Wednesday, 4 January 2017

क्रीडांगण विकास अनुदान योजनेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन


उस्मानाबाद,दि.4:-क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालय, उस्मानाबाद यांच्या वतीने क्रीडांगण विकास अनुदान( सर्वसाधारण/विशेष घटक) योजनेंतर्गत उस्मानाबाद जिल्हयातील शासकीय व खाजगी नोंदणीकृत संस्था, सामाजिक न्याय विभागाच्या शाळा, वसतीगृह, क्रीडा मंडळे, युवक मंडळे, महिला मंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था, यांच्याकडून विहित नमुन्यातील अर्जात दर्शविलेल्या कागदपत्रानुसार दोन प्रतीत परिपूर्ण प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.
दिनांक 06 ते 11 जानेवारी, 2017 या कालावधीत विहीत नमुन्यातील अर्ज वितरीत करण्यात येतील व दिनांक 11 ते17 जानेवारी 2017 या कालावधीत कार्यालयीन वेळेत प्रस्ताव स्विकारले जातील.
प्रस्तावासाठी आवश्यक लागणारे कागदपत्र पुढीलप्रमाणे-कव्हरींग लेटर, विहीत नमुन्यातील अर्ज, नोंदणी प्रमाण पत्र (महा/एफ) , घटनेची प्रत , बॅक बॅलेन्स प्रमाणपत्र(मुळ प्रमाणपत्र) , ऑडीट (मुळ प्रमाणपत्र) सन2015-16-17, ज्या बाबींसाठी अनुदान घ्यावयाचे आहे त्यांचे अंदाजपत्रक/आराखडे , तांत्रिक मान्यता (गव्ह.इंजिनीअर) , संस्थेचे नावे- जागेचा पुरावा , बांधकाम परवाना , शाळा मान्यता पत्र , संस्थेचा ठराव , वार्षिक अहवाल , हमीपत्र इत्यादी .

 आवश्यक त्या कागदपत्रांवर संस्थेच्या सही/ शिक्क्यासह प्रस्ताव दाखल करण्यात यावेत. अपूर्ण प्रस्ताव रद्द ठरविण्यात येतील. अधिक माहितीसाठी  येथील जिल्हा क्रीडा कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. संजय महाडिक यांनी केले आहे. ****