Saturday, 30 December 2017

मागासवर्गीय विद़यार्थींनींना चांगल्या सुविधा उपलब़ध करण्याची जबाबदारी सर्वांची -सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले



उस्मानाबाद.दि.30:- वसतिगृहाच्या वास्तूची काळजी घेऊन विद्यार्थीनींना सोयी सुविधा चांगल्या प्रकारे मिळतील, यावर लक्ष ठेवण्याची सर्वांची जबाबदारी आहे. शासनाने मागासवर्गीय विद्यार्थींनींना शिक्षणाचा अधिकार मिळण्यासाठी योजना सुरू केल्या आहेत. त्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार  बडोले यांनी केले

तुळजापूर येथील मागासवर्गीय व आर्थिकदृष्टया मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहाच्या उद्‌घाटन कार्यक्रमात शुक्रवारी (दि. 29) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री श्री. बडोले बोलत होते. अध्यक्षस्थानी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुर्नवसन, भूकंप पुर्नवसन, अल्पसंख्यांक विकास व वक्फ राज्यमंत्री दिलीप कांबळे होते. यावेळी आमदार मधुकरराव चव्हाण, सुजितसिंह ठाकूर, जिल्हा परिषद सदस्य अस्मिता कांबळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य नितिन काळे, देवानंद रोचकरी, ॲड.अनिल काळे, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त (लातूर) श्री.एल.आय.वाघमारे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सुनिता मते आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी बडोले यांच्या हस्ते वसतिगृहाच्या इमारतीच्या कोनशिलाचे अनावरण करण्यात आले.

यावेळी पुढे बोलताना मंत्री श्री. बडोले म्हणाले की, तुळजापूर वसतिगृहासाठी 10 कोटीचा प्रस्ताव उच्चाधिकार समितीसमोर आहे तो लवकरच मंजूर करून घेण्यात येईल. विविध ठिकाणच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकांसाठी शासनाने निधी दिलेला आहे. काही स्थानिक प्रश्नांची सोडवणूक करुन लवकरच ही कामेही पूर्ण होतील. उस्मानाबाद जिल्ह्यातील वसतिगृहाबाबतचे प्रस्ताव तातडीने सादर करावेत, अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी लक्ष दयावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

श्री. बडोले म्हणाले, जिल्ह्यातील विविध मागण्याबाबत निश्चितच सकारात्मक विचार केला जाईल, मुंबईतील इंदू मिलच्या ठिकाणचे काम पुढच्या महिन्यात सुरु होईल. त्याचबरोबर या जिल्ह्यात मागासवर्गीयांसाठी कायमस्वरुपी कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र, रमाई आवास योजनेतील सर्व लाभार्थ्यांना येत्या 2 वर्षात घरे मिळण्याच्या द्ष्टीने निश्चित व धोरणात्मक काम सुरु आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी वसतिगृह उभारण्याची कामे शासनाकडून लवकरच सुरू करण्यात येणारआहे. यामुळे मागासवर्गीय विद्य़यार्थ्यांना त्यांच्याच तालुक्यात राहून शिक्ष्ण घेता येणार आहे, असेही यावेळी श्री. बडोले यांनी सांगितले.

यावेळी राज्यमंत्री श्री. कांबळे म्हणाले की, गोरगरीब, वंचितांच्या, मागासवर्गीयांच्या सर्वांगीण विकासासाठी हे शासन कटिबध्द आहे .यात प्रामुख्याने त्यांच्या शैक्षणिक विकासाला प्राधान्य देण्यात येणार आहे. 50 वसतिगृहाचे काम त्वरेने पूर्ण करुन मुलींना शिक्षणासाठी योग्य ते प्रोत्साहन देण्याचा शासन प्रत्यक्ष कृतीतून आणि कर्तव्य पूर्ण करीत आहे.

लंडन येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या वास्तूस शासनाने दत्तक घेतले आहे.स्पर्धा परिक्षेसाठी मागास विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हे शासन सतत प्रयत्नशील आहे.मागासवर्गिय मुला मुलींनी जास्तीत जास्त  शिक्षण घ्या, मोठे व्हा, असेही यावेळी राज्यमंत्री श्री.कांबळे यांनी सांगितले.

आमदार श्री. चव्हाण व ठाकूर यांनीही यावेळी मार्गदर्शन केले व ही अत्यंत चांगली वास्तू उभारल्याबद्दल शासनाचे अभिनंदन केले, आभार मानले.

यावेळी  आय.एस.ओ. मानांकन प्राप्त शाळांना प्रमाणपत्र वितरण, स्वाधार योजनेच्या लाभार्थ्यांना धनादेशाचे वितरण, कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वभिमान सबळीकरण योजनेतील पात्र लाभार्थ्यांना मंजूरी आदेश, आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजनेचे धनादेश, अनुसूचित जातीच्या बचतगटांना मिनी ट्रॅक्टरचे वाटप मंत्री श्री.बडोले, राज्यमंत्री श्री.कांबळे  व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.


या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती. मते यांनी केले. सूत्रसंचलन श्री.बी.टी.नादरगे यांनी तर आभार बाबासाहेब थोरात यांनी मानले.  

Friday, 29 December 2017

सर्वांनी मिळून मोठया प्रमाणावर वृक्षलागवड करु या, झाडे जगवूया -अर्चनाताई पाटील



         उस्मानाबाद,दि.29:- उस्मानाबाद जिल्ह्याची ओळख दुष्काळग्रस्त म्हणून पुसायची असेल तर त्यासाठी आपण सर्वांनी मिळून मोठया प्रमाणवर वृक्षलागवड करायला हवी आणि झाडे जगविण्याचीही जबाबदारी घेतली पाहीजे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा श्रीमती.अर्चनाताई पाटील यांनी आज येथे केले.
            विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण विभाग व वनक्षेत्रपाल सामाजिक वनीकरण परिक्षेत्र उस्मानाबाद, कळंब, भूम यांच्या वतीने 13 कोटी वृक्षलागवड, ग्रीन आर्मी सभासद नोंदणी तसेच राष्ट्रीय हरित सेना उपक्रम असे एकदिवसीय प्रशिक्षण आळणी येथिल मध्यवर्ती रोपवाटिका येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहूने म्हणून जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, उस्मानाबादचे बांबूचे जनक आणि प्रगतशील शेतकरी राजशेखर पाटील हे उपस्थित होते.
            श्रीमती.पाटील पुढे म्हणाल्या की, उस्मानाबाद मधील जनतेने आपापल्या उपलब्ध जमिनीवर मोठया प्रमाणात वृक्षलागवड करुन ती सांभाळायला हवीत.रोपवाटीकांची माहिती घेवून जास्तीत जास्त रोपे रोपवाटीकेतून घेवून जावीत.अशा प्रकारे मोठया प्रमाणावर वृक्ष लागवड करुन त्यांची जोपासणा केल्यास उस्मानाबाद हरित उस्मानाबाद म्हणून नक्कीच ओळखला जाईल, असेही त्या म्हणाल्या.
            कार्यक्रमाचे प्रास्ताविक वनक्षेत्रपाल सामाजिक वनीकरण श्री.अशोक घुले यांनी केले. या शिवाय प्रगतीशील वनशेती शेतकरी आणि उस्मानाबाद मधील बांबूचे जनक म्हणून ओळखले जाणारे श्री.राजशेखर पाटील आणि 13 कोटी वृक्षलागवड व राष्ट्रीय हरित सेना उपक्रम या विषयावर विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण कु.प्रियंका गंगावणे यांचे मार्गदर्शनही उपस्थितांना करण्यात आले.
            या कार्यक्रमास उस्मानाबाद, कळंब, भुम आणि वाशी या भागातील सामाजिक वनीकरण शाळा, राष्ट्रीय हरित सेनेचे सभासद तसेच वन विभागाचे अधिकारी , कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

“दुष्काळाकडून समृध्दीकडे”छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न



         उस्मानाबाद,दि.29:- जिल्हाधिकारी कार्यालय आणि पाणी फांऊडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या दुष्काळाकडून समृध्दीकडे छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन आ. राणाजगजितसिंह पाटील जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, यांच्या हस्ते करण्यात आले. 
            यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, जिल्हा नियोजन अधिकारी श्री. सुधाकर आडे, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री. सुभाष चोले, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक यांच्यासह अधिकारी व कर्मचारी आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रदर्शनात दुष्काळावरील उपाययोजना आणि वॉटर कप स्पर्धेत सर्वसामान्यांनी केलेले योगदान, दुष्काळ या समस्येवर मात करण्यासाठी आतापर्यंत विविध गावांनी एकजुटीने येवून केलेल्या कामांचे छायाचित्रांचा समावेश होता. या प्रदर्शनाची सुरूवात विविध जिल्हयांमध्ये दि.13 डिसेंबर पासून सुरु झाली असून या वर्षी महाराष्ट्रातील एकूण 75 तालुक्यात सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा होणार आहे.

