Thursday, 30 March 2017

राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा पूर्वतयारी नि:शुल्क, निवासी मार्गदर्शन शिबीर


उस्मानाबाद,दि.30:- जे विद्यार्थी राज्यस्तरीय परीक्षेतून राष्ट्रीय प्रज्ञा शोध (राष्ट्रीयस्तर) परीक्षेसाठी पात्र झालेले आहेत,  त्यांनी प्रादेशिक विद्या प्राधीकरण (राज्य विज्ञान व गणित शिक्षण संस्था), नागपूर या संस्थेकडे दि.5 एप्रिल 2017 पूर्वी आपली संमतीपत्रे पाठवावे, असे शिक्षणाधिकारी माध्यमिक औदुंबर उकिरडे यांनी कळविले आहे.

          राज्यस्तरावरुन राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन दि.18 ते 27 एप्रिल 2017 या कालावधीत त्रिमूर्ती पब्लिक स्कूल नेवासा, जिल्हा अहमदनगर येथे करण्यात आले आहे. त्यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी दि.5 एप्रिल 2017 पूर्वी आपली संमतीपत्र संचालक प्रादेशिक विद्या प्राधिकरण (राज्य विज्ञान व गणित शिक्षण संस्था), रविनगर  नागपूर यांच्याकडे संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाच्या स्वाक्षरीने शिक्षणाधिकारी मार्फत सादर करावेत,या नि:शुल्क शिबिराचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शिक्षणाधिकारी  उकिरडे केले आहे.