Monday, 6 February 2017

हत्तीरोग दुरीकरणासाठी एकदिवसीय औषधोपचार मोहीम


उस्मानागाद.दि.6:- हत्तीरोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी दि.10 ते 14 फेब्रुवारी  या कालावधीत जिल्हयातील  संपूर्ण गावांमध्ये एकदिवसीय सामुदायिक औषधोपचार मोहीम राबविण्यात येणार आहे.
              या औषधोपचार मोहिमेंतर्गत जिल्हयातील सर्व गावांमध्ये दि.10 ते 14 फेब्रूवारी  या कालावधीत ग्रामीण व शहरी भागात  हत्तीरोग प्रतिबंधक डी. ई. सी. व अल्बेडझॅल  गोळया खाऊ घालण्याकरीता घरोघरी आरोग्य  विभागाचे कर्मचारी, स्वयंसेवक येणार आहेत.

              तरी त्यांच्या समक्षच दोन वर्षाखालील बालके, गरोदर माता व गंभीर अजारी रुग्ण वगळून सर्वानी डी. ई. सी. व अल्बेडझॅल  गोळयाचे सेवन करून हत्तीरोग दुरीकरण मोहिमेस सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी श्री. एन.एन.बोरकर यांनी केले आहे.