हे प्रदर्शन दि.30 डिसेंबरला दुपारी 3 वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे. 

Thursday, 28 December 2017

वेळेत काम पूर्ण न करणाऱ्या विभागाचा निधी इतर विभागाकडे वर्ग केला जाईल-पालकमंत्री दिवाकर रावते


         उस्मानाबाद,दि.28:-  सर्व शासकीय यंत्रनांनी  जिल्हा वार्षिक योजनेतील कामे वेळेत पूर्ण करावीत, कामे चांगले व दर्जेदार करुन घ्यावीत. तसेच जे विभाग वेळेत कामे पूर्ण करणार नाहीत त्या विभागांचा निधी चांगले कामे करणाऱ्या इतर विभागाकडे वर्ग करण्यात येईल, असे निर्देश परिवहन, खारभूमी विकास मंत्री तथा पालकमंत्री  दिवाकर रावते यांनी आज दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पालकमंत्री दिवाकर रावते यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वार्षिक योजना सन 2017-18 च्या कामाबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी पालकमंत्री श्री. रावते बोलत होते. यावेळी पशुसंवर्धन, दुग्धविकास,मत्सव्यवसाय मंत्री तथा सहपालकमंत्री महादेव जानकर, जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील, उपाध्यक्षा सौ.अर्चनाताई पाटील, सर्वश्री आमदार राणाजगजितसिंह पाटील, सुजितसिंह ठाकूर, ज्ञानराज चौगुले, जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, अप्पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, उप विभागीय अधिकारी चेतन गिरासे, जिल्हा कृषी अधिक्षक कृषी अधिकारी सुभाष चोले, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. अविनाश आघाव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता श्री.कुलकर्णी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शिवाजी थोरात, विभागीय वन अधिकारी राजेश्वर सातेलीकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एकनाथ माले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हनुमंत वडगावे, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
            यावेळी पुढे बोलताना पालकमंत्री श्री. रावते म्हणाले की, प्रशासनाला गतिमान करण्यासाठी त्यांच्या अडचणी सोडवून त्याचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.जलयुक्त शिवार अभियानाच्या कामाचा अधिकाऱ्यांनी गावात जावून कामाचा आढावा घ्यावा.
जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरण्यासाठी लवकरच बैठक घेवून रिक्त पदे भरले जातील, महाआरोग्य शिबिरासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. पिण्याच्या पाण्याची तपासणी करुन ते पाणी पिण्यायोग्य आहे का हे पाहावे नसेल तर त्या ठिकाणी हे पाणी पिण्यास योग्य नाही अशा प्रकारचे फलक लावावे, अशी सूचना श्री. रावते यांनी यावेळी केली.
बळीराजा चेतना अभियानांतर्गत सन 2017-18 करीता 16 कोटी 29 लाख 20 हजार रुपये  मागणी केली होती त्यापैकी 4 कोटी 67 लाख 80 हजार रुपये मिळाले असल्याचे यावेळी सांगितले.बळीराजा चेतना अभियानातून ग्रामपंचायतला देण्यात येणारा निधी हा त्रस्त कुटुंबाच्या संख्येच्या प्रमाणात वाटप करण्यात यावा, असा निर्णय घेण्यात आला.
यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे यांनी सन 2017-18 च्या जिल्हा वार्षिक योजनेचे  सादरीकरण केले. जिल्हा वार्षिक योजना सन 2017-18 साठी 148 कोटी 13 लाख निधी मंजूर होता. त्यापैकी वित्तीय तरतुद 115 कोटी 40 लाखाची झाल्याचे यावेळी सांगितले.  त्याचबरोबर यावेळी  जिल्हा आरोग्य सेवा समन्वय समिती, बळीराजा चेतना अभियान, किमान आधार भूत जिल्हा खनिज प्रतिष्ठान अंतर्गत नियामक परिषद बैठक, कर्ज माफी  आदींचा यावेळी आढावा घेण्यात आला.

यावेळी  जिल्हाधिकारी राधाकृष्ण  गमे यांनीही जिल्हा वार्षिक योजनाचे कामे वेळेत पूर्ण करावेत, असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे यांनी केले. यावेळी विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते. 

तालुका स्मार्ट ग्राम योजनेंतर्गत विजेत्या गावांना पारितोषिक वितरण कार्यक्रम संपन्न



उस्मानाबाद,दि.28:- जिल्ह्यातील तालुकास्तरीय स्मार्ट ग्राम म्हणून पात्र ठरलेल्या पंचायतीना पालकमंत्री दिवाकर रावते, सहपालक मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात पारितोषिक वितरण करण्यात आले.
        तुळजापूर तालुक्यातील आलीयाबाद, लोहारा तालुक्यातील कास्ती (बु), उमरगा तालुक्यातील तलमोड, कळंब तालुक्यातील कन्हेरवाडी, भूम तालुक्यातील पाथ्रुड, वाशी तालुक्यातील सोनारवाडी, परंडा तालुक्यातील पिंपळवाडी तर उस्मानाबाद तालुक्यातून तेर व दारफळ या ग्रामपंचायतीना विभागून तालुका स्मार्ट ग्राम पारितोषक यावेळी आयोजित कार्यक्रमात देण्यात आले. स्मार्ट ग्राम पंचायतीला दहा लाखाचे पारितोषिकाचे यावेळी वितरण करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील, उपाध्यक्षा सौ.अर्चनाताई पाटील, सर्वश्री आमदार राणाजगजितसिंह पाटील, सुजितसिंह ठाकूर, ज्ञानराज चौगुले, जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, अप्पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, उप विभागीय अधिकारी चेतन गिरासे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार आदीसह सरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते. 

Wednesday, 27 December 2017

ग्राहकांनी सतत जागरुक राहून खरेदी करावी - अपर जिल्हाधिकारी अविनाश पाठक



उस्मानाबाद :- ग्राहकाला त्याच्या पैशाच्या मोबदल्यात योग्य दराने वस्तू आणि दर्जेदार सेवा मिळणे हा ग्राहकाचा हक्क आहे. त्यामुळे ग्राहकांनी सतत जागरुक राहून खरेदी करावी, असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी आज केले.

जिल्‍हा पुरवठा  कार्यालय व तहसिल कार्यालय यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने  राष्‍ट्रीय  ग्राहक  दिनानिमित्त  जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात अपर जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या अध्यक्षतेखाली  कार्यक्रमाचे आयोजन  करण्‍यात आले होते.  यावेळी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र ग्राहक पंचायतचे अध्‍यक्ष डॉ. विजय लाड,  ग्राहक पंचायतच्या सह संघटक मेघा कुलकर्णी, अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हाध्यक्ष अनिल पाटील, राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितिचे सदस्य प्रा. संपतराव जळके, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, उपजिल्हाधिकारी सचिन बारवकर, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, जिल्हा पुरवठा अधिकारी  श्रीमती. शिल्पा करमरकर,  तहसिलदार सुजित नरहरे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्‍वामी विवेकानंद यांचे प्रतिमेचे पूजन करुन दिपप्रज्‍वलन करण्‍यात आले.

