Thursday, 26 December 2019

महामहीम राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी घेतले आई तुळजाभवानीचे दर्शन

वृत्त क्र:- 815                             दि.26 डिसेंबर 2019
*महामहीम राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी घेतले आई तुळजाभवानीचे दर्शन*
उस्मानाबाद,दि.26,(जिमाका)- महामहीम राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज महाराष्ट्राची कुलदेवता आई श्रीतुळजाभवानी मातेचे मनोभावे दर्शन घेतले. 
      यावेळी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन, उपविभागीय अधिकारी रामेश्वमर रोडगे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. टिपरसे, तहसिलदार सौदागर तांदळे, योगिता कोल्हे, नगरपालिका मुख्याधिकारी आशिष लोकरे,मंदिर प्रशासनाचे श्री. झंपलवाड, श्री.इंतूले, श्री. गणेश मोटे आदींची उपस्थिती होती.


महसूल कर्मचाऱ्यांनी केली घनवनाची सफाई आणि घेतला सहभोजनाचा आनंद


    वृत्त क्र:- 811                                                                            दि.26 डिसेंबर 2019
    रयतच्या महाविद्यालयीन प्रश्नमंजूषा / वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन
उस्मानाबाद,दि.26(जि.मा.का):- दरवर्षीप्रमाणे रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर विद्याप्रबोधिनीमार्फत जानेवारी-2020 मध्ये महाविद्यालयीन प्रश्नमंजूषा व वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन केले आहे.
प्रश्न मंजूषा स्पर्धा-स्थळ एस. एम. जोशी कॉलेज, हडपसर, पुणे (0202699001/9730587831) कालावधी- दि.16 ते 18 जानेवारी 2020, पारितोषिके-अनुक्रमे रु.10 हजार, 9 हजार, 8 हजार, 7 हजार, व 6 हजार असे आहे.
वक्तृत्व स्पर्धा-स्थळ यशवंतराव चव्हाण इन्स्टिटयूट ऑफ सायन्स,सातारा (02162-231074/9850555938) कालावधी-22 ते 24 जानेवारी 2020, पारितोषिके-अनुक्रमे- रु.15 हजार,10 हजार, 5 हजार, तसेच सन्मानार्थ रु.3 हजार दहा पारितोषिके या दोन्ही स्पर्धाचे नियम, अटी, इ. माहिती www.erayat.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत, असे कार्यकारी संचालक, प्रा. आर. के. शिंदे यांनी केले आहे.
                                               *****
                                         ****

वृत्त क्र:- 812
कौशल्य विकास विभागामार्फत शिकाऊ उमेदवारी योजनेंतर्गत होणाऱ्या
अखिल भारतीय व्यवसाय परीक्षेचे (AITT) वेळापत्रक जाहीर
       उस्मानाबाद,दि.26(जि.मा.का):- कौशल्य विकास व उद्योजकता विभाग यांच्यामार्फत होणारी जानेवारी/ फेब्रुवारी 2020 या सत्रातील 110 वी शिकाऊ उमेदवारी योजनेंतर्गत (ATS) अखिल भारतीय व्यवसाय परीक्षेचे (AITT) वेळापत्रक www.apprcnticeship.gov.in  या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. त्यानुसार ज्या प्रशिक्षणार्थ्यांचे करारपत्र दि.30 ऑक्टोबर 2019 पूर्वी संपत आहेत,अशा सर्व नियमित / रिपिटर प्रशिक्षणार्थ्यांनी ऑनलाईन आवेदन तसेच परीक्षा शुल्क www.apprcnticeship.gov.in या संकेतस्थळावर भरावे.
ही कार्यवाही करावयाची अंतिम तारीख दि.04 जानेवारी 2020 आहे. तसेच ऑनलाईन व परीक्षा शुल्क भरल्याची पावती ही BTRI Osmanabad या कार्यालयात दि.04 जानेवारी 2020 पर्यंत जमा करावी. जे प्रशिक्षणार्थी सध्या अप्रेंटिसशिप करीत आहेत किंवा अप्रेंटिसशिप झालेली आहे,अशा सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी अप्रेंटिसशिप व्हेरीफिकेशन त्वरीत करुन घ्यावे. याबाबतचे युजर मॅन्युअल वरील संकेतस्थळावर न्यूज व अपडेटस या सदराखाली देण्यात आले आहे,असे संस्थेचे सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार श्री. सचिन सूर्यवंशी यांनी कळविले आहे.
                                           
