Saturday, 18 November 2017

ग्रंथोत्सावानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन


उस्मानाबाद.दि.18:- महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई आणि जिल्हा ग्रंथालय, अधिकारी कार्यालय, उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 21 नोव्हेंबर 2017 ते दि. 22 नोव्हेंबर 2017 या कालावधीत  सांस्कृतिक सभागृह, आनंद नगर उस्मानाबाद या ठिकाणी भव्य ग्रंथ प्रदर्शन, विक्री आणि विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये दि.21 नोव्हेंबर 2017 रोजी सकाळी 9 वाजता ग्रंथदिंडी निघणार आहे. तर ग्रथोत्सव या कार्यक्रमाचे उद्‌दघाटन परिवहन, खारभूमी विकास मंत्री तथा पालकमंत्री जिल्हा उस्मानाबाद श्री.दिवाकर रावते व पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास मंत्री तथा सहपालकमंत्री जिल्हा उस्मानाबाद श्री. महादेव जानकर यांच्या हस्ते होणार आहे. जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रमुख उपस्थिती, जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील, खासदार प्रा. रविंद्र गायकवाड आमदार सर्वश्री मधुकरराव चव्हाण, राणाजगजितसिंह पाटील, ज्ञानराज चौगुले, राहुल मोटे, सतिष चव्हाण, दिलीपराव देशमुख, विक्रम काळे, सुजितसिंह ठाकूर, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील, नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार,अपर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, सहाय्यक ग्रंथालय अधिकारी गाडेकर, राज्य साहित्य संस्कृती मंडळ सदस्य भास्कर चंदनशिव आदींची उपस्थिती राहणार आहे.
            मंगळवार दि.21 नोव्हेंबर 2017 रोजी दुपारी 2 ते 4 यावेळेत वाचनसंस्कृती वाढीसाठी सार्वजनिक ग्रंथालयाचे योगदान या विषयावर परिसंवाद होणार आहे. दुपारी 4 ते 6 यावेळेत कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार दि.22 नोव्हेंबर 2017 रोजी  सकाळी 11 ते 1 या दरम्यान कथाकथन  हा कार्यक्रम होणार आहे. दुपारी 2 ते 3 वाजता स्पर्धा परीक्षा एक आव्हान हा कार्यक्रम होणार आहे.कार्यक्रमाचा समारोप दुपारी 3 ते 5 या कालावधीत माजी मंत्री उच्च व तंत्रशिक्षण विभाग श्री.लक्ष्मणराव ढोबळे यांच्या उपस्थितीत  होणार आहे.सायंकाळी 5 वाजता ग्रंथोत्सव सहभाग प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार आहेत. या ठिकाणी सकाळी 10 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत ग्रंथप्रदर्शन व विक्री होणार आहे तरी  या ग्रंथोत्सवाचा लाभ आपण सर्वांनी घ्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे व जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री. अ.वा. सुर्यवंशी यांनी केले आहे.