उस्मानाबाद,दि.12:- छत्रपती
शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अर्थात राज्यातील ऐतिहासिक कर्जमाफी अंतर्गत उस्मानाबाद
जिल्हयातील श्री. सिध्देश्वर अर्जुन शेलार, रा. मेडसिंगा, ता. जि. उस्मानाबाद यांची
रु. 81 हजार 560 छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफी झाली,
या कर्जमाफीमुळे त्यांच्या जीवनाला वेगळे वळण मिळाले, या कर्जमाफीमुळे थोडे-फार
सुधारण्याची संधी उपलब्ध झाली. कर्जमाफी
शासनानं योग्य आणि चांगली दिली आहे त्यामुळे शासनाचे आभार व्यक्त केले आहेत.
तसेच श्री. दिपक तुकाराम
रणदिवे, रा. सारोळा, ता. जि. उस्मानाबाद यांची रु. 7 हजार 513 छत्रपती शिवाजी
महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफी झाली, कर्जमाफी शासनानं केल्यामुळे
शासनाचे आभार व्यक्त केले आहेत.
तर सारोळा बु. ता. जि.
उस्मानाबाद येथील श्री. प्रमोद आंबऋषी
कठारे, यांची रु. 10 हजार 580 छत्रपती
शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफी झाली, कर्जमाफीचा शासनानं
घेतलेला निर्णय योग्य आहे. अल्पभूधारक, गोर-गरीब शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली आहे.
आत्तापर्यंत अशी कर्जमाफी झालीच नव्हती. त्यामुळे शासनाचे आभार व्यक्त केले
आहेत.
उस्मानाबाद तालुक्यातील काजळा
येथील श्री. पांडूरंग तुकाराम झामणे, यांची रु. 96 हजार 627 छत्रपती शिवाजी महाराज
शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफी झाली, यांना 07 एकर शेती असून कर्जमाफीचा
शासनानं घेतलेला निर्णय कळाल्यानंतर यांना आनंद झाल्याने त्यांनी साखर वाटून
शासनाचे आभार व्यक्त केले आहेत.
तसेच श्री. दामोदर भाऊ ढवण,
रा. काजळा, ता. जि. उस्मानाबाद यांची रु. 30 हजार 576 छत्रपती शिवाजी महाराज
शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफी झाली, यांना 01 हेक्टर 88 आर शेती असून
शासनाने कर्जमाफीचा निर्णय घेतल्यामुळे आनंद व्यक्त केला आहे.
तर श्री. सुजित चंद्रसेन
शेंडगे, रा. काजळा, ता. जि. उस्मानाबाद यांची रु. 24 हजार 126 छत्रपती शिवाजी
महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफी झाली, त्यांनी शासनाने कर्जमाफीचा
निर्णय घेतल्यामुळे आभार व्यक्त केले आहेत.
आणि श्री. बालाजी दौलतराव
पाटील, रा. देवळाली, ता. जि. उस्मानाबाद यांची रु. 17 हजार 318 छत्रपती शिवाजी
महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफी झाली, शासनाने कर्जमाफीचा निर्णय
घेतल्यामुळे आभार व्यक्त केले आहेत.
अशा प्रकारे शासनाने
घेतलेल्या कर्जमाफी योजनेचा जिल्हयातील विविध शेतकऱ्यांनी आपल्या बोलक्या
प्रतिक्रियांद्वारे मनोगत व्यक्त करुन शासनाचे आभार मानले आहेत.