****
वृत्त क्र:- 813
महाराष्ट्र राज्य महिला आयोग, मुंबई व शामनाथ ग्रामविकास युवा मंडळ यांच्या वतीने
महिलांसाठी डिजिटल साक्षरता प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन
       उस्मानाबाद,दि.26(जि.मा.का):- मौजे वालवड, तालुका भूम येथे दि. 30 डिसेंबर 2019 रोजी महाराष्ट्र राज्य महिला आयोग मुंबई व शामनाथ ग्रामविकास युवा मंडळ यांच्या वतीने महिलांसाठी डिजिटल साक्षरता प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
 हा कार्यक्रम सकाळी 10 वाजता सुरू होईल. तज्ञ प्रशिक्षक म्हणून प्रणव पवार हे मुंबईहून प्रशिक्षण देण्यासाठी येणार आहेत. कार्यक्रमासाठी नायब तहसिलदार श्रीमती आल्हाट, एकात्मिक बालविकास अधिकारी श्रीमती वाघमारे, उमेद अभियान तालुका समन्वयक श्रीमती घोळवे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
 तरी भूम तालुक्यातील सर्व महिलांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे प्रकल्प समन्वयक सर्जेराव इंदलकर यांनी केले आहे.
****
वृत्त क्र:- 814                                                  दि.26 डिसेंबर 2019





महसूल कर्मचाऱ्यांनी केली घनवनाची सफाई आणि
घेतला सहभोजनाचा आनंद
उस्मानाबाद,दि.26(जि.मा.का):- शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाच्या मागील बाजू कुष्ठधामच्या बाजूला शासकीय जमिनीवर दि. 1 जुलै 2019 रोजी एक हजार रोपांची लागवड जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी-कर्मचारी, स्वयंसेवी संस्था, महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थीनींनी मिळून केली होती. आता ही झाडे बऱ्यापैकी वाढली आहेत. या झाडांच्या बुंध्याशी आळे करून तिथे निंदनीकरण, पाणी साठविण्यासाठी चर तयार करणे, आधीचे गवत काढून झाडांच्या मूळांवर माती टाकून त्यावर गवत टाकणे (मल्चिंग करणे) ही प्रक्रिया करण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, वनविभाग, व्हीएसटीएफ ची टिम अशा विविध कार्यालयांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मिळून  जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली श्रमदान केले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) शुभांगी आंधळे, जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. चारुशीला देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे, जिल्हा खनिकर्म अधिकारी वसीम सय्यद, क्षेत्रीय वन अधिकारी श्री. पवार, श्री. अमोल घोडके, नितीन व्हटकर, नायब तहसिलदार श्री. कुलकर्णी, संतोष पाटील, चेतन पाटील, पंकज मैंदाडे, महसूल संघटनेचे पदाधिकारी माधव मैंदवाड, प्रमोद चंदनशिवे, दीपक मुंडे, दीपक चिंतेवाड, रवी मोहिते, नाना मुंडे, श्रीमती शीतल माजलगावकर, सीमा वाघमारे, श्रीमती. शोभा गायकवाड, वैशाली कदम, तलाठी अर्चना कदम तसेच इतर महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यामुळे येथील परिसरात भविष्यात घनवनामुळे निसर्गरम्य ठिकाण निर्माण होणार आहे. तरी नागरिकांनीही या घनवनाच्या परिसराचा आनंद घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Friday, 15 November 2019

जिल्हयातील सर्व शाळा महाविद्यालयांनी केले लोकराज्यचे सामूहिक वाचन जवळपास 1हजार885शाळा-महाविद्यालये,10हजार शिक्षक,3लाख विद्यार्थ्यांचा सहभाग तर दोन शाळा झाल्या “लोकराज्यशाळा”