यावेळी पुढे बोलताना श्री. पाठक म्हणाले की,  ग्राहकाला त्याच्या पैशाच्या मोबदल्यात योग्य दराने आणि दर्जेदार सेवा किंवा वस्तू पुरविणे अपेक्षीत असते. परंतु असे न झाल्याने  ग्राहकाच्या हक्कांची पायमल्ली होते. त्यामुळे  ग्राहकांनी सतत जागरुक राहून खरेदी करावी आणि फसव्या जाहिरातींना बळी पडु नये. सध्या मोठया प्रमाणात ग्राहकाकडून ऑनलाईन वस्तूंची खरेदी केली जात आहे, नेट बँकींग, एटीएम आदीचा वापर वाढला आहे त्यामुळे ग्राहकांनी सतत जागरुक राहावे व आपले हक्क समजून घ्यावे.
ग्राहक पंचायत समितीचे अध्यक्ष  डॉ.लाड  यावेळी  बोलताना म्हणाले की,  ग्राहकांच्या हिताचे रक्षण  करण्यासाठी  विविध  कायदे व नियम अस्तित्वात आहेत. ग्राहकांने  वस्तु खरेदी करण्यासाठी जे मुल्य  दिलेले आहे त्याच्या बदल्यात योग्य वजनात व मापात वस्तु मिळणे  ग्राहकाचा कायदेशिर अधिकार व हक्क आहे. त्यासाठी  ग्राहकाने जागरुक राहून ग्राहक चळवळ उभी करावी व शोषणमुक्त समाजाची निर्मिती करावी, असे ही त्यांनी सांगितले.

राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितिचे सदस्य प्रा. जळके यांनी सांगितले की, ग्राहकांने वस्तू खरेदी केल्यानंतर त्या प्रत्येक वस्तुची पावती घ्यावी व जागरुक ग्राहक बनावे.

यावेळी  ग्राहक पंचायतच्या सह  संघटक मेघा कुलकर्णी  यांनीही  मार्गदर्शन केले. अन्‍न व औषधी प्रशासन, आरोग्य विभाग, प्रा‍देशिक परिवहन अधिकारी, वजने व मापे विभागभारतीय आयुर्विमा महामंडळ, गॅस व राज्य मार्ग परिवहन महामंडळ आदी विभागाचे स्टॉल्सचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.


प्रास्ताविक व आभार प्रदर्शन जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती. करमरकर यांनी  केली. सूत्रसंचालन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीमती वृषाली तेलोरे आणि पुरवठा विभागाच्या वर्षा शितोळे यांनी केले. यावेळी विविध कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी, स्‍वस्‍त धान्‍य दुकानदार व ग्राहक मोठया संख्येने उपस्थित होते. 

Saturday, 23 December 2017

लोकराज्य शाळा- महाराष्ट्र संत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, तेर, ता...

समाजातील प्रत्येक घटकाने सैनिक व त्यांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी तत्पर राहावे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे



उस्मानाबाद,दि. 23:- जिल्ह्यास  सन 2016-17 साठी 44 लाख रुपयांचे ध्वजदिन निधीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. जिल्हयाने 113.18 टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. हे उद्दिष्ट  पूर्ण केल्याबद्दल  जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी सर्वांचे अभिनंदन करुन समाजातील प्रत्येक घटकाने सैनिक व त्यांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी तत्पर राहावे असे प्रतिपादन केले.
सन 2017 च्या  सशस्त्र सेना ध्‍वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते शुक्रवार, दि. 21 डिसेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख,  जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन सुनिल गोडबोले, कमांडर गुरुदत्त सालोखे,  राज्य  परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक  राजीव साळवे, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक रावसाहेब चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार हे उपस्थित होते .
श्री. गमे पुढे म्हणाले की, देशावरील संकटांवर मात करण्यासाठी सर्वांनीच सज्ज असणे आवश्यक असते मात्र सैनिकांमुळे आपली जबाबदारी बऱ्याच प्रमाणात कमी होते. आपण सर्वजण या सैनिकांमुळेच सुरक्षित जीवन जगत आहोत. आजी-माजी सैनिकांच्या प्रशासनिक तसेच सामाजिक कामांसाठी ते किंवा त्यांचे कुटुंबिय जेव्हा आपल्याकडे येतात तेव्हा आपण त्यांचा  योग्य तो आदर करुन त्यांना प्राधान्याने मदत करणे हे आपले कर्तव्यच आहे. आपण सर्वांनी मिळून त्यांचे प्रश्न सोडवूया.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने तसेच बिगुल वाजवून शहीदांना श्रध्दांजली वाहून करण्यात आली. यानंतर विशेष कार्यक्रम म्हणून जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी  शहिदांवर आधारित “शहीद कॅप्टन विनायक गोरे” या देशभक्तीपर एकपात्री नाटिकेचे सादरीकरण केले. या नाटिकेच्या माध्यमातून त्यांनी उपस्थितांना आवाहन केले की, आपण देशाची सेवा ही कोणत्याही माध्यमातून करु शकतो, त्यासाठी फक्त प्रामाणिक इच्छाशक्ती हवी.   
प्रास्ताविकात बोलताना जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन सुनिल गोडबोले म्हणाले की ,  परकीय आक्रमणापासून  देशाचे  संरक्षण  करताना , अंतर्गत शांतता  व सुव्यवस्था प्रस्थापित करताना शूर सैनिक  स्वत:च्या  परिवारापासून  हजारो मैल अंतरावर राहून देशसेवा करीत  असताना कित्येक सैनिक हुतात्मे होतात तसेच त्यांना अपंगत्व येते . अशा या शूर  सैनिकांबद्दल  कृतज्ञता  व सद्भावना  व्यक्त  करुन त्यांचे ऋण  फेडण्याच्या उदात्त  भावना व्यक्त   करण्यासाठी  सशस्त्र  सेना ध्वजदिन  निधी  संकलित करुन सैनिकांच्या  कल्याणकारी  योजना  या निधीतून राबविण्यात  येतात. अशा या  सैनिकांच्या व राष्ट्राचा मानबिंदू  असणाऱ्या  ध्वजाचा ध्वजदिन निधी संकलन दरवर्षी करण्यात येते .  याचे औचित्य साधून शहीद सैनिकांना  यावेळी श्रध्दांजली वाहण्यात आली. कॅप्टन सुनिल गोडबोले  यांनी ध्वजदिनाचे महत्व तसेच जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांविषयी उपस्थितांना माहिती सांगितली. 
यावेळी उस्मानाबाद जिल्ह्यातील शहीद  वीरांच्या वीरपत्नी, वीरमाता  व वीरपिता  यांचा तसेच ध्वजनिधी उद्दिष्टपूर्तीचे सर्वोत्कृष्ट काम केल्याबद्दल जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख आणि विविध कार्यालयप्रमुखांचा शाल, श्रीफळ  व स्मृती चिन्ह देऊन   विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी सैनिकांना व त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या गरजेनुसार विविध बाबींसाठी अर्थसहाय्याचे धनादेश वितरण करण्यात आले.  यामध्ये दिनांक 01 डिसेंबर 2017 पर्यंत जिल्हा सैनिक कार्यालयातर्फे 01 लाभार्थ्यांस 75 हजार, मुलीच्या विवाहासाठी 03 लाभार्थ्यांना 20 हजार, अंत्यविधीसाठी 10 लाभार्थ्यांना 65 हजार, एस टी पास प्रवास खर्चासाठी 10 लाभार्थ्यांना 32 हजार 274, मतिमंद पाल्य 01 लाभार्थ्यांस 3 हजार 600, शालेय शिक्षण मदत 01 लाभार्थ्यांस 2 हजार 400, महाविदयालयीन शिक्षण मदत  03 लाभार्थ्यांना 23 हजार,  व्यवसायीक शिक्षण मदत 19 लाभार्थ्यांना 2 लाख 84 हजार, शिष्यवृत्ती विद्यावेतन 5 लाभार्थ्यांना 10 हजार 500, MSCIT खर्च प्रतिपूर्ती  1 लाभार्थ्यांस 2 हजार 500, सैनिकी शाळेच्या खर्चाकरीता 1 लाभार्थ्यांस 32 हजार, अशासकीय कर्मचारी वेतन 5 लाभार्थ्यांस 59 हजार 725, सेवापूर्व प्रशिक्षण मदत 1 लाभार्थ्यांस 2 हजार  अशा प्रकारे आर्थिक मदतीचे वाटप करण्यात आले.  
यावेळी जिल्हा परिषदेचे  मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते यांनी शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या बरोबरीनेच समाजातील विविध घटकांनीही सशस्त्र सेना ध्वजदिन निधीसाठी चांगले योगदान द्यावे, असे आवाहन उपस्थितांना केले.
पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी सैनिकांसाठी आपण एका विशिष्ट दिवशीच महत्व न मानता कायमच आपल्या मनात त्यांच्याविषयी आदर असावा आणि त्यांना शक्य होईल ती मदत करण्याची भावना असावी असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी शेंडगे यांनी केले तर आभार प्रदर्शन एम.एच. वाघमारे यांनी केले.
या कार्यक्रमास जिल्ह्यातील विविध कार्यालयाचे  कार्यालय प्रमुख व त्यांचे प्रतिनिधी , माजी सैनिक संघटना, नागरिक, माजी सैनिक -विधवा बहुसंख्येने उपस्थित होते. शेवटी या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.  

