उस्मानाबाद.दि.7:-दिनांक 8 फेब्रुवारी 2017 रोजी दुपारी ठिक
1.30 वा. शि.म.रा.गे. शिंदे महाविद्यालय, परंडा येथे महाराष्ट्र डिजीधन जागृत्ती
अभियान कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी या महाविद्यालयामधील
एन.एस.एस. विभागप्रमुख व स्वयंसेवक यांना या अभियानाचे प्रशिक्षण द्यावयाचे आहे.
तसेच तालूक्यातील शंकरराव पाटील सिनिअर व ज्युनिअर महाविद्यालय, भूम व परंडा या
तालुक्यातील ज्या महाविद्यालयामध्ये एन.एस.एस. विभागप्रमुख व स्वयंसेवक ही या
प्रशिक्षणासाठी उपस्थित राहतील .
प्रशिक्षणासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात.प्रशिक्षणासाठी
मा. मुख्यमंत्री कार्यालय यांचे प्रतिनिधी मार्गदर्शनासाठी येणार आहेत. तरी कार्यशाळा
सुरळीतपणे पार पाडण्याची जवाबदारी आपली राहील, असे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत
नारनवरे यांनी कळविले आहे.