सध्या सुरु असलेल्या
गणेशोत्सव, अगामी नवरात्र महोत्सव व दिपावली सण या काळात दहशतवादी कारवायांना
प्रतिबंध करण्यासाठी आणि कायदा व
सुव्यवस्था आबाधीत राखण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू
करण्यात आले आहेत.
हे आदेश दिनांक 20 सप्टेबर 2018 चे 00.05 वाजले पासून ते दिनांक 03 नोव्हेंबर 2018 च्या 24.00 वाजेपर्यंत बंदी आदेश लागू
केल्याचे अप्पर जिल्हादंडाधिकारी उस्मानाबाद यांनी कळविले आहे.
जिल्हयातील कोणत्याही व्यक्तीला किरायाने/
भाडयाने ठेवतांना घर मालक, लॉज चालक संस्था, विश्रामगृह, धर्मशाळा चालक/ मालक
यांनी वास्तव्यास राहणा-या व्यक्तीचे ओळखपत्र व निवासाचा पत्ता याबाबत माहिती
संबंधीत पोलीस स्टेशनला न देता भाडयाने/ किरायाने ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे.
तसेच उस्मानाबाद जिल्हयात
कोणत्याही व्यक्तीला कोणतीही दुय्यमप्रती मोटार वाहनांच्या तसेच जूने वाहन भंगार
मध्ये खरेदी- विक्रीबाबत संबंधित पोलीस स्टेशनला
माहिती न देता खरेदी- विक्री करण्यास मनाई करण्यास आले
आहे. आक्षेपार्ह सिडी/ गाणे वाजविल्यामुळे जातीय-धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता
असल्याने जिल्हयात कोणत्याही कार्यक्रमात अथवा कोणत्याही ठिकाणी आक्षेपार्ह सिडी/
गाणी/ संगीत वाजविण्यास मनाई करण्यात येत आहे. तसेच मागील एक महिन्यात विक्री केलेल्या
सिमकार्ड धारकांची माहिती साद करणे बंधनकारक राहील. सायबर कॅफी मालकास आपली ओळख
पटविल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीस सायबर कॅफेचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे.
वरील कालावधीत शोभेची दारु
विनापरवाना साठा तसेच ड्रोनचा विना परवाना वापर करण्यास मनाई येत असल्याचे अप्पर जिल्हादंडाधिकारी, उस्मानाबाद यांनी
कळविले आहे.