Tuesday, 19 December 2017

मोठी स्वप्न उराशी बाळगून एकजुटीने मोठे व्हा खासदार सचिन तेंडुलकर


उस्मानाबाद,दि.19:-  सचिन….सचिन….सचिन….सचिन…… या आवाजाने अवघे डोंजा गाव दुमदुमले होते.  निमित्त होते मास्टर-ब्लास्टर, भारतरत्न सचिन तेंडुलकर यांची डोंजा गावास आजची भेट.  डोंजा ग्रामस्थांनी सचिनच्या स्वागतासाठी प्रत्येक घरावर गुढी उभारली होती, दारात रांगोळया सजल्या होत्या तसेच गावच्या वेशीत भव्य कमान उभारण्यात आली होती.
केंद्र शासनाच्या सांसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत डोंजा गावाची  निवड करण्यात आली, सचिन तेंडुलकर उस्मानाबाद जिल्हयातील परंडा तालुक्यातील दत्तक घेतलेल्या डोंजा गावाच्या दौऱ्यावर आज आले असताना गावकऱ्यांनी मोठी स्वप्न उराशी बाळगून एकजुटीने मोठे व्हा असे प्रतिपादन त्यांनी  येथे केले.
या कार्यक्रमातील मुख्य सभेत गावकऱ्यांशी संवाद साधताना श्री. तेंडुलकर यांनी डोंजा ग्रामस्थांना आवाहन केले की, मोठयांचा आदर करावा. मनात चांगले विचार असले की, आपल्याकडून कामेही चांगलीच होतात. मोठयांच्या आशिर्वादाने आपल्याकडून निश्चित चांगली कामे होऊ शकतात त्यामुळे सर्वांनीच आपल्या गावच्या विकासाचे ध्येय ठेऊन एकजुटीने डोंजा गावाची ओळख एक आदर्श  गाव म्हणून मिळवण्याचा प्रयत्न करुया असे बोलून त्यांनी समस्त ग्रामस्थांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या योजनेंतर्गत व्यायामशाळा, सौर उर्जा उपकरणांची सुविधा उपलब्ध करुन देणे, भूमिगत गटार व्यवस्थापन, खेळांसाठी मैदानाची उपलब्धता, शौचालयाचे बांधकाम, राजीव गांधी भवनाची निर्मिती, पोल्ट्री फार्म, शेळया मेंढया व जनावरांची तपासणी मोहीम, ठिबक सिंचन संच बसविणे, गावकऱ्यांची आरोग्य तपासणी शाळांमध्ये ई-लर्निंग सुविधा व संगणक कक्ष स्थापन करणे, आधार नोंदणी, शेतकऱ्यांचे निर्माण, रस्ता डांबरीकरण इत्यादी कामे केली जाणार आहेत.  या संपूर्ण विकासकामांसाठी एकूण निधी 8 कोटी 65 लाख 25 हजार रुपये उपलब्ध आहे. 
या कार्यक्रमात सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते सायन्स  व्हिलेज प्रशिक्षणाकरीता चेन्नई येथे गेलेल्या मुलींना प्रमाणपत्र, प्रौढ साक्षरता प्रमाणपत्र तसेच लोकराज्य बचतगट, लोकराज्य गणेश मंडळ या लोकराज्य पुरस्काराचेही वितरण करण्यात आले त्याचबरोबर बचतगटाच्या 100 महिलांनी अवयवदानाचा संकल्प केल्याबाबत प्रातिनिधीक स्वरुपात डोनर कार्ड देऊन दोन महिलांचा सत्कार करण्यात आला.  
केंद्र शासनाच्या सांसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत दत्तक घेतलेल्या गावातील विकासकामांची पाहणी करण्यासाठी ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकर मंगळवारी उस्मानाबाद जिल्ह्यातील डोंजा (ता. परंडा) येथे आले असताना ग्रामस्थांनी त्यांचे ढोल ताशाच्या तसेच टाळ-मृदुंगाच्या गजरात जंगी स्वागत केले. सचिनच्या आगमनाच्या वेळी डोंजा ग्रामस्थांबरोबरच जिल्ह्यामध्येही उत्सुकता असल्याने संभाव्य गर्दीचा अंदाज घेऊन प्रशासनाबरोबर पोलिसांनीही तयारी करत, कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता.
क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर मंगळवारी दि. 19 डिसेंबर रोजी सकाळी पुण्यातून हेलिकॉप्टरने डोंजा येथे आला. सकाळी साडेअकरा वाजता डोंजा येथे पोहोचल्यानंतर सर्वप्रथम ते जिल्हा परिषद शाळेतील क्रिकेट ग्राऊंडवर विद्यार्थ्यांसोबत क्रिकेट खेळले आणि शाळेतील विद्यार्थ्यांशी संवादही साधला. नंतर त्यांनी गावातील पाणीपुरवठा योजनेच्या कामाचे उदघाटन केले. त्यानंतर गावातील धार्मिक स्थळांना भेट देऊन  दर्शनही घेतले.
खासदार निधीतून गावामध्ये सद्यस्थितीत चार कोटी रुपयांची कामे प्रगतीपथावर आहेत. यामध्ये शाळा, पाणीपुरवठा योजनेबरोबर रस्त्यांचीही कामे होत आहेत. यातील काही कामांची सुरुवात सचिन तेंडुलकरच्या हस्ते आज झाली तर कामांची सुरुवात झालेल्या काही  प्रकल्पांनाही त्यांनी यावेळी भेट दिली. याप्रसंगी सचिन तेंडुलकर यांनी ग्रामस्थांशीही मुक्त संवाद साधला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले.

यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, भूमचे प्रांताधिकारी स्वप्नील मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सिध्देश्वर धुमाळ, जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, शिक्षणाधिकारी सचिन जगताप, औदुंबर उकिरडे, जिल्हा परिषद महिला व बाल विकास अधिकारी श्री. निपाणीकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. आघाव, जिल्हा अवयवदान समन्वय अधिकारी डॉ. गजानन परळीकर,  जिल्हा क्रिडा अधिकारी संजय महाडीक, तहसिलदार अनिल हेळकर, गट विकास अधिकारी श्री. नलावडे, सरपंच संध्या सुर्यवंशी, प्रख्यात क्रिकेट समालोचक सुनंदन लेले, उदय भालेराव यांची प्रमुख उपस्थिती तसेच समस्त डोंजा ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.  

