मुंबई, : राज्य शासनाच्या
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन,
उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा,उत्कृष्ट छायाचित्रकार, सोशल मीडिया आणि स्वच्छता
अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लिखाणासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत
आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी, 2016 ते 31 डिसेंबर, 2016 पर्यंतच्या
कालावधीत प्रसिध्द झालेल्या लेखनाच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका
पाठविण्याचा अंतिम दिनांक 31 जानेवारी, 2017 असा आहे.
स्पर्धकांनी
जिल्हा माहिती कार्यालयाकडून, तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांनी
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय (तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,
मंत्रालय, मुंबई-32) येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत.
अर्जाचे नमुने dgipr.maharashtra.gov.in किंवा www.maharashtra.gov.in तसेच www.mahanews.gov.in येथेही
उपलब्ध आहेत.
पुरस्कारांची माहिती
पुढीलप्रमाणे
|
अ.क्र
|
पुरस्काराचेनाव
|
पारितोषिक
|
|
1
|
बाळशास्त्री जांभेकर
पुरस्कार (मराठी) (राज्यस्तर)
|
51 हजाररुपये
(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)
|
|
2
|
अनंत गोपाळशेवडे पुरस्कार (इंग्रजी) (राज्यस्तर)
|
51हजाररुपये
(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)
|
|
3
|
बाबूराव विष्णूपराडकर
पुरस्कार (हिंदी) (राज्यस्तर)
|
51हजाररुपये
(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)
|
|
4
|
मौलाना अबुलकलामआझादपुरस्कार(उर्दू) (राज्यस्तर)
|
51हजाररुपये
(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)
|
|
5
|
यशवंतराव चव्हाणपुरस्कार
शासकीयगट (मराठी) (मा.वज.) (राज्यस्तर)
|
51हजाररुपये
(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)
|
|
6
|
पु.ल.देशपांडे उत्कृष्ट
दूरचित्रवाणी वृत्त कथा पुरस्कार(राज्यस्तर)
|
51हजाररुपये
(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)
|
|
7
|
तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट
वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार (राज्यस्तर)
|
51हजाररुपये
(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)
|
|
8
|
केकीमूस उत्कृष्ट छायाचित्रकार
पुरस्कार शासकीय गट (मा.वज.) (राज्यस्तर)
|
51हजाररुपये
(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)
|
|
9
|
सोशल मीडिया पुरस्कार
(राज्यस्तर)
|
51हजाररुपये
(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)
|
|
10
|
स्वच्छ
महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार (राज्यस्तर)
|
51हजाररुपये
(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)
|
|
विभागीय
पुरस्कार
|
|||
|
11
|
दादासाहेबपोतनीसपुरस्कार,
नाशिकविभाग
|
51 हजाररुपये
(मानचिन्हवप्रशस्तीपत्र,याव्यतिरिक्तरुपये 10 हजारदै.गावकरीनेपुरस्कृतकेलेआहेत.)
|
|
|
12
|
अनंतरावभालेरावपुरस्कार,
औरंगाबादविभाग (लातूरसह)
|
51 हजाररुपये
(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)
|
|
|
13
|
आचार्यअत्रेपुरस्कार,
मुंबईविभाग
|
51 हजाररुपये
(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)
|
|
|
14
|
नानासाहेबपरूळेकरपुरस्कार,
पुणेविभाग
|
51 हजाररुपये
(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)
|
|
|
15
|
शि.म.परांजपेपुरस्कार,
कोकणविभाग
|
51 हजाररुपये
(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)
|
|
|
16
|
ग.गो.जाधवपुरस्कार,
कोल्हापूरविभाग
|
51 हजाररुपये
(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)
|
|
|
17
|
लोकनायकबापूजीअणेपुरस्कार,
अमरावतीविभाग
|
51 हजाररुपये
(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)
|
|
|
18
|
ग.त्र्यं.माडखोलकरपुरस्कार,
नागपूरविभाग
|
51 हजाररुपये
(मानचिन्हवप्रशस्तीपत्र)
|
|
नियम व अटी
राज्य/विभागीय पुरस्कार
पुरस्कारांसाठी पत्रकारांची मागील 5 वर्षांचीकामगिरी,
त्यांची सामाजिक बांधिलकी, शासनाच्या विकास विषयक
प्रसिध्दीसाठी, जनतेमधील
विकासविषयक जाणिवांच्या जागृतीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि पुरस्कार देण्यात येणाऱ्या
वर्षातील त्यांची कामगिरी याचाही विचार केला जाईल. मराठी,
इंग्रजी, हिंदी आणि उर्दू भाषेतील राज्य /
विभागीय पुरस्कारांसाठी पत्रकारांची निवड याच पध्दतीने केली जाईल.
