Thursday, 23 March 2017

विशेष सहाय्य योजनेच्या लाभार्थींनी राष्ट्रीयकृत बँकेचे खाते क्रमांक दयावे. -आयुष प्रसाद


उस्मानाबाद,दि.23:- महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग, यांच्याकडील शासन निर्णय दि.18 जून 2016 नुसार संगायो, इंगायो, श्राबायो, या योजनेच्या लाभार्थ्यांचे अनुदान DBT (Direct Benefit Transfer)  प्रणालीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात दि. 1 एप्रिल 2017 पासून जमा करण्यात येणार आहेत.
      दि. 22 मार्च रोजी उस्मानाबाद तालुक्यातील राष्ट्रीयकृत बँकेचे बँक मित्र यांची सहाय्यक जिल्हाधिकारी तथा तहसिलदार आयुष प्रसाद यांनी बैठक घेवून त्यांचे कडे संबंधीत गावचे लाभार्थींची यादी देवून संगायो, इंगायो, श्राबायो, या योजनेच्या लाभार्थ्यांचे राष्ट्रीयकृत बँकेत शून्य बॅलन्सवर खाते उघडणेबाबत सूचना दिल्या.
            उस्मानाबाद तालुक्यातील सर्व संजय गांधी निराधार, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ, अपंग व विधवा निराधार योजनेच्या लाभार्थींनी नजीकच्या राष्ट्रीयकृत बँकेचे संबंधित बँक मित्राशी संपर्क करून  बँक खाते काढून घ्यावेत व सदर राष्ट्रीयकृत बँकेचे खाते पासबुक व आधार कार्डची झेरॉक्स प्रत संबंधित तलाठी यांचेकडे दि.31 मार्च 2017 पुर्वी जमा करावे, असे आवाहन परिविक्षाधीन जिल्हाधिकारी तथा तहसिलदार आयुष प्रसाद यांनी केले आहे.