Tuesday, 12 December 2017

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना उस्मानाबाद जिले के 34 हजार 599 किसानों का 175 करोड 10 लाख रुपयों का कर्ज माफ


उस्मानाबाद, दि. 12 : राज्य सरकार ने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना का निर्णय लेकर कर्जदार किसानों के जीवन के दु:खो का भार हलका करने का प्रयास किया है ।  इस योजना के अंतर्गत पात्र किसानों के 1 लाख 50 हजार रुपयों तक तो नियमित रुप से कर्ज अदा करनेवाले किसानों को प्रोत्साहन पर रक्कम देने के लिए सरकार प्रयत्नशील है ।  उस्मानाबाद जिले मे कुल 82 हजार 538 किसान इस योजना के अंतर्गत पात्र ठहरे है । इसमे से अभी तक 34 हजार 599 किसानों को 175 करोड 10 लाख  47 हजार 294 रुपये कर्जमाफी दी गई है । जिले मे डिसेंबर, 2017 से प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण की सुरुवात हुई है और यह आखरी चरण मे है । 
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना के अंतर्गत उस्मानाबाद जिले के अनियमित रुप से कर्ज अदा करनेवाले  कुल 23 हजार 129  किसानों के खातों मे 148 करोड 90 तथा प्रोत्साहनपर कर्जदार कुल 11 हजार 470 किसानों के खातो मे 26 करोड 19 लाख रुपये जमा किए गए है ।  
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना के अंतर्गत किसानों की कर्जमाफी के ऑनलाईन आवेदन करने के बाद प्रशासन और बँक के स्तर पर कर्जो की जांच करके सूचना एवम तंत्रज्ञान विभाग की ओरसे पात्र लाभार्थी किसानों की ग्रीन लिस्ट बँकों को दी गई है । इस लिस्ट के अनुसार बँको की ओर से संबंधित किसानों के खातों मे कर्जमाफी और प्रोत्साहनपर फायदे की रकम हस्तांतरीत की गई है । जिन किसानों कर्जमाफी और प्रोत्साहन पर रकम का फायदा बँको की ओर से सीधे तोर पर दिया जा रहा है । उन्हे बँक की ओर से किसानों के नोंदणीकृत टेलिफोन से एसएमएस भेजा जाएगा ।  
जिन किसानों की ऑनलाईन आवेदन भरते समय या बँक की जानीब से कर्ज के बारे में जानकारी भरते समय कुछ गलतियॉं  हो गई हो ऐसे किसानों को जानकारी तहसील स्तरीय समिती की निगराणी में दुरुस्त करने काम हो रहा है ।  जिसके फलस्वरुप बाकी बचे हुए सभी पात्र किसान इस योजना से वंचित नही रहेंगे ।  साथही किसानों इस योजना का पुरी तरह से फायदा देने के लिए सरकार और प्रशासन की ओर से पुरी सावधानी बरती जा रही है ।  

Loan waiving benefits 82,538 farmers of the district to the tune of Rs. 175.10 crore.


Osmanabad, Dec 12, 2017:  Under the  Chhatrapati Shivaji Maharaj Shetkari Samman Yojana, the Osmanabad District Central Cooperative Bank’s 34599 farmers’  loan has been waived off by the State Govt  in  a historical   decision.
The State Govt.  has transferred  Rs. 175.10 crore  to  34599  farmers’ bank accounts. These farmers  at present have been  found suitable for loan waiving in the district.  This was  disclosed by the ODCC Bank’s MD Vijay Ghonse Patil. He said that  of the Rs. 175.10 crore, Rs. 148.90 crore  have been transferred to 23129   loan holders’ bank accounts and Rs. 26.19 crore  will be transferred to   11470 incentive  loan holders.
     Under the loan waiving scheme,  three green lists have  been declared, 82,538 farmers have been, after verification, found suitable for loan waiving.  These qualified farmers have been  so far  waived off farm loan to the tune of Rs. 175Crores 10 lacs 47 thousand 294

Under the  Chhatrapati Shivaji Maharaj  Shetkari Samman Yojana,  the farmers who had availed  farm loans from the ODCC Bank and nationalized banks, the State Govt. has so far transferred Rs. 19,000 crore in the bank accounts of 41 lakh farmers in the state.  In all 77 lakh farmers had applied for loan waiving. After verification, 69 lakh farmers have been found suitable  for loan waiving.  The process of  transferring loan amount of these farmers is underway in the state.  It is learnt that the State Govt. will  even waive farm loan of the   farmers who have not applied for loan waiving. Un to the last is the aim of the government for loan waiving.

उस्मानाबाद जिल्ह्यातील कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या ...

उस्मानाबाद जिल्ह्यातील कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या बोलक्या प्रतिक्रिया








उस्मानाबाद,दि.12:- छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अर्थात राज्यातील ऐतिहासिक कर्जमाफी अंतर्गत उस्मानाबाद जिल्हयातील श्री. सिध्देश्वर अर्जुन शेलार, रा. मेडसिंगा, ता. जि. उस्मानाबाद यांची रु. 81 हजार 560 छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफी झाली, या कर्जमाफीमुळे त्यांच्या जीवनाला वेगळे वळण मिळाले, या कर्जमाफीमुळे थोडे-फार सुधारण्याची संधी उपलब्ध झाली.  कर्जमाफी शासनानं योग्य आणि चांगली दिली आहे त्यामुळे शासनाचे आभार व्यक्त केले आहेत.
तसेच श्री. दिपक तुकाराम रणदिवे, रा. सारोळा, ता. जि. उस्मानाबाद यांची रु. 7 हजार 513 छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफी झाली, कर्जमाफी शासनानं केल्यामुळे शासनाचे आभार व्यक्त केले आहेत. 
तर सारोळा बु. ता. जि. उस्मानाबाद येथील  श्री. प्रमोद आंबऋषी कठारे, यांची   रु. 10 हजार 580 छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफी झाली, कर्जमाफीचा शासनानं घेतलेला निर्णय योग्य आहे. अल्पभूधारक, गोर-गरीब शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली आहे. आत्तापर्यंत अशी कर्जमाफी झालीच नव्हती. त्यामुळे शासनाचे आभार व्यक्त केले आहेत. 
उस्मानाबाद तालुक्यातील काजळा येथील श्री. पांडूरंग तुकाराम झामणे, यांची रु. 96 हजार 627 छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफी झाली, यांना 07 एकर शेती असून कर्जमाफीचा शासनानं घेतलेला निर्णय कळाल्यानंतर यांना आनंद झाल्याने त्यांनी साखर वाटून शासनाचे आभार व्यक्त केले आहेत.
तसेच श्री. दामोदर भाऊ ढवण, रा. काजळा, ता. जि. उस्मानाबाद यांची रु. 30 हजार 576 छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफी झाली, यांना 01 हेक्टर 88 आर शेती असून शासनाने कर्जमाफीचा निर्णय घेतल्यामुळे आनंद व्यक्त केला आहे.   
तर श्री. सुजित चंद्रसेन शेंडगे, रा. काजळा, ता. जि. उस्मानाबाद यांची रु. 24 हजार 126 छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफी झाली, त्यांनी शासनाने कर्जमाफीचा निर्णय घेतल्यामुळे आभार व्यक्त केले आहेत.
आणि श्री. बालाजी दौलतराव पाटील, रा. देवळाली, ता. जि. उस्मानाबाद यांची रु. 17 हजार 318 छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफी झाली, शासनाने कर्जमाफीचा निर्णय घेतल्यामुळे आभार व्यक्त केले आहेत.

अशा प्रकारे शासनाने घेतलेल्या कर्जमाफी योजनेचा जिल्हयातील विविध शेतकऱ्यांनी आपल्या बोलक्या प्रतिक्रियांद्वारे मनोगत व्यक्त करुन शासनाचे आभार मानले आहेत.    

उस्मानाबाद जिल्ह्यात 34 हजार 599 शेतकऱ्यांना 175 कोटीची 10 लाखाची कर्जमाफी


उस्मानाबाद,दि.12:- छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अर्थात राज्यातील ऐतिहासिक कर्जमाफी अंतर्गत पात्र कर्जदार असलेल्या  34 हजार 599  शेतकऱ्यासाठी आतापर्यंत  शेतकऱ्यांना 175कोटी 10 लाख रुपयांचा कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. त्यापैकी थकबाकी कर्जदार 23 हजार 129 शेतकऱ्यांसाठी 148 कोटी 90 लाख रुपये तर प्रोत्साहनपर कर्जदार 11 हजार 470 शेतकऱ्यांसाठी 26 कोटी 19 लाख रुपये रक्कम कर्जदार शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.
            छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत विविध राष्ट्रीयकृत व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्जदार असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील कर्जमाफीस पात्र शेतकऱ्यांच्या आतापर्यंत तीन ग्रीन यादया जाहीर  झाल्या आहेत. जिल्ह्यातील 82 हजार 538 शेतकरी या योजनेंतर्गत पात्र ठरले आहेत. यात पात्र कर्जदार शेतकऱ्यांना आतापर्यंत 175 कोटी 10 लाख 47 हजार 294 रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले आहे.

            छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत आतापर्यंत राज्यात साधारण41 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 19 हजार कोटी रुपयांची रक्कम बँकांकडे वर्ग करण्यात आली असून  या योजनेंतर्गत 77 लाख अर्ज प्राप्त झाले असून  छाननीअंतर्गत डुप्लिकेशन झालेले खाते दूर करुन 69 लाख खात्यांवर कर्जमाफीची रक्कम जमा करण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली असून त्यापैकी जवळपास41 लाख खात्यांमध्ये कर्जमाफीचे अनुदान देण्यासाठी राज्य शासनाकडून बँकांकडे सुमारे 19 हजार कोटी रुपये इतका निधी हस्तांतरित करण्यात आले असून जे शेतकरी पात्र होते पण अर्ज केला नाही अशा शेतकऱ्यांनाही या योजनेत सामावून घेणार येणार असून  शेवटच्या पात्र शेतकऱ्याला मदत मिळेपर्यंत ही योजना सुरु ठेवली जाईल. 

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या बाईट

Thursday, 7 December 2017

अर्जुन मस्के आणि उषा मस्के यांच्या जीवनाचा डोळस प्रवास…

आशाताईंना त्यांच्या कामामध्ये उत्साह व प्रेरणा मिळावी म्हणून जननी सखी योजनेचा शुभारंभ-जिल्हा परिषद उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील



 उस्मानाबाद, दि.7 :- आरोग्य विषयक विविध योजना व सेवांचा लाभ तळागळातील सर्व सामान्यपर्यंत पोहचविण्याचे काम आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून जिल्हाभर सुरु असून या आशाताईंना त्यांच्या कामामध्ये उत्साह व प्रेरणा मिळावी म्हणून जननी सखी योजनेचा शुभारंभ उस्मानाबाद जिल्हा परिषदेने राज्यात प्रथम केला आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील यांनी आज येथे केले.

जिल्हा परिषदेच्या वतीने पुष्पक मंगल कार्यालय येथे जननी सखी योजनेचा शुभारंभ व आशा दिन जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. प्रारंभी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नेताजी पाटील यांच्या हस्ते कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन करुन उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापती सौ.चंद्रकला नारायणकर, जिल्हा परिषद सदस्य सर्वश्री महेंद्र धुरगुडे, अभिमान्यू शितोळे, अस्मिता कांबळे, सुरेखा जाधव, शितलताई  पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष कोलते, आरोग्य उपसंचालक श्री.व्ही.एम. कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एकनाथ माले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हनुमंत वडगावे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी पुढे बोलताना उपाध्यक्षा सौ. पाटील म्हणाल्या की, सद्यस्थितीत केंद्र शासनाची जननी सुरक्षा योजना कार्यरत आहे. यात एससी, एसटी व दारिद्रय रेषेखालील गरोदर महिलेस व तिची काळजी घेणारे आशांना 600 रुपये मदत मिळते पण इतर गरोदर मातांच्या बाबतीत आशांना मदत मिळत नाही म्हणून जिल्हा परिषदेच्या स्वनिधी मधून जननी सखी योजना सुरु करणारी उस्मानाबाद जिल्हा परिषद ही राज्यातील पहिली आहे. या योजनेंतर्गत कोणत्याही जाती धर्माच्या महिलांची शासकिय दवाखान्यात प्रसुती झाल्यास आशाताईना 300 रुपये मानधन देण्यात येणार आहे. यामुळे शासकिय दवाखान्यातील प्रसुतीचे प्रमाण ही वाढेल व जिल्ह्यातील बालमृत्यू व मातामृत्यू रोखण्यास मदत होवून लिंग गुणोत्तर वाढण्यास मदत होईल.

आरोग्य विषयक विविध योजना व सेवांचा लाभ तळागळातील सर्व सामान्यपर्यंत पोहचविण्या बरोबरच आशाताईनी  आरोग्य सखी म्हणून ही काम करावे, असे ही त्यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नेताजी पाटील यावेळी बोलतांना म्हणाले की, आशा स्वयंसेविका यांनी गावातील दुर्धर आजाराची माहिती आरोग्य विभागाकडे पोहंचविण्याचे काम करावे, त्यामुळे आशा दुर्धर आजारी रुग्णांना शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून उपचार मिळवून देण्यात येतील. त्याचबरोबर आशाताईंनी स्वच्छ भारत मिशन योजनेच्या माध्यमातून शंभर टक्के गाव हागणदारी मुक्तीसाठी प्रयत्न करावेत. आशाताईना 500 रुपये मानधनासाठी ही प्रयत्न करण्यात येतील असे सांगितले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कोलते यांनी यावेळी आरोग्य सेवा बळकट होईल यासाठी सर्वांनी काम करावे असे सांगितले.

यावेळी जिल्ह्यातील उत्कृष्ट काम केलेल्या आशा, गट प्रवर्तक, तालुका समुह संघटक यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. आरोग्य उपसंचालक कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.माले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वडगावे यांनी केले तर सुत्रसंचालन जिल्हा समुह संघटक सतिष गिरी यांनी केले तर आभार प्रदर्शन जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.कुलदिप मिटकरी यांनी केले. या कार्यक्रमास जिल्हाभरातील आशा स्वयंसेविका, गट प्रवर्तक मोठया संख्येने उपस्थित होत्या.

Thursday, 30 November 2017

जागतिक एड्सदिनानिमित्त जिल्हा रुग्णालयात विविध कार्यक्रम संपन्न




उस्मानाबाद,दि.30:-  मानसिक, शारिरिक, सामाजिक, आर्थिकदृष्टया समाधानी असणे म्हणजे आरोग्य चांगले असणे होय, असे प्रतिपादन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एकनाथ माले यांनी आज केले.
जागतिक एड्स दिनानिमित्त जिल्हा रुग्णालयात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.माले बोलत होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे  म्हणून जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप व तहसिलदार राजकुमार माने  यांची उपस्थिती होती. यावेळी  अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्री. गलांडे,  आयएमए सदस्य डॉ.राजगुरू, फोग्सीचे सदस्य डॉ. सुशिलकुमार सरडे,  निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रताप शिंदे, डॉ. जिंतूरकर,  डॉ.नीता चौगुले, डॉ.पोळ, डॉ.जाधव आदीची उपस्थिती होती.
यावेळी  पुढे बोलताना डॉ.माले म्हणाले की, अनेक रोगाचा आपण नायनाट करु शकलो याचे श्रेय समाजातील सर्वच नागरिकांना आहे. नुसत्या घोषणा करुन चालणार  नाही त्याला प्रत्यक्ष कृतीची जोड दयावी. काम करताना काळजी घ्यावी, संसर्ग होवू नये म्हणून काळजी घ्यावी, बायोमेडिकल वेस्ट योग्यरित्या त्याची विल्हेवाट लावावी. चांगल्या कामांना मनापासून करण्याचा प्रयत्न करावा.व्यसनापासून दूर राहावे, स्वच्छतेची कास धरा व इतरांनाही प्रोत्साहित करा,त्याचबरोबर प्रत्येकाने दरवर्षी आपली आरोग्य तपासणी करुन घ्यावी.
आरोग्य विभागाच्या विविध उपक्रमात सहभाग नोंदविल्याबद्दल रिक्षाचालकांचे विशेष कौतुक डॉ.माले यांनी यावेळी केले.
यावेळी तहसिलदार श्री. माने यांनी शासकीय आरोग्य योजनांची माहिती घेवून जागरुक व्हावे आणि सकारात्मक जीवन जगावे, असे सांगितले.
            निवासी वैद्यकीय अधिकारी श्री.शिन्दे यांनी एचआयव्हीबाधितांना प्रशासनाने त्रस्त कुटूंबात समाविष्ट करुन त्यांना विविध शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यात हा जिल्हा पहिला असल्याबद्दल जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांचे त्यांनी आभार व्यक्त केले.
या कार्यमानंतर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची जनजागरण  फेरी काढण्यात आली. या फेरीला उत्तम प्रतिसाद मिळाला. उपस्थित मान्यवरांनी जनजागरण रॅलीस हिरवा झेंडा दाखवून रॅलीचा प्रारंभ केला. विविध  नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनी, डॉक्टर्स, नर्सेस व इतर कर्मचारी या फेरीत सहभागी झाले होते. एड्स दिनानिमित्त विद्यार्थ्यांना  सामुहिक शपथ देण्यात आली. प्रारंभी सर्व यांच्या हस्ते धन्वंतरीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश काकडे यांनी केले तर आभार डॉ.नीता चौगुले यांनी व्यक्त केले.सुत्रसंचलन संतोष पोतदार यांनी केले. या कार्यक्रमास विविध महाविद्यालयातील विद्यार्थी मोठया संख्येने सहभागी झाले होते. 