 वृत्‍त क्र:- 706                                                   दि.14 नोव्हेंबर 2019
स्वच्छता अभियानाची जनजागृती करण्यासाठी
पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या फिरत्या वाहनाचे उदघाटन संपन्न
उस्मानाबाद,दि.14(जिमाका) :- जिल्हा परिषद उस्मानाबाद अंतर्गत आठ तालुक्यातील 150 ग्रामपंचायतमध्ये स्वच्छता अभियानाची जनजागृती करण्यासाठी, महाराष्ट्र शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या  "एलईडी शो प्रदर्शित करणाऱ्या वाहनाचे" जिल्हा परिषद, उस्मानाबादचे अध्यक्ष श्री नेताजी पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून आणि अति. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अनुप शेंगुलवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय तुबाकले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) श्री.अनंत कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हनुमंत वडगावे यांच्या प्रमुख उपस्थितीत उदघाटन करण्यात आले.
****

वृत्‍त क्र:- 707   
जिल्हयातील सर्व शाळा महाविद्यालयांनी केले
लोकराज्यचे सामूहिक वाचन
जवळपास 1हजार885शाळा-महाविद्यालये,10हजार शिक्षक,3लाख विद्यार्थ्यांचा सहभाग तर दोन शाळा झाल्या लोकराज्यशाळा
         उस्मानाबाद,दि.14(जिमाका):-  "एकाच दिवशी एकाच वेळी" ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवून उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये दिनांक 14 नोव्हेंबर 2019 रोजी सकाळी 10:30 ते 11:00 या वेळेत शासनाचे मुखपत्र लोकराज्य मासिकातील पंडित नेहरू यांच्यावरील लेखाचे सामूहिक वाचन हा उपक्रम उपक्रम राबविण्याचे निश्‍चित करण्यात आले होते. त्यास सकारात्मक प्रतिसाद देत जिल्हयातील सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये लोकराज्यचे सामूहिक वाचन संपन्न झाले. जवळपास 1 हजार 885 शाळा-महाविद्यालयातील जवळपास 10 हजार शिक्षक आणि 3 लाख  विद्यार्थ्यांनी लोकराज्य मासिकांचे सामूहिक वाचन केले.गुगल फॉर्मच्या माध्यमातून संकलित होणारी अधिकृत आकडेवारी लवकरच जाहीर करण्यात येईल.
मागील वर्षीही दि.1 सप्टेंबर 2018 रोजी हा उपक्रम राबविण्यात आला होता.त्यावेळी एकूण 1 लाख 26 हजार 229 शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मिळून लोकराज्य मासिकाचे एकाच दिवशी एकाच वेळी सामूहिक वाचन केले होते.
या उपक्रमाचा मुख्य कार्यक्रम आज दि. 14 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहा ते अकरा या वेळेत भोसले हायस्कूल उस्मानाबाद येथे संपन्न झाला. यावेळी या कार्यक्रमासाठी औरंगाबाद विभागाचे माहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक गणेश रामदासी, लातूर विभागाचे माहिती व जनसंपर्क चे उपसंचालक यशवंत भंडारे, शिक्षणाधिकारी सविता भोसले, उपशिक्षणाधिकारी सौ. रोहिणी कुंभार, माध्यमिक शिक्षण विभागाचे अधीक्षक दिनकर होळकर, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रशासकीय अधिकारी श्री. आदित्य पाटील, उपप्रशासकीय अधिकारी संतोष घार्गे, उपमुख्याध्यापक श्री सिद्धेश्वर कोळी, सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक दत्‍तात्रय थेटे, विस्ताराधिकारी श्री. संतोष माळी, विस्ताराधिकारी बालाजी यरमुनवाड , विशेष सहाय्यक तानाजी खंडागळे,  अण्णा ई टेक्नो चे प्राचार्य आर .बी .जाधव, पर्यवेक्षक हाजगुडे एन .एन., इंगळे वाय .के., श्रीमती गुंड, के . पी .पाटील आणि तीन हजाराहून अधिक विद्यार्थी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, नागरिक यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
****

श्रीपतराव भोसले हायस्कूल मध्ये बालदिनानिमित्त लोकराज्य मासिकाचे सामूहिक वाचन उत्साहात





 वृत्‍त क्र:- 704                                                   दि.14 नोव्हेंबर 2019

अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांनी
विविध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा
         उस्मानाबाद,दि.14(जिमाका) :- महिला व बाल व बाल विकास विभाग, जिल्हा परिषद उस्मानाबाद या विभागांतर्गत सन 2019-20 जिल्हा वार्षिक योजना (अजाघका) अंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांना सिंगल फेजवर चालणारी पिठाची गिरणी, जिल्हा वार्षिक योजना (अजाघका)अंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांना शिलाई कम पिको-फॉल मशिन. जिल्हा परिषद सेस योजनेंतर्गत सर्वसाधारण मुली,महिलांना एम.एस.सी.आय.टी./सी.सी.सी./समकक्ष प्रशिक्षण देणे,या योजनांचे अर्ज प्रत्येक तालुक्याच्या बाल विकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण) प्रकल्प कार्यालयाशी संपर्क साधून सादर करावेत,असे आवाहन जिल्हा कार्यक्रम अधिकारी (मबावि) श्री.बी.एच.निपाणीकर यांनी केले आहे.
                                            ****
वृत्त क्रमांक-705
श्रीपतराव भोसले हायस्कूल मध्ये बालदिनानिमित्त
लोकराज्य मासिकाचे सामूहिक वाचन उत्साहात
उस्मानाबाद,दि.14(जिमाका) : येथील  विद्यार्थी संख्येमध्ये सर्वात मोठ्या असणाऱ्या श्रीपतराव भोसले हायस्कूल मध्ये माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती बालदिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली व 14 नोव्हेंबर 2017 रोजी प्रकाशित झालेल्या लोकराज्य मासिकाचे सामूहिक वाचन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून माहिती व जनसंपर्क औरंगाबाद विभागाचे संचालक श्री. गणेश रामदासी तर प्रमुख पाहुणे म्हणून लातूर विभागाचे उपसंचालक यशवंत भंडारे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. लोकराज्य मासिकाच्या वाचनाच्या उपक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी श्री. मनोज सानप यांनी केले. लोकराज्य मासिकाचे वाचन प्रातिनिधिक स्वरूपात प्रशालेची विद्यार्थीनी कु. अमृता पवार हिने केले.
औरंगाबाद विभागाचे माहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक गणेश रामदासी  यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांच्या कौतुकाबरोबरच लोकराज्य मासिकाची माहिती दिली. प्रशालेचे
प्राचार्य श्री.पडवळ येथे त्यांनी 'माझी शाळा लोकराज्यशाळा ' या संकल्पाची उद्घोषणा करून पालक, विद्यार्थी, शिक्षक सर्वांनीच लोकराज्य मासिक सभासद होण्याचा संकल्प केला.
प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी सौ. सविता भोसले यांनी आपल्या भाषणातून कार्यक्रमाचा समारोप केला. याप्रसंगी उपशिक्षणाधिकारी सौ. रोहिणी कुंभार, माध्यमिक शिक्षण विभागाचे अधीक्षक दिनकर होळकर, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रशासकीय अधिकारी श्री.
आदित्य पाटील, उपप्रशासकीय अधिकारी संतोष घार्गे, उपमुख्याध्यापक श्री सिद्धेश्वर कोळी, सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक दत्‍तात्रय थेटे, विस्ताराधिकारी श्री. संतोष माळी, विस्ताराधिकारी  यरमुनवाड  बालाजी ,विशेष सहाय्यक तानाजी खंडागळे,  अण्णा ई टेक्नो चे प्राचार्य आर .बी .जाधव सर पर्यवेक्षक हाजगुडे एन .एन. इंगळे वाय .के. गुंड मॅडम सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन के . पी .पाटील सर यांनी केले.
****

Sunday, 20 October 2019

जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंढे यांनी बजावला मतदानाचा हक्क


वि.स. वृत्त : 69                                                       दिनांक : 21 ऑक्टोंबर, 2019

जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंढे यांनी बजावला मतदानाचा हक्क

उस्मानाबाद,दि.21: विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीकरीता 242-उस्मानाबाद मतदार संघा आज सकाळी 7 वाजेपासून मतदानास सुरुवात झाली. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंढे यांनी उस्मानाबाद येथील (342) नगर पालिक शाळा क्र. 4 या मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला.
****
वि.स. वृत्त :70                                                        दिनांक : 21 ऑक्टोंबर, 2019