या स्पर्धेत फक्त मराठी भाषेसाठी राज्य व विभागीय स्तर आहेत.
इंग्रजी, हिंदी, उर्दू या
भाषेतील पुरस्कार तसेच सोशल मीडिया पुरस्कार आणि स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार
हे केवळ राज्यस्तरीय आहेत. पुरस्कारासाठी निवड झाल्यास पुरस्कार स्वीकारण्याची तयारी असल्याचे संबंधित पत्रकाराचे संमतीपत्र
प्रवेशिके सोबत जोडणे आवश्यकआहे.
पुरस्कारासाठी पाठवावयाच्या
प्रवेशिके सोबत मूळ लिखाणाचे कात्रण त्याच्या 2 प्रतींसह पाठवावे लागेल. मूळ लिखाणाच्या वृत्तपत्रीय कात्रणांसोबत त्याच्या 2 प्रती नसल्यास प्रवेशिका रद्द होईल. मूळ लिखाणावर लेखकाचे
नाव नसल्यास ज्या नियतकालिकात हा लेख प्रसिध्द झाला असेल, त्या नियतकालिकाच्या संपादकांचा
दाखला जोडलेल्या प्रवेशिकांचाच विचारकेलाजाईल.
पत्रकारांच्या तसेच वृत्तपत्र
छायाचित्रकारांच्या गटात भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी शासन अथवा शासकीय महामंडळाच्या सेवेत
नसल्याचे प्रतिज्ञापत्र प्रवेशिकेसोबत जोडणे आवश्यक आहे.
अर्जदाराने राज्य व विभागीय
पातळीवरील प्रवेशिका नागपूर आणि औरंगाबाद येथील संचालक (माहिती),
अमरावती, नाशिक, पुणे,
कोल्हापूर, कोकण विभाग येथील विभागीय उपसंचालक(माहिती) किंवा जिल्हा माहिती अधिकारी यांच्या कडे थेट
पाठवाव्यात. प्रवेशिके सोबत जिल्हा माहिती अधिकारी किंवा पत्रकार
संघटनांच्या शिफारसपत्राची आवश्यकता नाही.
मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू या चार
ही भाषेतील राज्यस्तरीय पुरस्कारांसाठी तसेच राज्य पातळीवरील शासकीय गट व विभागीय पातळीवरील
मराठी भाषेतील पुरस्कार पात्र विजेत्यांची निवड करण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालया
तर्फे परीक्षकांची समिती
नियुक्त करण्यात येईल. समिती ची रचना, स्पर्धा व स्पर्धेतील पुरस्कारा संबंधी शासनाचे निर्णय अंतिम
राहतील.
ज्या नियतकालिकांचा खप व
जनमानसावरील प्रभाव चांगला आहे, अशाच नियत कालिकांतील मजकूर प्रवेशिकेसाठी पात्र ठरेल.
जे पत्रकार बृहन्मुंबई,
नवीमुंबई (कोकण), कोल्हापूर,
नागपूर, अमरावती, नाशिक,
पुणे आणि औरंगाबाद या विभागात वास्तव्य करीत असतील, त्यांना त्या विभागासाठी
असलेल्या विभागीय स्पर्धेतच भाग घेता येईल. मात्र त्यांचे लेखन अन्य कोणत्याही
विभागातील वृत्तपत्रात प्रसिध्द झाले असेल तरी ते ग्राह्य मानण्यात येतील.
गोवा व बेळगाव येथील पत्रकारांना
कोल्हापूर विभागीय स्पर्धेत (सिंधुदुर्गआणि सांगली जिल्ह्यांसह)
सहभाग घेता येईल. दिल्ली येथील पत्रकारांनाही आपल्या प्रवेशिका थेट किंवा महाराष्ट्र परिचय केंद्रामार्फत
मुख्यालयात पाठविता येतील.
शासकीय गटातील स्पर्धेसाठी
एकच प्रवेशिका पाठविण्याची मुभा राहील. प्रवेशिका संबंधित विभागाच्या
संचालक किंवा उपसंचालकांना व बृहन्मुंबईच्या प्रवेशिका माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात
पाठवाव्या लागतील.
2016 या वर्षात दैनिक वृत्तपत्रात, नियतकालिकात प्रसिध्द झालेल्या लेखांची कात्रणे प्रवेशिके सोबत जोडणेआवश्यकआहे.
प्रवेशिका राज्य स्तरासाठी
किंवा विभागीय स्तरासाठी आहे तसेच कोणत्या भाषेकरिता आहे या बाबतचा स्पष्ट उल्लेख असावा.