“लोकराज्य” मासिकाचे सभासदत्व घेऊया, विकासाच्या वाटेवर निघूया…

Wednesday, 22 November 2017

“वाचाल तर वाचाल” हे केवळ सुभाषितापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष कृतीत उतरावे -माजी मंत्री प्रा.लक्ष्मण ढोबळे






उस्मानाबाद.दि.22:-  ग्रंथांच्या माध्यमातून संतांनी आपला समाज घडविला. अध्यात्मातून मन घडविले गेले, खऱ्या रुपाने पुस्तकातून आपल्याला मार्गदर्शन मिळते, मात्र वाचाल तर वाचाल हे केवळ सुभाषितापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष कृतीत उतरावे, असे प्रतिपादन माजी मंत्री प्रा.लक्ष्मण ढोबळे यांनी व्यक्त केले.
आनंदनगर येथील सांस्कृतिक सभागृह येथे महाराष्ट्र शासनाचा उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, उस्मानाबाद  यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘ग्रंथोत्‍सव- 2017’ च्या समारोप प्रसंगी श्री. माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे बोलत होते.
यावेळी जिल्हा कोषागार अधिकारी श्री विशाल पवार, अप्पर कोषागार अधिकारी श्री. आप्पासाहेब पवार, नायब तहसिलदार श्री. संतोष पाटील, पराग कोडगुले, जिल्हा ग्रंथालय संघ अध्यक्ष श्री.व.ग.सुर्यवंशी, जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री.अ.वा.सुर्यवंशी, श्री. के. व्ही. सरवदे, ॲङ वा.मा. वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती. 
यावेळी पुढे बोलताना श्री. ढोबळे म्हणाले की, ग्रंथाच्या माध्यमातून संतानी आपला समाज घडविला. अध्यात्मातून मन घडविले गेले, खऱ्या रुपाने पुस्तकातून आपल्याला मार्गदर्शन मिळते. वाचकाची आवडनिवड बदलते आहे, त्यानुसार पुस्तकांची गरजही निर्माण झाली आहे. आजच्या इंटरनेट जगात ई-बुकच्या माध्यमातून वाचक आपली वाचनाची भूक भागवित आहेत. पत्रकारितेच्या माध्यमातून समाजप्रबोधन घडते. लेखकाच्या प्रतिभेतून आईची मायाचा पाझरत असते. यातून ग्रंथ चळवळ मोठी व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करुन यासाठी साताऱ्यातील भिलार या पुस्तकाच्या गावाचे अनुकरण करावे असेही त्यांनी सांगितले.
भूतकाळाची ओळख, वर्तमानात काय घडतय आणि भविष्यात काय घडणार आहे हे सप्रमाण सांगण्याची ताकद पुस्तकातच आहे. पालकांनी आपल्या मुलांच्या हातात मोबाईल न देता त्यांच्यावर संस्कार करणारे एखादे पुस्तक पुस्तक दयावे,असेही प्रा.ढोबळे यांनी सांगितले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हा ग्रंथालय संघ अध्यक्ष श्री.व.ग.सुर्यवंशी, जिल्हा कोषागार अधिकारी श्री. विशाल पवार, ग्रंथ चळवळीतील कार्यकर्ता तसेच पत्रकार सुभाष पाटोळे यांनीही आपले मनोगत यावेळी व्यक्त केले. 
कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली. कार्यक्रमाचे आभार श्री.डेंगळे यांनी व्यक्त केले. सूत्रसंचलन श्री. ज्ञानेश्वर पाटील आणि अभिलाष लोमटे यांनी केले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट कार्य करणाऱ्या तालुका ग्रंथालय कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी ग्रंथप्रेमी, साहित्यप्रेमी, विद्यार्थी, ग्रंथचळवळीतील कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. 

Tuesday, 21 November 2017

मूल्यांना संवर्धित करणारे ग्रंथ असावेत -जेष्ठ साहित्यिक भास्कर चंदनशिव

मूल्यांना संवर्धित करणारे ग्रंथ असावेत - जेष्ठ साहित्यिक भास्कर चंदनशिव





            उस्मानाबाद. दि.21:- साहित्य हे मूल्यांची जपणूक करण्यासाठी असते. साहित्य हे मूल्यांचा संघर्ष असते ते करमणूकीचे साधन नाही तर माणसाला माणूसकीच्या पातळीवर नेण्याचे काम साहित्य करते. ग्रंथ चळवळ ही मूल्यांची चळवळ आहे त्यामुळे मूल्यांना संवर्धित करणारे ग्रंथ असावेत,असे प्रतिपादन जेष्ठ साहित्यिक भास्कर चंदनशिव यांनी आज केले.
आनंदनगर येथील सांस्कृतीक सभागृह येथे महाराष्ट्र शासनाचा उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, उस्मानाबाद  यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘ग्रंथोत्‍सव- 2017’ च्या उद्घाटन प्रसंगी श्री. जेष्ठ साहित्यिक भास्कर चंदनशिव बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, उपजिल्हाधिकारी शिरीष यादव,  सहायक ग्रंथालय संचालक अ.मा. गाडेकर, जिल्हा ग्रंथालय संघ अध्यक्ष श्री.व.ग.सुर्यवंशी, जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री.अ.वा.सुर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.  प्रारंभी मान्यवरांच्या  हस्ते दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
            यावेळी पुढे बोलताना श्री.चंदनशिव म्हणाले की, पुस्तक व ग्रंथ यातील अंतर ओळखणे महत्त्वाचे आहे. मूल्यांची पाठराखण करणारे पुस्तक हे ग्रंथ पदाला जावू शकते. स्वातंत्र्य, समता, बन्धुताची पाठराखण करणारे पुस्तक ग्रंथपदापर्यंत जावू शकते.अशा प्रकारचा महोत्सव जेव्हा आपण साजरा करतो तेव्हा आपण तो ग्रंथाचा महोत्सव साजरा करत नसतो तर तेव्हा आपण माणसाच्या माणुसकीचा महोत्सव साजरा करतो.
            आजचा काळ हा संभ्रमाचा आहे एकीकडे डिजिटल तर एकीकडे नवतेचा स्वीकार करायचा का नाही हा संभ्रम आहे. शिक्षण व्यवस्था, ज्ञानव्यवस्था, अर्थव्यवस्था  असा सगळा संभ्रमाचा काळ आहे. अशा संभ्रमाच्या काळात गावेगावी चांगले ग्रंथ निघावेत, मूल्यांना संवर्धित करणारे ग्रंथ असावेत, माणसाची माणुसकी जोपासणारे असावेत, अशी चळवळ गावेगावी उभी राहावी, या चळवळीच्या शिवाय दुसरे काही करण्याची गरज नाही, खऱ्या अर्थाने अशा ग्रंथ चळवळीची गरज आहे, असे मतही श्री.चंदनशिव यांनी यावेळी व्यक्त केले.
            डिजिटल युगात असा प्रयत्न अतिश्य महत्त्वाचा आहे, विचारात वाढ होण्यासाठी, पुस्तक हे सतत व कायम राहणारा संग्रह आहे त्यामुळे ते वाढले पाहिजे, असे उपजिल्हाधिकारी श्री. यादव यांनी यावेळी सांगितले.
ग्रंथ महोत्सवाच्या उद्घाटनापूर्वी ‘ग्रंथोत्सव-2017’ निमित्त येथील जिजाऊ चौक बार्शी नाका ते सांस्कृतिक सभागृह आनंदनगर  पर्यंत ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले. या ग्रंथदिंडीत पालखी मध्ये ‘गाथा व ज्ञानेश्वरी’ हे ग्रंथ ठेवण्यात आले होता. यावेळी ग्रंथदिंडीत तहसिलदार सुजित नरहरे, सहायक ग्रंथालय संचालक अ.मा. गाडेकर,  जिल्हा ग्रंथालय संघ अध्यक्ष श्री.व.ग.सुर्यवंशी आदीसह  मोठ्या संख्येने शालेय विद्यार्थी-विद्यार्थीनी सहभागी झाले होते.
शहरातील जिजाऊ चौक बार्शी नाका या ठिकाणहून ग्रंथदिंडी निघाली. या ग्रंथदिंडी मुळे शहर ‘ज्ञानोबा-माऊली-तुकाराम’ च्या जयघोषाने दुमदुमून गेले.
            ‘ग्रंथोत्सव-2017’ निमित्त आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथ प्रदर्शनीचे उपजिल्हाधिकारी शिरिष यादव यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी सहायक ग्रंथालय संचालक अ.मा. गाडेकर, जेष्ठ साहित्यिक भास्कर चंदनशिव, जिल्हा ग्रंथालय संघ अध्यक्ष श्री.व.ग.सुर्यवंशी, जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री.अ.वा.सुर्यवंशी आदींची उपस्थिती होती. पुस्तक विक्रीचे 14 स्टॉल लावण्यात आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने उस्मानाबाद, लातूर, बीड, सोलापूर जिल्ह्यातील प्रसिध्द पुस्तक विक्रेते यांच्या बरोबरीने शासकीय मुद्रणालयाची शासकीय प्रकाशने आणि माहिती व जनसंपर्कचे लोकराज्य, महाराष्ट्र अहेड, महामानव इत्याइी पुस्तकांच्या विक्री स्टॉलचा समावेश आहे.
        कार्यक्रमाचे प्रस्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री.सुर्यवंशी यांनी केले व या ग्रंथोत्सवाच्या आयोजनाबाबतची भूमिका विषद केली तर सूत्रसंचलन श्री. अभिलाष लोमटे यांनी केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.शेंगुलवार,  जिल्हा माहिती अधिकारी श्री.सानप व जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष श्री.सुर्यवंशी यांनी मनोगत व्यक्त केले. आभार ग्रंथालयाचे श्री. डेंगले यांनी मानले. कार्यक्रमास मोठया प्रमाणात साहित्यिक, विद्यार्थी उपस्थित होते.