जिल्ह्यात सखी मतदान केंद्रासह सक्षम आणि आदर्श मतदार केंद्राची स्थापना
उस्मानाबाद,दि.21: मतदाराचा मतदान प्रक्रियेत सहभाग वाढावा यासाठी लोकसभा निवडणूकीपासून निवडणूक आयोगामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यानुसार उस्मानाबाद जिल्ह्यात 8 सखी मतदान केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.
जास्तीत जास्त मतदारांनी मतदानात सहभाग घ्यावा, मतदानाचे प्रमाण वाढवे यासाठी निवडणूक प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जातात. लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही सखी मतदान केंद्राची स्थापाना करुन सदर केंद्राची आकर्षक सजावट करत हिरकणी कक्ष आदीची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे.
याशिवाय ‍जिह्यात 4 आदर्श आणि 4 सक्षम मतदान केंद्राची  देखील स्थापना करण्यात आली असून  सदर मतदान केंद्राच्या प्रवेशद्वारावर मतदारांच्या स्वागतासाठी कमान, आकर्षक रांगोळी, सजावट, आकर्षक संदेशाचे फलकाद्वारे या मतदान केंद्राची सजावट करण्यात आलेली आहे. शहरासह जिल्ह्यात विविध मतदारसंघात अशी मतदान केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. या आकर्षक मतदान केंद्रावर करण्यात आलेली आकर्षक सजावट व स्वच्छतेमुळे मतदार उत्साहित दिसत होते. यावेळी मतदान केंद्रावर नव मतदार, ज्येष्ठ नागरिक आणि महिला मतदारांनी देखील उत्साहाने मतदान करत असल्याचे चित्र होते.
****









Thursday, 17 October 2019

स्थिर सर्वेक्षण पथकामार्फत आतापर्यंत 71 लाख रुपये जप्त


वि.स. वृत्त : 62                                                       दिनांक : 17 ऑक्टोंबर, 2019

स्थिर सर्वेक्षण पथकामार्फत आतापर्यंत 71 लाख रुपये जप्त
उस्मानाबाद,दि.17: विधानसभा निवडणूक आचारसंहिता जारी झाल्यानंतर स्थिर सर्वेक्षण पथकामार्फत चार ही विधानसभा मतदार संघात वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. आतापर्यंत स्थिर सर्वेक्षण पथकाने विविध ठिकाणी कारवाई करुन सुमारे 71 लाख रुपये जप्त केले आहेत.
यामध्ये 11 ऑक्टोंबर रोजी सांजा सुतगिरणी, सांजा रोड येथे महमंद शरीफ बागवान रा. ख्वाजा नगर, उस्मानाबाद हे त्यांच्या सहकाऱ्या सोबत वाहन क्र. एम एच 25 आर 6041 या वाहनातून उस्मानाबादहून औसाकडे जात असतांना सदर वाहनाची तपासणी केली असता 1 लाख 17 हजार 630 रुपये निदर्शनास आले. तसेच याच दिवशी वाहना क्र. एम एच 13 बी एन 9355 ही कुर्डूवाडी ते पंरडाकडे येत असतांना पथकानने सदर वाहनाची तपासणी केली असता मुनवर छोटूभाई बागवान व अक्षय सुरेश कारंडे यांचेकडे असलेल्या 2 बॅगेत 66 लाख रुपयांची रक्कम मिळाली. तर 15 ऑक्टोंबर रात्री स्थिर पथकाने खंडाळा येथे अप्पासाहेब नाना बिराजदार रा. तुळजापूर यांचे वाहन क्र. एम एच 25 आर 6698 या वाहनाची तपासणी केली असता 4 लाख 1 हजार रुपयांची रक्कम प्राप्त झाली. यावेळी पथकाने संबंधीताना सदर रक्कमेबाबत चौकशी केली असता, त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे ही रक्कम जमा करुन संबंधीत मतदार संघातील कोषागार कार्यालयात जमा करण्यात आली आहे.
तसेच अवैध मद्य बाबतीत विविध ठिकाणी कारवाई करुन एकुण 113 गुन्हे दाखल करत 12 लाख 94 हजार रुपये किमंतीचे 1 हजार 260 लिटर अवैध मद्य आतापर्यंत जप्त करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविली आहे.
****


