उस्मानाबाद.दि.7:- जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2017 मध्ये
पहिला टप्पा दि.14 फेब्रुवारी 2017 रात्री बारा वाजेपासून मतदान समाप्तीपर्यंत
जाहीर प्रचार करण्याकरिता तसेच जनमत चाचणी आणि मतदानोत्तर चाचणी घेणे व त्याचे
निष्कर्ष प्रसिध्द करण्यावर बंदी राहील असे आदेशित करण्यात आले आहे.
जिल्हयातील वर्तमानपत्रे, नियतकालिके, माहितीपत्रके, फलक किंवा तत्सम प्रसिध्दी, खाजगी किंवा सरकारी रेडिओ,
टि.व्ही केबल, डिटीएच, प्रादेशिक किंवा स्थानिक केबल टि.व्ही. सॅटेलाईट, एसएमएस,
इंटरनेट, फेसबूक आणि तत्सम उपलब्ध सोशल मिडीया यांच्याद्वारे जनमत चाचणी व
मतदानोत्तर चाचणी यांचे कुठलेही निष्कर्ष प्रसिध्द करता येणार नाहीत, असेही आदेशित करण्यात आलेले आहे असे आचार आचारसंहिता
कक्ष प्रमुख जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2017
यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.