शारदीय नवरात्र महोत्सव-2019
उस्मानाबाद,दि.01:- श्री तुळजाभवानी नवरात्र महोत्सवास महाराष्ट्रसह आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यामधून
यात्रेकरु मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत. या भाविकांना
सुविधा देण्याचे काम शासन यंत्रणेमार्फत उत्तम प्रकारे जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे, पोलीस अधिक्षक राजतिलक रोशन यांनी नियोजन केल्यामुळे भावीकांना आई तुळजा भवानीचे दर्शन
घेण्यासाठी साधारण दोन तास लागत आहेत. मंदिरात भावीकांची गर्दी जरी
असली तरी पोलीस यंत्रणा जागोजागी थांबून
गर्दीवर नियंत्रण ठेवत आहे. भावीकांना आईतुळजा भवानीच्या दर्शनासाठी कोणत्याही
प्रकारचा त्रास होणार नाही, याची काळजी मंदीर संस्थानचे अध्यक्ष
तथा जिल्हाधिकारी दिपा
मुधोळ-मुंडे व पोलीस अधिक्षक राजतिलक रोशन हे सर्व
ठिकाणी जातीने फिरुन आपले कर्तव्य बजावतांना दिसत आहेत. शहरामध्ये येणा-या वाहनासाठी नगर
पालिकेने वेगवेगळया ठिकाणी वाहनतळ उभारल्यामुळे वाहनाचा त्रास चालणा-या भावीकांना
होणार नाही,याची दक्षता घेतली आहे. एस. टी स्टॅन्डवर
भावीकांची धांदल होवू नये, म्हणून खास यंत्रणा स्पेशल एस.टी.बसची सोय केल्यामुळे
भावीक सुखरुप आप-आपल्या गावी परतत आहेत. आरोग्य विभागामार्फत आरोग्य सुविधा उत्मरीत्या
दिल्या जात असून औषधांचा साठा देखील प्रत्येक आरोग्य केंद्रावर असल्याचे दिसले.
श्री तुळजाभवानी मंदिरामध्ये मंदिरावरुन टेहळणी करण्यासाठी देखिल पोलीस यंत्रणा कार्यरत
आहे. भावीकांना त्रास होवू नये, म्हणून वाहतूक मार्गात देखील बदल करण्यात आला असून
मंदिराजवळील कचरा वेळोवेही उचण्यासाठी
नगर परिषदेचे वाहने कार्यरत आहेत. तसेच दुरघटना होणार नाही याची पूर्णदक्षता
घेण्यात आली असून विविध यंत्रणंकडून अग्नीशमनदल,रुग्णवाहिका, कंट्रोल रुम, सार्वजनिक आरोग्य सेवा, बीडकर तलाव, क्लॉकरुम
व चप्पलस्टँड, प्रवेशद्वार, पार्कींग-दर्शन रांगा, पाणपोई व प्रथमोपचार केंद्र,
पोलीस चौकी, यांच्याकडून बंदोबस्त चोख ठेवण्यात आला आहे.
तत्पूर्वी रात्री दुसऱ्या माळेच्या दिवशी मंदिर संस्थानचे तहसीलदार योगिता
कोल्हे यांच्या उपस्थितीत अभिषेक पूजेनंतर देवीला वस्त्र अलंकार
चढविण्यात आला. त्यानंतर धूप आरती करण्यात आली. रात्री श्री तुळजाभवानी मंदिरात नंदी छबिना मिरवणूक काढण्यात आली. प्रक्शाळ पूजा झाली. मंदिर संस्थानचे सहायक व्यवस्थापक
सिध्देश्वर इन्तुले उपस्थित होते. याशिवाय भोपे, पुजारी, आराधी, गौंधळी व भाविक
मोठ्या संख्येने उपस्थित होते.


