उस्मानाबाद,दि.7:- जिल्हा परिषद, पंचायत
समिती सार्वत्रिक निवडणूक 2017 च्या अनुषंगाने मतदार जनजागृत्ती कक्षाच्या प्रमुख
श्रीमती भोसले एस.एस.व सहकारी सदस्य यांच्या पुढाकाराने दि.5 फेबु्वारी 2017 रोजी
निवडणूक अधिकारी श्री.आरविंद लाटकर यांनी मतदान केंद्रावर नियुक्त केलेले अधिकारी
व कर्मचारी यांना मतदानाचा संकल्प करण्याची प्रतिज्ञा दिली.यावेळी सहाय्यक निवडणूक
निर्णय अधिकारी शिरीष बनसोडे, गटविकास अधिकारी चकोर, नायब तहसिलदार श्री रामदासी आदी यावेळी उपस्थित होते.