            बुधवार दि.22 नोव्हेंबर 2017 रोजी  सकाळी 11 ते 1 या दरम्यान कथाकथन  हा कार्यक्रम होणार आहे. दुपारी 2 ते 3 वाजता स्पर्धा परीक्षा एक आव्हान हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाचा समारोप दुपारी 3 ते 5 या कालावधीत माजी मंत्री उच्च व तंत्रशिक्षण विभाग श्री.लक्ष्मणराव ढोबळे यांच्या उपस्थितीत  होणार आहे. सायंकाळी 5 वाजता ग्रंथोत्सव सहभाग प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार आहेत.

Saturday, 18 November 2017

ग्रंथोत्सावानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन


उस्मानाबाद.दि.18:- महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई आणि जिल्हा ग्रंथालय, अधिकारी कार्यालय, उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 21 नोव्हेंबर 2017 ते दि. 22 नोव्हेंबर 2017 या कालावधीत  सांस्कृतिक सभागृह, आनंद नगर उस्मानाबाद या ठिकाणी भव्य ग्रंथ प्रदर्शन, विक्री आणि विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये दि.21 नोव्हेंबर 2017 रोजी सकाळी 9 वाजता ग्रंथदिंडी निघणार आहे. तर ग्रथोत्सव या कार्यक्रमाचे उद्‌दघाटन परिवहन, खारभूमी विकास मंत्री तथा पालकमंत्री जिल्हा उस्मानाबाद श्री.दिवाकर रावते व पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास मंत्री तथा सहपालकमंत्री जिल्हा उस्मानाबाद श्री. महादेव जानकर यांच्या हस्ते होणार आहे. जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रमुख उपस्थिती, जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील, खासदार प्रा. रविंद्र गायकवाड आमदार सर्वश्री मधुकरराव चव्हाण, राणाजगजितसिंह पाटील, ज्ञानराज चौगुले, राहुल मोटे, सतिष चव्हाण, दिलीपराव देशमुख, विक्रम काळे, सुजितसिंह ठाकूर, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील, नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार,अपर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, सहाय्यक ग्रंथालय अधिकारी गाडेकर, राज्य साहित्य संस्कृती मंडळ सदस्य भास्कर चंदनशिव आदींची उपस्थिती राहणार आहे.
            मंगळवार दि.21 नोव्हेंबर 2017 रोजी दुपारी 2 ते 4 यावेळेत वाचनसंस्कृती वाढीसाठी सार्वजनिक ग्रंथालयाचे योगदान या विषयावर परिसंवाद होणार आहे. दुपारी 4 ते 6 यावेळेत कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार दि.22 नोव्हेंबर 2017 रोजी  सकाळी 11 ते 1 या दरम्यान कथाकथन  हा कार्यक्रम होणार आहे. दुपारी 2 ते 3 वाजता स्पर्धा परीक्षा एक आव्हान हा कार्यक्रम होणार आहे.कार्यक्रमाचा समारोप दुपारी 3 ते 5 या कालावधीत माजी मंत्री उच्च व तंत्रशिक्षण विभाग श्री.लक्ष्मणराव ढोबळे यांच्या उपस्थितीत  होणार आहे.सायंकाळी 5 वाजता ग्रंथोत्सव सहभाग प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार आहेत. या ठिकाणी सकाळी 10 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत ग्रंथप्रदर्शन व विक्री होणार आहे तरी  या ग्रंथोत्सवाचा लाभ आपण सर्वांनी घ्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे व जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री. अ.वा. सुर्यवंशी यांनी केले आहे. 

जलयुक्त शिवार अभियानासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही - जलसंधारण मंत्री प्रा.राम शिंदे


उस्मानाबाद.दि.18:- दुष्काळमुक्त जिल्हा, राज्य हा आपला सर्वांचा संकल्प आहे. त्यासाठी पाण्याचा थेंब नी थेंब वाचवायचा आहे, साठवायचा आहे, यासाठी जलयुक्त शिवार अभियानचे काम चांगल्या प्रकारे चालू असून या कामासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असे  प्रतिपादन जलसंधारण मंत्री प्रा.राम शिंदे यांनी आज केले.
परंडा तालुक्यातील हिंगणगाव(बु) येथील जलयुक्त शिवार योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या सिमेंट नाला बांधाऱ्याची पाहणी त्यांनी केली गावातील यमाई देवीच्या प्रांगणात ग्रामस्थांशी संवाद साधतांना ते बोलत होते. यावेळी आमदार सुजितसिंह ठाकूर, उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे, परंडा तहसिलदार अनिलकुमार हेळकर, कार्यकारी अभियंता अनिल कांबळे, उप अभियंता श्री.मोरे, सौदार गोरे, बळीराम मारकड, तुकाराम कुरुंद, नाना कदम, पंडीत गोरे, राहुल ठोंगे, प्रविण नवले, ज्ञानेश्वर ठोंगे, राहुल कुरुंद, अमोल दरेकर, सागर ठोंगे, अनुरुद्र गोरे, विजय कुरुंद  यांच्यासह ग्रामस्थ उपस्थिती होती.
मंत्री प्रा.शिंदे म्हणाले की,  जलयुक्त शिवार अभियानचे काम चांगल्या प्रकारे चालू असून ज्या पध्दतीने जलयुक्त शिवारचे काम चालू आहे त्यातून दुष्ळाळी परिस्थिती परत निर्माण होवूच शकणार नाही, या कामासाठी अजून निधी लागला तर निधी दिला जाईल.
यावेळी आमदार श्री.ठाकूर यांनी जलयुक्त शिवार च्या माध्यमातून या जिल्ह्यात, या तालुक्यात झालेल्या कामांमुळे दुष्काळ नक्की मिटणार आहे, असा विश्वास व्यक्त केला. जलसंधारण मंत्री प्रा. शिंदे यांनी जलयुक्त च्या कामासाठी चार कोटीचा सर्वाधिक निधी मंजूर केल्याबदद्ल त्यांचे आभार व्यक्त केले.

जलसंधारण विभागांतर्गत हिंगणगाव(बु) येथील बांधण्यात आलेल्या सिमेंट नाला बंधाऱ्याची त्यांनी यावेळी पाहणी करुन जलपूजन केले.