Monday, 24 September 2018

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र घेऊन जावेत


शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, उस्मानाबाद येथे जुलै 2014 ते जुलै 2016 मध्ये झालेल्या अखिल भारतीय व्यवसाय परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांचे डीटीईटी नवी दिल्ली यांच्याकडून राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र प्राप्त झाले आहेत. या प्रमाणपत्र वाटपाची प्रक्रिया चालू आहे.
तरी वरील कालावधीत उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांनी राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र स्वीकारण्यासाठी संस्थेमध्ये येताना सोबत आयटीआय उत्तीर्ण मार्क मेमो व एडमिशन रजिस्ट्रेशन नंबर आयडी प्रूफ घेऊन कार्यालयीन वेळेत यावे तसेच संबंधित उमेदवारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून प्रमाणपत्र स्वीकारावे, असे औद्योगिक प्रशिक्षण संस्था, उस्मानाबाद चे प्राचार्य श्री. रविशंकर सावळे यांनी कळविले आहे.