Saturday, 12 October 2019

242-उस्मनाबाद मतदार संघ : उमेदवारांनी केला पहिल्या टप्प्यातील खर्च सादर


वि.स. वृत्त : 49                                                       दिनांक : 11 ऑक्टोंबर, 2019

240-उमरगा मतदार संघ : उमेदवारांनी केला पहिल्या टप्प्यातील खर्च सादर
उस्मानाबाद,दि.11: विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी प्रत्येक उमेदवाराला अठ्ठावीस लाख रुपये खर्चाची मर्यादा आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रचारासाठी झालेला खर्च तीन टप्प्यांत निवडणूक निरीक्षकांकडे सादर करण्याचे उमेदवारांनी बंधन आहे. त्यानुसार 240-उमरगा विधानसभा मतदार संघातील 11 उमेदवारांनी दि. 7 ऑक्टोंबर पर्यंत झालेल्या निवडणूक खर्चाचा लेखा-जोखा निवडणूक निरिक्षक (खर्च) ब्रिजेश कुमार पांडे यांच्याकडे सादर केला असून त्याचा तपशील पुढील प्रमाण आहे.
बहुजन समाज पार्टी पक्षाचे उमेदवार गायकवाड तानाजी वैजीनाथ यांचा दि. 7 ऑक्टोंबर 2019 रोजी पर्यंत रु.5000/-एवढा खर्च झाला आहे. तर शिवसेना पक्षाचे उमेदवार चौगुले  ज्ञानराज  धोडीराम यांचा रु.58,212/-, मनसे पक्षाचे उमेदवार जालीधर श्रवण कोकणे यांचा 26,730/-, कॉग्रेस पक्षाचे उमेदवार दत्तु रोहिदास भालेराव  यांचा रु. 66,601/-, वंचित बहुजन आघाडी पक्षाचे उमेदवार रमाकांत लक्ष्मण गायकवाड यांचा रु. 29,065/-, बळीराजा पार्टी पक्षाचे उमेदवार सचिन जयहिंद देडे यांचा रु. 5,600/-, बहुजन विकास आघाडी पक्षाचे उमेदवार संदीप धर्मा कटाबु यांचा रु.6,220/-, अपक्ष उमेदवार अमोल मोहण कवठेकर यांचा रु. 9,035/-, अपक्ष उमेदवार दिलीप नागनाथ गायकवाड यांचे 8,270/- , अपक्ष उमेदवार रावसाहेब श्रीरंग सरवदे यांचा रु.7,042/- आणि अपक्ष पक्षाचे उमेदवार सुर्यकांत रतन चौगुले यांनी रु. 17,950/- एवढा खर्च सादर केला आहे.
                                                   ****

वि.स. वृत्त : 50                                                       दिनांक : 11 ऑक्टोंबर, 2019

