उस्मानाबाद.दि.29:- समृध्द
महाराष्ट्र जनकल्याण योजना सन 2016-17 व 2017-18 मध्ये उस्मानाबाद जिल्हयात
प्रभावीपणे राबविण्यात येत असून जिल्हयात विविध योजनेसाठी 7 हजार 561 अर्जप्राप्त
झाले आहेत, यापैकी 3 हजार 269 कामांना
तांत्रिक मंजूरी, 1 हजार 735 कामांना प्रशासकीय मंजूरी देवून जिल्हाभरात 632 कामे
चालू आहेत तर 245 कामे पूर्ण झाली आहेत, असे उस्मानाबाद जिल्हा समृध्द महाराष्ट्र
जनकल्याण अहवालात नमूद करण्यात आले आहे.
या योजनेमध्ये उस्मानाबाद
जिल्हयासाठी अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना 4 हजार 500 कामाचे उदिष्ट होते यासाठी
1 हजार 73 अर्ज प्राप्त झाले होती 214 कामांना तांत्रिक मंजूरी, 106 कामांना
प्रशासकीय मंजूरी पैकी 77 कामे चालू असून 29 कामे पूर्ण झाली आहेत.अमृतकुंड शेततळे
कामाचे उद्दिष्टय 6 हजार 600, 287 अर्ज प्राप्त, 177 कामांना तांत्रिक मंजूरी, 110
कामांना प्रशासकीय मंजूरी, 63 कामे चालू व 19 कामे पूर्ण झाली आहेत. भू-संजीवनी
व्हर्मी कंपोस्टींग 2 हजार 400 कामांचे उद्दिष्टय 417 अर्ज प्राप्त,226 कामांना
तांत्रिक मंजूरी, 187 कामांना प्रशासकीय मंजूरी व 7 कामे चालू. भू-संजीवनी नाडेप कंपोस्टींग 2 हजार 200 कामांचे उद्दिष्टय,
358 अर्ज प्राप्त, 192 कामांना तांत्रिक मंजूरी, 159 कामांना प्रशासकीय मंजूरी व
16 कामे चालु आहेत.
कल्पवृक्ष फळबाग लागवड योजने
अंतर्गत 2 हजार 700 कामांचे उद्दिष्टय, 107 अर्ज प्राप्त, 36 कामांना तांत्रिक
मंजूरी, 36 कामांना प्रशासकीय मंजूरी तर 11 कामे चालू आहेत. निर्मल शौचालय 2 हजार
111 कामांचे उद्दिष्टय, 2 हजार 129 अर्ज प्राप्त, 1 हजार 353 कामांना तांत्रिक
मंजूरी, 666 कामांना प्रशासकीय मंजूरी, 181 कामे चालू असून 70 कामे पूर्ण झालेली
आहेत. निर्मल शोष खड्डे 4 हजार कामाचे उदिष्ट, 1 हजार 559 अर्ज प्राप्त, 526
कामांना तांत्रिक मंजूरी व 37 कामांना प्रशासकीय मंजूरी देण्यात आली आहे.
समृध्द गाव तलाव योजनेंतर्गत 4 हजार 900 कामाचे उद्दिष्टय
असून जिल्हाभरातून 9 अर्ज प्राप्त झाले आहेत. अंकुर रोपवाटिका 43 लाख कामांचे उद्दिष्टय,
41 अर्ज प्राप्त, 17.00 तांत्रिक मान्यता, 13.00 प्रशासकीय मंजूरी, 7.00 कामे चालू
आहेत. तर नंदनवन वृक्ष लागवड 4.30 लाख कामाचे उदिष्ट, 33 अर्ज प्राप्त, 30.00
तांत्रिक मान्यता, 30 प्रशासकीय मंजूरी व 27 कामे चालू आहेत. समृध्द ग्राम
योजनेंतर्गत जिल्हयात 5 हजार कामाचे उद्दिष्टय असून 1 हजार 548 अर्ज प्राप्त, 498
कामांना तांत्रिक मंजूरी, 391 कामांना प्रशासकीय मंजूरी, 2 हजार 473 कामे चालू
आहेत व 127 कामे पूर्ण झालेली आहेत.
