Saturday, 13 April 2024

निवडणूक कामातील हलगर्जीपणा भोवला तुळजापूर येथील दोन कर्मचारी निलंबित

निवडणूक कामातील हलगर्जीपणा भोवला तुळजापूर येथील दोन कर्मचारी निलंबित धाराशिव दि 13 (जिमाका) लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा निवडणूक कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने 16 मार्च रोजी घोषित केला.त्याचदिवसापासून आदर्श आचारसंहिता लागू झाली. निवडणुकीचे कामकाज विहित मुदतीत होण्यासाठी विविध विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवा लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 चे कलम 159 मधील तरतूदीनुसार अधिग्रहित करण्यात आल्या.जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या आदेशाने या सेवा अधिग्रहित करण्यात आल्या असताना लोकसभा निवडणूक कामात हलगर्जीपणा केल्यामुळे जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांनी तुळजापूर तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथील वरिष्ठ लिपिक एस एस सोलणकर व तुळजापूर पंचायत समितीचे ग्रामसेवक डी.डी कांबळे यांना 12 एप्रिल रोजी निलंबित केले. श्री.सोलंकर व श्री कांबळे यांची नियुक्ती खानापूर येथील तपासणी नाक्यावर करण्यात आली होती. तुळजापूरचे उपविभागीय अधिकारी निलेश देशमुख यांनी 11 एप्रिल रोजी या तपासणी नाक्याला भेट दिली असता,भेटीदरम्यान हे दोन्ही कर्मचारी गैरहजर आढळले. याबाबतचा अहवाल श्री देशमुख यांनी जिल्हाधिकारी यांना सादर केला. निवडणुकीच्या राष्ट्रीय कर्तव्यात कसूर केल्याने हे दोन्ही कर्मचारी दोषी आढळले.दोषी आढळलेल्या या दोन्ही कर्मचाऱ्यांवर 12 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे निलंबित केले.