स्पर्धेसाठी पाठविलेली प्रवेशिका, त्यासोबत जोडलेली लेखांची कात्रणे
नीटनेटकी असणे अत्यावश्यक आहे. अस्ताव्यस्त, खाडाखोड असणारी किंवा वाचता येणार
नाहीत अशी प्रवेशिका रद्द करण्यात येईल. एकाच पत्रकाराला सलग दोन वर्ष पुरस्कार
प्राप्त झालेला असल्यास तिसऱ्या वर्षी त्याची प्रवेशिका विचारात घेतली जाणार नाही.
प्रत्येक गटासाठी व भाषेसाठी
संबंधित पत्रकारांनी एकच प्रवेशिका पाठवावी. एकापेक्षा जास्त
प्रवेशिका पाठविल्यास त्याचा विचार केला जाणार नाही.
सोशल मीडिया पुरस्कार
ही स्पर्धा संकेतस्थळे व
ब्लॉग व सोशल मिडीयातील प्रसारित मराठी भाषेतील वृत्त/पत्रकारिता
विषयक मजकुरा साठी आहे. यास्पर्धे साठी संकेत स्थळे व ब्लॉग सोशल
मीडियाचा वृत्त/पत्रकारिता विषयक प्रभावी वापर करणाऱ्या पत्रकारितेच्या
क्षेत्रातील व्यक्तींना सहभाग घेता येईल. पत्रकारिता ही स्पर्धेच्या संबंधित
वर्षातील असावी. स्वतंत्र ब्लॉगद्वारे लेखन केलेले असल्यास ब्लॉगला किमान एक वर्ष
झालेले असावे. त्याचप्रमाणे, वृत्त/पत्रकारिताविषयक संकेतस्थळ अधिकृत असावे व
त्यावर सोशल मीडिया वापर करताना केंद्र शासनाने विहीत केलेल्या मार्गदर्शक
सूचनांचा अवलंब केलेला असावा. प्रवेशिका या विकास पत्रकारिताविषयक लेखनाच्या
असाव्यात व त्यात शासनाच्या विविध योजनांना पूरक अभिव्यक्ती असावी. प्रवेशिका
पाठविताना अर्जदाराने व त्यांचे नामनिर्देशन ज्या व्यक्ती/संस्था/संघटना करतील
त्यांनी सोशल मीडियाद्वारे करण्यात आलेल्या पत्रकारितेची उदाहरणे व ती कोणत्या
तारखेस प्रसारित झाली त्यांच्या मुद्रित प्रती (प्रिंट आऊट) सादर कराव्यात. नियमातील
संबंधित अटी या गटासाठीही लागू राहतील.
स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार
केंद्र शासनाचे स्वच्छ भारत अभियान
आणि राज्य शासनाचे स्वच्छ महाराष्ट्र अभियान प्रभावीपणे राबविले जात आहे. आपल्या
लिखाणातून लोकांमध्ये स्वच्छताविषयक जनजागृती करणाऱ्या पत्रकारांसाठी ही स्पर्धा
जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेत मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू भाषेतील
वृत्तपत्रांमध्ये लिखाण करणाऱ्या पत्रकारांना तसेच इलेक्ट्रॉनिक्स मीडियामधील
पत्रकारांना सहभागी होता येईल. स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ महाराष्ट्र अभियान,
महाराष्ट्र स्वच्छता अभियान (नागरी), संत गाडगे बाबा ग्रामस्वच्छता अभियान, हागणदारीमुक्त
गाव योजना, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, घनकचऱ्यामधून बायोगॅसची तसेच
वीजेची निर्मिती इत्यादी बाबत लिखाण केलेले असावे. शासनस्तरावरुन राबविण्यात येत
असलेल्या स्वच्छताविषयक विविध योजनांची प्रसिध्दी, स्वच्छता अभियान लोकसहभाग
वाढविण्यासाठी लिखाणाद्वारे करण्यात आलेले
प्रयत्न, स्वच्छतेचे महत्व पटविण्यासाठी करण्यात आलेल्या जनजागृतीपर लेखन
इत्यादींचा या पुरस्कार स्पर्धेत अंतर्भाव होईल. नियमातील संबंधित अटी या
गटासाठीही लागू राहतील.
इलेक्ट्रॉनिक मीडियातील पत्रकारांसाठी स्पर्धा
इलेक्ट्रॉनिक मीडियातील पत्रकारांसाठी पु.ल.देशपांडे उत्कृष्ट
दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार देण्यात
येतो. ही स्पर्धा मराठी भाषेतील वृत्तकथेसाठी असून दूरदर्शन, खाजगी चित्रवाहिन्या,
स्थानिक केबल न्यूज व शासकीय उपक्रम यांना यामध्ये सहभाग घेता येईल.
