Wednesday, 8 February 2017

मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या परिसरातील टपरीधारक व रिक्षाचालकांनी घेतली स्वच्छतेची प्रतिज्ञा





      उस्मानाबाद,दि.8:-काही दिवसांपूर्वी  मध्यवर्ती प्रशासकीय इमारत परिसरात स्वच्छतेची मोहिम हाती घेऊन प्रशासकीय इमारत परिसरातील  स्वच्छता करून अधिकारी व कर्मचारी यांनी मिळून स्वच्छतेचा आदर्श घालून दिला होता. आता या परिसरातील टपरीधारक आणि रिक्षाचालकांनी  स्वच्छतेकरिता  नियमित श्रमदानाची  प्रतिज्ञाच  केली आहे.
       जिल्हा माहिती  कार्यालय, उस्मानाबाद यांच्या पुढाकाराने त्यांच्या आवाहनास  प्रतिसाद म्हणून  या परिसारातील  प्रत्येक टपरीधारक व रिक्षाचालक  यांनी  हिरीरीने  सहभाग  नोंदवून  या परिसराची  स्वच्छता  केली.
       या स्वच्छता मोहिमेत प्रामुख्याने जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप,कृषी विभागाचे प्रशासन अधिकारी श्री.गणेश गोरे, श्री. भिमा पडवळ, श्री. प्रदीप लष्करे, श्री.शशिकांत पवार, श्री.खोत या शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांसह अनिकेत जाधव, रिजवान शेख, मोहमंद तांबोळी, अभिजित जाधव, समीर तांबोळी, दीपक जानरारव, विलास साबळे, नितीन कांबळे, पांडूरंग शिंदे, अण्णा सोनटक्के, शेख जाफर, शेख इ्स्माईल, शेरअल्ली पठाण, वजीरभाई, दाजी देशपांडे, शरद राठोड, अविनाश फडनीस, सचिन सोनटक्के, अमोल कांबळे, महाराज चहावाला  या सर्व टपरीधारक व रिक्षाचालकांनी उत्स्फूर्तपणे स्वच्छतेसाठी सहभाग नोंदविला तसेच यापुढेही आम्ही मध्यवर्ती प्रशासकीय इमारत व इमारतीचा परिसर स्वच्छ ठेवण्याचा आम्ही प्रयत्न तर करूच परंतु नागरिकांनाही स्वच्छता ठेवण्याचे आवाहन व प्रबोधन करू असा निश्चयच केला.