उस्मानाबाद,दि.24:- तुळजापूर येथे शारदीय नवरात्र
महोत्सवात श्री तुळजाभवानी देवीची शनिवारी नित्योपचार पूजा करण्यात आली. आज रविवार
असल्यामुळे देवीजींची नित्योपचार झाल्यानंतर विविध भागातून येणाऱ्या भाविकांनी
श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी झाली.
दररोज श्री तुळजाभवानी देवीजींचे विविध
धार्मिक विधी विधीवत पार पाडले जात आहेत. श्री
तुळजाभवानी देवींच्या विविध अलंकार पूजेस आजपासून (दि.24) पासून सुरुवात होणार
आहे. यात, दि.24 रोजी रथ अलंकार महापूजा,
दि. 25 रोजी मुरली अलंकार महापूजा, दि. 26 रोजी शेषशाही अलंकार महापूजा,दि. 27
रोजी भवानी तलवार अलंकार महापूजा आणि दि. 28 रोजी महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा
होणार आहेत. तत्पूर्वी, काल (शनिवारी) रात्री 10 वाजता भाविकांच्या अपार उत्साहात श्री देवीजींची छबिना
मिरवणूक काढण्यात आली.
भक्तांच्या
हाकेला प्रतिसाद देऊन देवीने रथातून येऊन भक्तांचे संकट निवारण केले होते,
त्यामुळे या रथ अलंकार महापूजेला विशेष महत्व असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. या
देवीच्या दर्शनासाठी अवघ्या महाराष्ट्रासह तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आदी
राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येत आहेत.