महिला
विकासासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या
महिला समाज सेविकांना व संस्थांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार
महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून प्रदान करण्यात येतात.
राज्यस्तरीय
पुरस्कार :- महिला व बाल विकास क्षेत्रातकिमान 25 वर्षे उललेखनीय कार्य
करणाऱ्या समाज सेविकांना दरवर्षी हा
पुरस्कार देण्यात येतो. रू. 1 लाख रोख, स्मृती चिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे
स्वरूप आहे.
विभागीय स्तर पुरस्कार:- महिला व बालविकास क्षेत्रात किमान दहा वर्षे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या
नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थांना रू.25001/- , स्मृतीचिन्ह शाल व श्रीफळ पुरस्कार
दिला जातो.
जिल्हास्तरीय पुरस्कार
:- महिला व बाल विकास क्षेत्रात 10 वर्षे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला
समाजसेविकांना दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्काराप्रित्यर्थ रू.
10,001/- रोख , स्मृतीचिन्ह शाल व श्रीफळ देण्यात येतो.
वरीलप्रमाणे सन 2015-16, 2016-17 व सन
2017-18 या वर्षाच्या पुरस्कारासाठी पात्र महिला समाजसेविका व स्वयंसेवी संस्था यांनी विहित नमुन्यात आवश्यक त्या
कागदपत्रासह तीन प्रतीत दि.25/9/2018 पर्यंत प्रस्ताव स्वतंत्रपणे सादर करावेत. तसेच अर्टी शर्ती व अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, खोली क्रं.
10 तळमजला, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, उस्मानाबाद येथे कार्यालयीन वेळेत संपर्क
साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, उस्मानाबाद यांनी केले आहे.