Friday, 20 January 2017

जिल्हा कारागृहात हाळदी-कुंकु व तीळगुळाचा कार्यक्रम संपन्न

           
उस्मानाबाद,दि.20:-येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बहुउद्देशिय सामाजिक संस्था यांच्या वतीने  गुरुवार  दि.19 जानेवारी रोजी मकर संक्रात सणानिमित्त कारागृहातील महिला बंद्यांसाठी हळदी-कुंकू व तीळगुळाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
यावेळी संस्थेच्या अध्यक्षा ॲड. ज्योती सुधाकर माळाळे (बेडेकर) यांनी  कारागृहातील सर्व महिला बंद्यांना मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा कारागृहाचे अधीक्षक एस.सी.भगुरे,ॲड.अरुणा गवई , कारागृहातील महिला कर्मचारी उपस्थित होत्या.असे कारागृह अधीक्षक यांनी कळविले आहे.

                                          ******