उस्मानाबाद. दि.8:- जिल्हयातील नागरिकांनी कॅशलेस व्यवहारावर भर दयावा, यासाठी जिल्हयातील
एनएसएनच्या युवकाकडून नागरिकांना कॅशलेसबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे.
जिल्हयातील
एनएसएनच्या युवकांच्या 24 संस्थांच्या प्रत्येकी दोन टीम तयार करण्यात येणार आसून,
यातील युवकांच्या माध्यमातून कॅशलेस व्यवहाराची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत
पोहचवली जाणार आहे.जी टिम अधिकाधिक लोकांपर्यंत त्यांना जिल्हाधिकाऱ्यांकडून सुवर्णपदक व राज्यशासनाचे प्रमाणपत्र देण्यात येणार
असल्याची माहिती परिविक्षाधिण जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.
मध्यवर्ती
प्रशासकीय इमारतीतील सभागृहात सोमवार दि.6 फेब्रुवारी 2017 रोजी आयोजीत 'डिजीटल
कॅश अवरनेस प्रोग्राम' या विषयावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आयुष
प्रसाद म्हणाले, राज्य शासनाने राज्यातील यवतमाळ व उस्मानाबाद या दोन जिल्हयाची
'डिजीटल कॅश अवरनेस प्रोग्राम' साठी निवड केली आहे. यवतमाळ येथील कामकाज सुरू झाले
आसून, उस्मानाबादेत ही दोन आठवडयांचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. नोटाबंदीनंतर
मोठया शहरामधील नागरिकांनी आता कॅशलेस व्यवहारावर मोठा भर दिला आहे. या
व्यवहारामध्ये ग्रामिन भागातील नागरिक मागे राहू नयेत, यासाठी 'डिजीटल कॅश अवरनेस
प्रोग्राम' हाती घेण्यात आला आहे. सर्वसामान्यांमध्ये कॅशलेस व्यवहारांबाबत असलेले
गैरसमज दूर करून त्यांच्यामध्ये जनजागृती केली जाणार आहे. यासाठी जिल्हयातील 24 संस्थांमधील एनएसएनच्या युवकांची मदत
घेण्यात येणार आहे. प्रत्येक संस्थेला 15 ते 20 युवकांची एक या प्रमाणे दोन टीम
तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तयार होणाऱ्या टीमला मंत्रालयातील तीन
मुख्य ट्रेनर प्रशिक्षण देणार आहेत. यात विविध बँकाची ऑनलाईन व्यवहार, शासनाचे भिम ॲप व इतर कॅशलेस
व्यवहारांबाबत माहिती देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे तयार होणाऱ्या टीमपैकी जी टीम सर्वाधिक लोकांपर्यंत पोहचेल त्या टीमला
जिल्हाधिकारी यांचे सुवर्णपदक मिळणार आहे. तर राज्य शासनाकडून प्रमाणपत्रही मिळणार
असल्याचे प्रसाद यावेळी म्हणाले.