Thursday, 23 March 2017

नवजात बाळाच्या स्वागताचा उस्मानाबाद पॅर्टन “जन्मोत्सव” डॉ. आणि रूग्ण नाते मित्रत्वाचे -डॉ.प्रशांत नारनवरे



                     
उस्मानाबाद,दि.23:-सध्या डॉक्टर्स आणि रूग्ण यांच्यातील संबंध तणावपूर्ण बनले आहेत. मात्र उस्मानाबादमधील  जिल्हा रूग्णालय आणि येथील स्त्री रूगणालय येथील वातावरण  मात्र अत्यंत खेळीमेळीचे सहकार्याचे असल्याचे दिसून येते, येथे नवजात बाळाच्या स्वागताचा जन्मोत्सव साजरा करताना पाहून मन कृतकृत्य झाले असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी आज येथे व्यक्त केले.
जिल्हा रूग्णालयाच्या वतीने नवजात बाळाच्या जन्माचा जन्मोत्सव साजरा करण्याचा अभिनव उपक्रमास आज सुरूवात झाली, या उपक्रमाच्या उद्घघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एकनाथ माले, जिल्हा माहिती  अधिकारी मनोज शिवाजी  सानप,बालरोग तज्ञ डॉ.अशोक धुमाळ,बालरोग तज्ञ  डॉ.दिग्गज पाटील,स्त्री रोग तज्ञ डॉ.पाटील, स्त्री रोग तज्ञ डॉ.बागल मॅडम, स्त्री रोग तज्ञ डॉ.टिके मॅडम हे  उपस्थित  होते.
डॉ.नारवरे म्हणाले की, सध्या डाक्टर्स आणि रूग्ण व रूग्णांचे नातेवाईक यांच्यामधली  संबंध काहीसे तणावपूर्व होत आहेत. याला वेगवेगळी परिस्थिती कारणीभूत आहे हे निश्चित मात्र तरीही रूग्ण आणि‍ रूग्णांचे नातेवाईक यांचे मानसिक संतुलन सांभाळणे  ही  रूग्णालयातील सर्वांचीच जबाबदारी आहे. रूग्णांलयात  रूग्णालयाचाच सर्वोच्च  प्राधान्यायाने  विचार व्हायला हवा, विज्ञानाच्या पलिकडे जावून रूग्णाचे मनही जपले पाहिजे फक्त आौषधांनी नव्हे तर सामाजिक भान/आस्था या भावनेतूनही उपचार व्हायला हवेत. असे सांगून डॉ.नारनवरे म्हणाले की, समाजशास्त्र/सामाजिक शास्त्र याचाही डॉक्टरांच्या अभ्यासक्रमात समावेश होणे ही काळाजी गरज बनली आहे.
उस्मानाबादमधील जिल्हा रूग्णाल्याने विविध उपक्रमांच्या खुल्या माध्यमातून गांभिर्याने वैद्याकीय क्षैत्राचे समाजकारण केले आहे, या रूग्णालयाने ई-ब्लड बॅक, आधार@ईबर्थ सारखे अत्यंत अभिनंदनीय उपक्रम सुरू करून वैद्यकीय क्षेत्राचे तसेच उस्मानाबाद जिल्हयाचे नाव उज्ज्वल केले आहे, याबद्दल जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी या  रूग्णालयातील  सर्व डॉक्टर्स, परिचारिका तसेच सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
          या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एकनाथ माले यांनी केले. प्रास्ताविकात डॉ.माले  यांनी  डॉक्टर व रूग्ण,त्यांचे नातेवाईक यांचे संबंध मैत्रीपूर्ण व्हावे याकरिता रूग्णालयाच्या कर्मचाऱ्यांकडून शक्य ते सर्व प्रयत्न केले जातात, रूग्णालय जास्तीत जास्त स्वच्छ राहील याकरीता जिल्हा रूग्णालय प्रशासन करीत असलेले प्रयत्न याबद्दलची माहिती उपस्थितांना दिली. तसेच त्यांनी उपस्थित रूग्णांच्या नातेवाईकांना आवाहन केले की,नातेवाईकांनीही वार्डची काळजी घ्यायला हवी, आपले रूग्णालय आपणच स्वच्छ ठेवायला हवे, रूग्णालय आपलेच आहे  या भावनेतूनच रूग्णालयाशी आणि येथील सर्व  डॉक्टर्स,नर्सेसशी  मैत्रीचे संबंध प्रस्थापित  करावेत.
या आवाहनास प्रतिसाद देवून रूग्णालयात दाखल दोन रूग्णाच्या नातेवाईकांनी इलेकट्रॉनिक  वजन  काटा, तसेच  लहान बाळांचे  कपडे  रूग्णालयास  भेट दिली.

या  कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन  मंदाकिनी शिंदे  यांनी केले .या कार्यक्रमात सहायक अधिसेविका श्रीमती मंदाकिनी शिंदे, श्रीमती व्हि.के.साबळे, श्रीमती एस.एम.बागडे, श्रीमती एस.बी जावरकर, श्रीमती के.शेख, श्रीमती व्हि.आर.दलभंजन, श्रीमती एस.डी. भालेराव, भोसले, श्रीमती सिरसाठ,श्रीमती संगीता चिरके तसेच जेष्ठ पत्रकार मोतीचंद बेदमुथा,संतोष जाधव,बालाजी निरफळ हे ही उपस्थित होते.