वि.स. वृत्त : 15
तुळजापूर शारदीय नवरात्रनिमित्त
प्रशासकीय
अधिकारी-कर्मचारी पायी तुळजापूरकडे
उस्मानाबाद, दि.01:
महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवास महाराष्ट्रासह
तेलंगणा आणि कर्नाटक या राज्यातुनही मोठया प्रमाणात भाविक तुळजापूर नगरीत दाखल होत
असतात, त्याअनुषंगाने प्रतिवर्षाप्रमाणे या उत्सवासाठी देवींचीच्या दर्शनासाठी आज
प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी तुळजापूरकडे पायी निघाले.
यामध्ये जिल्हाधिकारी
दीपा मुधोळ-मुंडे, सहाय्यक आयुक्त आयकर विभाग- विश्वास मुंडे, मुख्य कार्यकारी
अधिकारी(जि.प) श्री.संजय कोलते,उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेगुलवार, उपजिल्हाधिकारी
राजेंद्र खंदारे, उप जिल्हा निवडणुक अधिकारी, प्रताप काळे, परिक्षाविधी जिल्हाधिकारी
श्री. जॉनसन जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर
आडे, स्वीप कक्ष प्रमुख अभय मस्के, यांची उपस्थिती होती.
21 ऑक्टोंबर रोजी
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीकरीता मतदार होणार आहे. त्या अनुषंगाने मतदानाची
टक्केवारी वाढावी याकरीता यावेळी मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
मतदान हा प्रत्येक नागरीकाचा हक्क व अधिकार आहे. या अधिकाराचा वापर प्रत्येक
नागरिकाने करावा आणि आपले मतदानाचे कर्तव्य पार पाडावे. नवरात्र उत्सवात प्रत्येक
भावीक ज्याप्रकारे भावीक ज्याप्रकारे देवीची आराधना, पुरा करण्यास विसरत नाही.
त्याप्रमाणेच प्रत्येक नागरिकांने आपला मतदानाचा हक्कही न विसरता बजावावा. सुजाण
नागरिक म्हणुन आपल्याला वाटत असेल , तर कोणतीही सबब न सांगता प्रत्येकाने मतदान
करावे. आपल्या देशातील लोकशाहीच्या भवितव्यासाठी आणि आपल्या पुढील पिढीसाठी मतदान
महत्वाचे आहे त्यामुळे कोणीही मतदान टाळू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी दिपा
मुधोळ-मुंडे यांनी केले.
******