241-तुळजापुर मतदार संघ : उमेदवारांनी केला पहिल्या टप्प्यातील खर्च सादर
उस्मानाबाद,दि.11: विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी प्रत्येक उमेदवाराला अठ्ठावीस लाख रुपये खर्चाची मर्यादा आहे. तसेच निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रचारासाठी झालेला खर्च तीन टप्प्यांत निवडणूक निरीक्षकांकडे सादर करण्याचे उमेदवारांनी बंधन आहे. त्यानुसार 241-तुळजापुर विधानसभा मतदार संघातील 11 उमेदवारांनी दि. 8 ऑक्टोंबर पर्यंत झालेल्या निवडणूक खर्चाचा लेखा-जोखा निवडणूक निरिक्षक (खर्च) ब्रिजेश कुमार पांडे यांच्याकडे सादर केला असून त्याचा तपशील पुढील प्रमाण आहे.
भारतीय राष्‍ट्रीय कॉग्रेस पक्षाचे उमेदवार मधुकरराव देवराव चव्हाण यांचा रु. 2,52,065/-एवढा  खर्च झाला आहे. तर महाराष्‍ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे उमेदवार  प्रशांत प्रकाश नवगिरे यांचा रु. 39,659/-, बहुजन समाज पार्टी पक्षाचे उमेदवारॲड. शैलेद्र रामेश्‍वरअप्‍पा यावलकर यांचा रु.10,520/-, भारतीय जनता पार्टी पक्षाचे उमेदवार राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील यांचा रु.1,30,608/-, अखिल भारतीय एकता पार्टी पक्षाचे उमेदवार अनिल नेताजी जाधवर यांचा रु.12,950/-, वंचित बहुजन आघाडी पक्षाचे उमेदवार अशोक हरीदास जगदाळे यांचा 3,07,305/-, बळीराजा पार्टी पक्षाचे उमेदवार तात्या पंढरीनाथ रोडे यांचा रु.15,300/-, टिपू सुलतान पार्टी पक्षाचे उमेदवार तौफीक अब्बास पटेल यांचा रु.11,150/-, प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार महेंद्र भानुदास धुरगुडे यांचा रु.26,358/-, अपक्ष उमेदवार अतिष अशोक रसाळ यांचे रु.6,100/- अपक्ष उमेदवार तन्वीर अली सय्यद अली खतीब यांचे रु.10,865/-, अपक्ष दत्ता सुदाम कांबळे यांचा रु.6,090/- अपक्ष उमेदवार नवनाथ दशरथ उपळेकर यांचा रु.5,600/- अपक्ष उमेदवार पांडुरंग ज्ञानोबा शिंदे याचा रु.11,380/-, अपक्ष उमेदवार मधुकर देवराव चव्हाण यांचा रु.13,430/-, अपक्ष महानंदा राजेंद्र दुधभाते यांचा रु.15,490/-, अपक्ष उमेदवार विशाल भाऊसाहेब जानराव यांचा रु.6,500/- आणि अपक्ष उमेदवार शेख बाबा फैजुद्दिन यांनी रु.15,611/-  एवढा खर्च सादर केला आहे.

वि.स. वृत्त : 51                                                       दिनांक : 11 ऑक्टोंबर, 2019

242-उस्मनाबाद मतदार संघ : उमेदवारांनी केला पहिल्या टप्प्यातील खर्च सादर
उस्मानाबाद,दि.11: विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी प्रत्येक उमेदवाराला अठ्ठावीस लाख रुपये खर्चाची मर्यादा आहे. तसेच निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रचारासाठी झालेला खर्च तीन टप्प्यांत निवडणूक निरीक्षकांकडे सादर करण्याचे उमेदवारांनी बंधन आहे. त्यानुसार 242-उस्मानाबाद विधानसभा मतदार संघातील 11 उमेदवारांनी दि. 8 ऑक्टोंबर पर्यंत झालेल्या निवडणूक खर्चाचा लेखा-जोखा निवडणूक निरिक्षक (खर्च) अभय चरण रौत यांच्याकडे सादर केला असून त्याचा तपशील पुढील प्रमाण आहे.
 शिवसेना पक्षाचे उमेदवार कैलास बाळासाहेब घाडगे पाटील यांचा दि.8 ऑक्टोंबर, 2019 रोजी पर्यंत रु. 75,535/- एवढा खर्च झाला आहे. तर बहुजन समाज पार्टीचे उमेदवार भिका सुदामराव विद्यागर यांचा 7,750/-, नॅशनॅलिस्ट कॉग्रेस पार्टीचे उमेदवार संजय प्रकाश निंबाळकर यांचा 55,776/-, आम आदमी पार्टीचे उमेदवार ॲड. अजित (अण्णा) विश्वनाथ खोत पाटील यांचा 25,775/-,वंचित बहुजन आघाडी पक्षाचे उमेदवार धनंजय गंगाधर शिंगाडे यांचा 70,247/-, आखिल भारतीय एकता पार्टी पक्षाचे उमेदवार रघुनाथ मरीबा करबे रु.7,351/- टिपु सुलतान पार्टी पक्षाचे उमेदवार सिराज उर्फ पापा  फतरु सय्यद यांचा 10,458/-, संभाजी ब्रिगेड पार्टीचे उमेदवार डॉ. संदीप माणिकराव तांबारे यांचा 2,17,521/-, अपक्ष उमेदवार अजित बप्पासाहेब पिंगळे यांचा 10,300/-, अपक्ष उमेदवार  दत्ता मोहन तुप्पे यांचा 10,600/- आणि अपक्ष उमेदवार  सुरेश साहेबराव पाटील यांनी 76530/- एवढा खर्च सादर केला आहे.
****
वि.स. वृत्त : 52      

