादूर्भाव
दिसून येत असल्याने कृषी विभागातर्फे उपाय योजना व सल्ला सुचविण्यात आला आहे.मररोगग्रस्त झाडे दिसताच उपटून
नष्ट करावी, घाटे अळीचे नियमित सर्वेक्षण करावे, गरज भासल्यास एच.ए.एन.पी.व्ही.500
मिली लिटर व एक लहान चमचा निळ प्रति 10 लिटर पाण्यात फवारणी करावी, या किटक
नाशकाचे प्रमाण साध्या पंपासाठी असून पंट्रोलपंपासाठी किटकनाशकाची मात्रा तीन पट
करावी .असे उपविभागीय कृषी अधिकारी , उस्मानाबाद यांनी कळविले आहे.