Thursday, 26 December 2019

महसूल कर्मचाऱ्यांनी केली घनवनाची सफाई आणि घेतला सहभोजनाचा आनंद


    वृत्त क्र:- 811                                                                            दि.26 डिसेंबर 2019
    रयतच्या महाविद्यालयीन प्रश्नमंजूषा / वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन
उस्मानाबाद,दि.26(जि.मा.का):- दरवर्षीप्रमाणे रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर विद्याप्रबोधिनीमार्फत जानेवारी-2020 मध्ये महाविद्यालयीन प्रश्नमंजूषा व वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन केले आहे.
प्रश्न मंजूषा स्पर्धा-स्थळ एस. एम. जोशी कॉलेज, हडपसर, पुणे (0202699001/9730587831) कालावधी- दि.16 ते 18 जानेवारी 2020, पारितोषिके-अनुक्रमे रु.10 हजार, 9 हजार, 8 हजार, 7 हजार, व 6 हजार असे आहे.
वक्तृत्व स्पर्धा-स्थळ यशवंतराव चव्हाण इन्स्टिटयूट ऑफ सायन्स,सातारा (02162-231074/9850555938) कालावधी-22 ते 24 जानेवारी 2020, पारितोषिके-अनुक्रमे- रु.15 हजार,10 हजार, 5 हजार, तसेच सन्मानार्थ रु.3 हजार दहा पारितोषिके या दोन्ही स्पर्धाचे नियम, अटी, इ. माहिती www.erayat.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत, असे कार्यकारी संचालक, प्रा. आर. के. शिंदे यांनी केले आहे.
                                               *****
                                         ****

वृत्त क्र:- 812
कौशल्य विकास विभागामार्फत शिकाऊ उमेदवारी योजनेंतर्गत होणाऱ्या
अखिल भारतीय व्यवसाय परीक्षेचे (AITT) वेळापत्रक जाहीर
       उस्मानाबाद,दि.26(जि.मा.का):- कौशल्य विकास व उद्योजकता विभाग यांच्यामार्फत होणारी जानेवारी/ फेब्रुवारी 2020 या सत्रातील 110 वी शिकाऊ उमेदवारी योजनेंतर्गत (ATS) अखिल भारतीय व्यवसाय परीक्षेचे (AITT) वेळापत्रक www.apprcnticeship.gov.in  या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. त्यानुसार ज्या प्रशिक्षणार्थ्यांचे करारपत्र दि.30 ऑक्टोबर 2019 पूर्वी संपत आहेत,अशा सर्व नियमित / रिपिटर प्रशिक्षणार्थ्यांनी ऑनलाईन आवेदन तसेच परीक्षा शुल्क www.apprcnticeship.gov.in या संकेतस्थळावर भरावे.
ही कार्यवाही करावयाची अंतिम तारीख दि.04 जानेवारी 2020 आहे. तसेच ऑनलाईन व परीक्षा शुल्क भरल्याची पावती ही BTRI Osmanabad या कार्यालयात दि.04 जानेवारी 2020 पर्यंत जमा करावी. जे प्रशिक्षणार्थी सध्या अप्रेंटिसशिप करीत आहेत किंवा अप्रेंटिसशिप झालेली आहे,अशा सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी अप्रेंटिसशिप व्हेरीफिकेशन त्वरीत करुन घ्यावे. याबाबतचे युजर मॅन्युअल वरील संकेतस्थळावर न्यूज व अपडेटस या सदराखाली देण्यात आले आहे,असे संस्थेचे सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार श्री. सचिन सूर्यवंशी यांनी कळविले आहे.
                                           
****
वृत्त क्र:- 813
महाराष्ट्र राज्य महिला आयोग, मुंबई व शामनाथ ग्रामविकास युवा मंडळ यांच्या वतीने
महिलांसाठी डिजिटल साक्षरता प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन
       उस्मानाबाद,दि.26(जि.मा.का):- मौजे वालवड, तालुका भूम येथे दि. 30 डिसेंबर 2019 रोजी महाराष्ट्र राज्य महिला आयोग मुंबई व शामनाथ ग्रामविकास युवा मंडळ यांच्या वतीने महिलांसाठी डिजिटल साक्षरता प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
 हा कार्यक्रम सकाळी 10 वाजता सुरू होईल. तज्ञ प्रशिक्षक म्हणून प्रणव पवार हे मुंबईहून प्रशिक्षण देण्यासाठी येणार आहेत. कार्यक्रमासाठी नायब तहसिलदार श्रीमती आल्हाट, एकात्मिक बालविकास अधिकारी श्रीमती वाघमारे, उमेद अभियान तालुका समन्वयक श्रीमती घोळवे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
 तरी भूम तालुक्यातील सर्व महिलांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे प्रकल्प समन्वयक सर्जेराव इंदलकर यांनी केले आहे.
****
वृत्त क्र:- 814                                                  दि.26 डिसेंबर 2019





महसूल कर्मचाऱ्यांनी केली घनवनाची सफाई आणि
घेतला सहभोजनाचा आनंद
उस्मानाबाद,दि.26(जि.मा.का):- शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाच्या मागील बाजू कुष्ठधामच्या बाजूला शासकीय जमिनीवर दि. 1 जुलै 2019 रोजी एक हजार रोपांची लागवड जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी-कर्मचारी, स्वयंसेवी संस्था, महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थीनींनी मिळून केली होती. आता ही झाडे बऱ्यापैकी वाढली आहेत. या झाडांच्या बुंध्याशी आळे करून तिथे निंदनीकरण, पाणी साठविण्यासाठी चर तयार करणे, आधीचे गवत काढून झाडांच्या मूळांवर माती टाकून त्यावर गवत टाकणे (मल्चिंग करणे) ही प्रक्रिया करण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, वनविभाग, व्हीएसटीएफ ची टिम अशा विविध कार्यालयांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मिळून  जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली श्रमदान केले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) शुभांगी आंधळे, जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. चारुशीला देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे, जिल्हा खनिकर्म अधिकारी वसीम सय्यद, क्षेत्रीय वन अधिकारी श्री. पवार, श्री. अमोल घोडके, नितीन व्हटकर, नायब तहसिलदार श्री. कुलकर्णी, संतोष पाटील, चेतन पाटील, पंकज मैंदाडे, महसूल संघटनेचे पदाधिकारी माधव मैंदवाड, प्रमोद चंदनशिवे, दीपक मुंडे, दीपक चिंतेवाड, रवी मोहिते, नाना मुंडे, श्रीमती शीतल माजलगावकर, सीमा वाघमारे, श्रीमती. शोभा गायकवाड, वैशाली कदम, तलाठी अर्चना कदम तसेच इतर महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यामुळे येथील परिसरात भविष्यात घनवनामुळे निसर्गरम्य ठिकाण निर्माण होणार आहे. तरी नागरिकांनीही या घनवनाच्या परिसराचा आनंद घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.