उस्मानाबाद:-
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जन्म दिवसापासून दि.31 ऑक्टोंबर ते दि.5
नोव्हेंबर या कालावधीत दक्षता जनजागृती
सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
दि.3 नोव्हेंबर 2016 रोजी या
सप्ताहानिमित्त जनतेमध्ये जनजागृती होण्याच्या उद्देशाने सकाळी 9.20 वाजता
लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या वतीने शहरात रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीस
पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी पोलीस मुख्यालय कवायत मैदान येथून हिरवा झेंडा
दाखवून या रॅलीचा शुभारंभ केला. या रॅलीमध्ये उस्मानाबाद शहरातील आर. पी. कॉलेज,
के.टी. पाटील कॉलेज, भोसले हायस्कूल,जिल्हा परिषद कन्या प्रशाला,भारत
विद्यालय,गाझी हायस्कूल या शालेय व महाविद्यालयातील एन.सी.सी., एन.एस.एस.व इतर विद्यार्थी
व शाळेचे शिक्षक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. विर्द्थ्यांच्या हातामध्ये
बॅनर, घोषवाक्याचे फलक देवून जनजागृती करण्यात आली. ही रॅली पोलीस मुख्यालय कवायत
मैदान येथून निघून जिल्हाधिकारी कार्यालय, बसस्थानक,शिवाजी चौक मार्ग,आंबेडकर चौक,उस्मानाबाद
शहर पोलीस ठाणे या मार्गे काढण्यात येवून भ्रष्टाचार निर्मूलन संदर्भात जनजागृती
करून लाचलुचपत विभाग येथे या रॅलीची सांगता
करण्यात आली.
यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक
दीपाली घाटगे , पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा हरीष खेडकर, पोलीस निरीक्षक
डी.एम.शेख, सहायक पोलीस निरीक्षक दिगंबर शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक श्री.पाटील,राखीव
पोलीस उप निरीक्षक श्री. शेळके हे उपस्थित होते.
या रॅलीचे आयोजन औरंगाबादचे पोलीस
अधीक्षक (ए.सी.बी.) डॉ.श्रीकांत परोपकारी, अपर पोलीस अधीक्षक (ए.सी.बी.) श्री.डी.डी.गवारे
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक श्री. बी.व्ही. गावडे व त्यांचे सहकारी पोलीस
निरीक्षक श्री. ए.बी.शेख, श्री.बी.जी.
आघाव व त्यांचे सहकारी यांनी केले .