वृत्तकथाचित्रे ही स्पर्धेच्या संबंधित वर्षात तयार केलेली व प्रसारित झालेली
असावीत. वृत्तकथा किमान 3 मिनिटे असावी. प्रवेशिका पाठवितांना संबंधित प्रतिनिधीची
माहिती तसेच वृत्तकथा कोणत्या तारखेस प्रसारित झाली, याबाबतचे संबंधित संस्था प्रमुख/संपादक यांचे प्रमाणपत्र असावे. स्थानिक
केबलच्या बाबतीत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांचे नोंदणीपत्र सादर करणे आवश्यक आहे.
प्रवेशिकेसोबत संबंधित
वृत्तकथेची सीडी/कॅसेट थेट त्या त्या विभागातील उपसंचालक /जिल्हा माहिती अधिकारी
यांच्याकडे तर मुंबईकरिता उपंसचालक (वृत्त), माहिती व जनसंपर्क महासंचालनालय,
तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा
मार्ग, मंत्रालय, मुंबई-32 यांच्याकडे पाठविण्यात यावी. मराठी वृत्तचित्रकथा
राज्यस्तरीय पुरस्कारासाठी थेट प्राप्त झालेल्या नावांमधून पुरस्कारपात्र
विजेत्याची निवड करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स मीडियातील तज्ज्ञ व्यक्तींची परिक्षण
समितीवर नियुक्ती करण्यात येईल. तसेच
याशिवाय अन्य संबंधित अटी या गटासाठीही
लागू राहतील.
छायाचित्रकार
पुरस्कार
तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार
पुरस्कार स्पर्धा ही मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू भाषेतील वृत्तपत्रातील पूर्ण वेळ छायाचित्रकारांसाठी
आहे. यात सामाजिक संदेश देणारी
छायाचित्रे, समाजातील प्रश्न मांडणारी
छायाचित्रे, शासकीय योजनांचा प्रचार आणि प्रसारासाठी पुरक ठरतील अशी छायाचित्रे यांच्यासह
प्रवेशिका सादर करता येईल.
महाराष्ट्र शासनाच्या विविध लोकोपयोगी योजनांवरील छायाचित्र ग्राह्य मानण्यात
येईल. मात्र हे छायाचित्र मूळ
स्वरुपातील असावे. फोटोप्रत नसावी. पुरस्कारासाठी छायाचित्रकारांची मागील 5 वर्षाची कामगिरी, त्यांची सामाजिक बांधिलकी, शासनाच्या विकास विषयक
कामाच्या प्रसिध्दीसाठी जनतेमधील जाणिव जागृती साठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि पुरस्कार
देण्यात येणाऱ्या वर्षातील त्यांची कामगिरी याचा विचार केला जाईल. एकाच छायाचित्र काराला सलग दोन वर्ष
पुरस्कार प्राप्त झालेला असल्यास तिसऱ्या वर्षी त्याची प्रवेशिका
विचारात घेतली जाणार नाही. पुरस्कारासाठी पाठवावयाच्या
प्रवेशिके सोबत मूळ छायाचित्रे पाठविण्यात यावीत. ज्या नियतकालिकात छायाचित्र प्रसिध्द झाले असेल, त्या नियतकालिकाच्या संपादकांचा दाखला, तारीख नियतकालिकाचे नाव प्रवेशिके सोबत जोडलेले असावे. अन्यथा त्या प्रवेशिकेचा विचार केला जाणार नाही.
केकीमूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार, शासकीयगट (मावज)
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामध्ये
छायाचित्रकार म्हणून काम करणारे कर्मचारी या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतात.
उपरोक्त सर्व
स्पर्धा विषयींची माहिती आणि अर्जाचे नमुने dgipr.maharashtra.gov.in,
www.maharashtra.gov.in तसेच www.mahanews.gov.in येथे उपलब्ध आहेत. तसेच जिल्हा माहिती अधिकारी,
उपसंचालक, विभागीय माहिती कार्यालय, संचालक, नागपूर-अमरावतीवसंचालक,
औरंगाबाद, महाराष्ट्र परिचयकेंद्र, पणजी-गोवा तसेच नवी दिल्ली आणि वृत्त शाखा, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरुचौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई -32 येथे उपलब्धआहेत.
या स्पर्धेत राज्यातील पत्रकारांनी अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन माहिती व जनसंपर्क
महासंचालनालयाच्या वतीने करण्यात येत आहे.
०००