Sunday, 24 September 2017

जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांची मीडीया कक्षास भेट



उस्मानाबाद, दि. 22: श्रीतुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवात स्थापित मिडीया कक्षास जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी भेट देऊन प्रसारमाध्यमांना येणाऱ्या अडचणीबाबत चर्चा केली. प्रसारमाध्यमांना मंदिरातील कार्यक्रम व विधीची माहिती कक्षाद्वारे पुरविण्यासाठी कसल्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्यात येत असून शारदीय नवरात्र महोत्सवाला अधिकाधिक सकारात्मक प्रसिध्दी देऊन सहकार्य करावे, असे आवाहन प्रसारमाध्यम प्रतिनिधींना केले.

यावेळी उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, मंदिर संस्थानचे तहसीलदार सुनिल पवार, जिल्हा माहिती कार्यालयाचे कर्मचारी भिमा पडवळ, आयुब पठाण, अनिल वाघमारे, सचिन मोरे  यांची उपस्थिती होती.