Saturday, 5 October 2019

श्री तुळजाभवानी देवीजींची भवानी तलवार अलंकार महापूजा


शारदीय नवरात्र महोत्सव-2019





          उस्मानाबाद, दि.05: शारदीय नवरात्र महोत्सवात  आज शनिवार सातव्या दिवशी श्री तुळजाभवानी देवीची भवानी तलवार अलंकार महापूजा मांडण्यात आली. दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. राज्य व परराज्यातील चालत येणाऱ्या भाविकांच्या संख्येत प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन मंदिर संस्थानने वेळेवर सर्वांना दर्शन मिळावे यासाठी गर्दीचे नियंत्रण करुन दर्शनरांग नियंत्रित केली. या शिस्तबद्धतेमुळे भाविकांना कोणताही त्रास न  होता चांगल्या पद्धतीने दर्शन घेता येत आहे.
          श्री तुळजाभवानीची आज नित्योपचार पुजा आणि अभिषेक पूजेनंतर भवानी तलवार  अलंकार महापूजा मांडण्यात आली. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना धर्म रक्षणासाठी श्री तुळजाभवानी मातेने प्रसन्न होऊन आपल्या हाताने भवानी तलवार देऊन आशीर्वाद दिला म्हणून या दिवशी श्रींदेवीजीला महाअलंकार घालण्यात येऊन छत्रपती भवानी तलवार देत आहे, ही अवतार पूजा मांडण्यात येते.  दरम्यान, काल रात्री श्री देवीजींची छबिना मिरवणूक काढण्यात आली.  यावेळीही भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
उद्या (दि. 06रोजी) श्री तुळजाभवानी देवीची महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात येणार आहे. सकाळी 6 वाजता वैदीक होमास व हवनास आरंभ व सकाळी 11 वाजता पुर्णाहुती देण्यात येणार आहे.                               

Thursday, 3 October 2019

विधानसभा निवडणूकीकरीता चारी मतदारसंघात एकुण 26 अर्ज दाखल


वि.स. वृत्त : 19

विधानसभा निवडणूकीकरीता चारी मतदारसंघात एकुण 26 अर्ज दाखल

उस्मानाबाद, दि.3: विधानसभा सार्वत्रिक निवडणुक-2019 करीता 240-उमरगा विधानसभा मतदार संघात - 5 उमेदवारांनी 5 नामनिर्देशन पत्र तर 241-तुळजापुर विधानसभा मतदार संघात 4 उमेदवारांनी 6 नामनिर्देशन पत्र, 242-उस्मानाबाद विधानसभा मतदार संघात 5 उमेदवारांनी 5 नामनिर्देशन पत्र आणि  243-परंडा विधानसभा मतदार संघात  8 उमेदवारांनी 10 नामनिर्देशन पत्र दाखल केली आहेत. त्यांचा सविस्तर तपशील पुढील प्रमाणे आहे.

.क्र.
मतदारसंघ
उमेदवारांचे नाव
पत्ता
पक्षाचे नाव
नामनिर्देशन पत्राची संख्या
1
240- उमरगा(अ.जा)
1)                  श्री. चौगुले ज्ञानराज धोंडीराम
घर नं.101/01 गिरीजा निवास, गौतमनगर, उमरगा
शिवसेना
01
2)                 श्री. संदिप धर्मा कडबु
मु.पो.आलुर ता. उमरगा जि. उस्मानाबाद
बहुजन विकास आघाडी
01
3)                  श्री. गायकवाड तानाजी वैजनाथ


मु.पो. लोहारा (खुर्द) ता. लोहारा जि. उस्मानाबाद ह.मु. माडज ता. उमरगा
बहुजन समाज पार्टी
01
4)                श्री. व्हटकर विलास शरणप्पा
मु.पो गुंजोटी ता.उमरगा जि. उस्मानाबाद पिन-413606
अपक्ष
01
5)                 श्री.सचिन जयहिंद देडे
मु.पो.आलुर ता. उमरगा जि. उस्मानाबाद
बळीराजा पार्टी
01
2
241-तुळजापुर
1)             श्री. मधुकरराव देवराव चव्हाण
मु.पो.अणदूर ता. तुळजापुर जि.उस्मानाबाद
भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस
02
2)            श्री. राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील
मु.पो.तेर ता.जि. उस्मानाबाद
भारतीय जनता पार्टी
02


