शारदीय नवरात्र महोत्सवात
सोमवारी पाचव्या दिवशी श्री तुळजाभवानी देवीची मुरली अलंकार
महापूजा करण्यात आली. श्री तुळजाभवानी देवीचे हे रुप पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी
भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे दर्शन रांग ही
पूर्णपणे भरुन गेली होती. मात्र विविध यंत्रणा, मंदिर संस्थान आणि पोलीस
यंत्रणेच्या समन्वयामुळे भाविकांना सुलभपणे दर्शन मिळत आहे.