उस्मानाबाद.दि.31:-उष्णतेच्या
लाटेच्या कालावधीत उष्माघातापासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी उपाय योजना करण्यात
यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापण प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.
प्रशांत नारनवरे यांनी केले आहे.
उष्णतेच्या लाटेमुळे होणारे गंभीर
परिणाम टाळण्यासाठी पुढीलप्रमाणे उपाय करण्याचे सुचविले आहे- तहान लागलेली नसली
तरीसुधा जास्तीत जास्त पाणी पिण्यात यावे, हलकी, पातळ व सच्छिद्र सूती कपडे
वापरावेत, बाहेर जातांना गॉगल्स, छत्री, टोपी, बुट व चपलचा वापर करण्यात यावा,
प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत घ्यावी, शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत
असल्यास ओआरएस, घरी बनविण्यात आलेली लस्सी, तोरणी, लिंबू-पाणी, ताक इत्यादीचा
नियमित वापर करण्यात यावा, अशक्तपणा, स्थुलपणा, डोकेदुखी, सतत यंणारा घाम इत्यादी
उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावित व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा
सल्ला घेण्यात यावा, गुरांना छावणीत ठेवण्यात यावे, त्यांना पुरेसे पाणी दयावे,
घरे थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करण्यात यावा, पंखे, ओले कपडे यांचा
वापर करण्यात यावा, कामाच्या ठिकाणी जवळ थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात
यावी, सुर्यप्रकाशाचा थेट संबंध टाळावा, पहाटेच्या वेळी कामे करावीत, गरोदर
कामगार व आजारी कामगाराची अधिक काळजी
घ्यावी आदी उपाय करावेत.
हे करु नये – लहान मुले किंवा पाळीव
प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये, दुपारी 12 ते 3.30 या
कालावधीत उन्हात बाहेर जाऊ नये, गडत, घट पजाड कपडे घालण्याचे टाळावे, उन्हाच्या
कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळावे, बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची
कामे टाळावीत.