3)            श्री. नवगिरे प्रशांत प्रकाश

मु.पो. जळकोट ता. तुळजापुर जि. उस्मानाबाद
महारा्ष्ट्र नवनिर्माण सेना
01
4)           श्री. महेंद्र भानुदास धुरगुडे
मु.पो. मगंरुळ ता. तुळजापुर जि. उस्मानाबाद
अपक्ष
01
3
242- उस्मानाबाद
1) श्री. बाबुराव निवृत्ती तवले

मु.शेलगाव (जहागीर) पो. सातेफळ ता.कळंब जि.उस्मानाबाद
अपक्ष
01




2) श्री. नेताजी नागनाथराव गोरे




शिवराज्य 132/2, क्रांतीसिंह नानापाटील नगर, जिजाऊ चौक, बार्शी नाका.
जि.उस्मानाबाद
अपक्ष
01


3) श्री. रामजीवन पंढरी बोंदर
मु. वडगाव (शिराढोण)पो. निपाणी ता. कळंब जि. उस्मानाबाद
महाराष्ट्र क्रांती सेना
01
4) श्री. भिका सुदामराव विद्यागर


द्वारा –संजयकुमार वाघमारे 4/56/1 हाऊसिंग सोसायटी, भिमनगर उस्मानाबाद
बहुजन समाज पार्टी
01
5) श्री. धनंजय गंगाधर शिंगाडे
राजगिर बंगलो, भिमनगर, उस्मानाबाद
वंचित बहुजन आघाडी
01
4
243-परंडा
1) श्री.तानाजी जयवंत सावंत
मु.मुगाव पो.सोनारी ता.परंडा जि. उस्मानाबाद
शिवसेना
01


2) श्री.संकेत विक्रमराव चेडे
331, चेडे गल्ली, वाशी ता. वाशी
अपक्ष
02
3) श्री.महादेव शंकर लोखंडे
मु.पो. सरमकुंडी ता. वाशी
बहुजन समाज पार्टी
02
4) श्री.रेवण विश्वनाथ भोसले
मु.पो.ईट ता.भुम
जनता दल (सेक्युलर)
01
5) श्री. आटुळे लक्ष्मीकांत श्रीपती
मु.जनकापुर पो.पारगाव ता. वाशी
अपक्ष
01
6)     श्री. राहुल महारुद्र मोटे
मु.पो. गिरवली ता.भुम
नॅशनॅलिस्ट कॉग्रेस पार्टी
        01
7)     श्री.अब्दुल करीम महंम्म्‍ाद युसुफ हावरे
मु.निजामपुरा गल्ली परंडा ता.परंडा
समाजवादी पार्टी
        01


8)     श्री.गुरुदास संभाजी कांबळे
मु.पो. आरणगाव ता. परंडा
बहुजन विकास आघाडी
       01

****
वि.स. वृत्त : 20

विधानसभा निवडणूकीकरीता नामनिर्देशन पत्रांचे वितरण
             उस्मानाबाद, दि.03: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 ची निवडणूक अधिसूचना जाहिर झाली असून  नामनिर्देशवन पत्र वितरण आणि दाखल करुन घेण्याची प्रक्रिया सुरु झालेली आहे.
आज दि.03 ऑक्टोंबर 2019 रोजी  240-उमरगा विधानसभा सार्वत्रिक निवडणूक मतदार संघातून 61 जणांन 62 नामनिर्देशन तर 241-तुळजापूर विधानसभा मतदार संघात 27 जणांनी 56, 242-उस्मानाबाद विधानसभा मतदार संघातून -17 जणांनी 30 आणि 243-परंडा विधानसभा मतदार संघातून 4 जणांनी 8 नामनिर्देशन पत्राचे वितरण करण्यात आले आहे.
                                                                          ****