उमेदवारांना 28 लाख खर्चाची मर्यादा - खर्च निरिक्षक अभय चरण रौत

·         उमेदवार त्यांच्या प्रतिनिधिंना सूचना, नियमांचे पालन करावे.
·         दहा हजारांवरील खर्च धनादेशाद्वारे करणे बंधनकारक
·          
उस्मानाबाद, दि.11: विधानसभा निवडणूक लढविणा-या कोणत्याही उमेदवारांना या निवडणूक प्रचारासाठी 28 लाख रुपये खर्च करता येणार आहे.  प्रत्येक उमेदवाराने दहा हजारावरील खर्च धनादेशाद्वारे करावा, असे निर्देश ‍243, परंडा मतदार संघाचे केंद्रीय खर्च निरीक्षक अभय चरण रौत यांनी दिले आहेत.  भुम तहसिल कार्यालयातील सभागृहात उमेदवार त्यांच्या प्रतिनिधींची बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. 
खर्च निरिक्षक अभय चरण रौत म्हणाले या मतदार संघातील उमेदवारांच्या खर्चाचे निरिक्षण प्रथम टप्यात दिनांक 11/10/2019, व्दितीय टप्पा दिनांक 15/10/2019 आणि तृतीय टप्पा दिनांक 19/10/2019 रोजी  सकाळी 10.30 ते 1.30 या वेळेत करण्यात येणार आहे.  उमेदवारांनी भारत निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या विहीत खर्चाच्या मर्यादेचे काटेकोरपणे पालन करावे.  खर्च नोंदवही, बँक पासबुक, खर्च प्रमाणके (व्हाऊचर्स) त्यादी बाबत माहिती सतत अदययावत ठेवावी.  याबाबत काही अडचणी किंवा समस्या असल्यास निवडणूक निर्णय अधिकारी यांचेशी संपर्क साधावा.  उमेदवारांनी या निवडणूकीसाठी सुरु केलेल्या बँक खात्यातून व्यवहार करावेत.  तसेच खरेदी केलेल्या प्रत्येक वस्तुचे बिल ही सादर करावे.  निवडणूक आयोगाच्या सूचनांचे सतत पालन करावे. भारत निवडणूक आयोगाने तक्रारीसाठी सी-व्हीजील ॲप सर्व नागरिकांना उपलब्ध करुन दिलेले आहे.  याशिवाय (02478) 273026 273027 या दुरध्वनी क्रमांकावरही तक्रार करता येऊ शकते, असेही ते म्हणाले. उमेदवारांनी दैनंदिन खर्चाच्या नोंदी ठेवाव्यात.  वेळोवेळी खर्चाची माहिती सादर करावी.  सहायक खर्च निरिक्षकांनी शॅडो रजिष्टर अदययावत ठेवावे असेही ते म्हणाले. 
दैनंदिन अहवाल सादर करावेत -  निवडणूकीसाठी उमेदवार निश्चीत झाले असून संबंधित विभागांनी आपले दैनंदिन अहवाल सादर करावेत असे निर्देश ‍243, परंडा मतदार संघाचे केंद्रीय खर्च निरीक्षक अभय चरण रौत यांनी दिले आहेत.  तहसील कार्यालयातील सभागृहात नोडल अधिका-यांची बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते.  खर्च निरीक्षक अभय चरण रौत पुढे म्हणाले उमेदवारांची सभा, रॅली, रोड  शोचे पथकांनी परीपूर्ण चित्रीकरण करावे.  भरारी  पथकांनी निवडणूक कालावधीत सतत सतर्क राहावे.  बँकानी संशयीत व्यवहारांची माहिती दररोज सादर करावी असेही त्यांनी सांगितले उपस्थित नोडल अधिकारी यांना मार्गदर्शन केले. 
यावेळी या मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा राशीनकर, सहा.निवडणूक निर्णयक अधिकारी उषाकिरण शृंगारे, जिल्हा कोषागार अधिकारी किरण कोटकर, खर्च निरिक्षक संपर्क अधिकारी अनंत कुंभार गुनाळे, उमेदवार, त्यांचे प्रतिनीधी तसेच खर्च कक्षातील नोडल अधिकारी कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. 
                                                                          ****