उस्मानाबाद,दि.27 :- मराठी भाषेचा गौरव म्हणून जेष्ठ कवी वि. वा. शिरवाडकर
यांचा जन्मदिन मराठी भाषा दिन म्हणून साजरा करावा या शासन निर्णयाच्या अनुषंगाने
येथील जिल्हा माहिती कार्यालयात मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला.
कार्यालयातील सर्व
कामकाज मराठीतून करावे या शासन निर्णयाच्या अनुषंगाने संगणकावरील व
मोबाईलवरील मराठी टायपिंग या विषयी लघु कार्यशाळा
घेण्यात आली.
याप्रसंगी जिल्हा माहिती अधिकारी श्री मनोज शिवाजी
सानप यांनी मार्गदर्शन केले. यावेळी
कार्यालयातील कर्मचारी दिलीप वाठोरे,सिद्धेश्वर कोंपले,अनिल वाघमारे, शशिकांत पवार
अनुलोम चे सदस्य
सचिन कोळी, विकास कांबळे पठाण,सचिन
मोरे,आशिष लगाडे आदी उपस्थित होते.