सरदार पटेल आणि स्व. इंदिरा गांधी यांना आदरांजली
उस्मानाबाद,दि.31:- देशाचे पहिले
गृहमंत्री लोह पुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांना त्यांच्या जयंतीदिनी
येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पुष्पहार घालून आदरांजली वाहण्यात आली. तसेच माजी
पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त
त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी नायब तहसिलदार आर.बी.पाचभाई,जीवन
कुलकर्णी यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
****
ॲन्टी करप्शन ब्युरो कार्यालयात
सरदार वल्लभभाई पटेल यांना
अभिवादन
उस्मानाबाद,दि.31:-देशाचे पहिले गृहमंत्री
लोह पुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांना त्यांच्या जयंतीदिनी येथील ॲन्टी करप्शन
ब्युरो कार्यालयात अभिवादन करण्यात आले.
त्यांच्या
जन्मदिनानिमित्त दि.31 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या कालावधीत दक्षता जनजागृती
सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात पोलीस उपअधीक्षक
व्ही.बी.गावडे यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला
तसेच भ्रष्टचार निर्मूलनाबाबतची प्रतिज्ञा सर्व अधिकारी/कर्मचारी यांना देण्यात
आली.यावेळी पोलीस निरीक्षक ए.बी. शेख, बी.जी.आघाव,पोलीस हवालदार स्वामी, कठारे,
पोलीस नाईक सुरवसे, तोडकर यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.