उस्मानाबाद,
दि.7:-पत्रकार दिनानिमित्त जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विधवा पत्नीना शासकीय योजनांची माहिती व्हावी या हेतूने या महिलांचा जिल्हयातील
प्रमुख शासकीय विभागांच्या विभागप्रमुखांसोबत सुसंवाद आणि या सुसंवादानंतर उपस्थित
सर्वांची आरोग्य तपासणी हे उपक्रम राबविले जाणार आहेत.
तरी जिल्ह्यातील
शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील
विधवा पत्नीनी या कार्यक्रमासाठी
मंगळवार , दिनांक 10 जानेवारी 2017
रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हा नियोजन सभागृह, मध्यवर्ती
प्रशासकीय इमारत , उस्मानाबाद येथे उपस्थित राहावे , असे आवाहन जिल्हा माहिती
अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी केले आहे
.
****