उस्मानाबाद,दि.28 :- पोलीस दलाचे काम
हे खूप ताण-तणावाचे काम आहे, कामाचा भार सांभाळून आयएसओ मानांकन मिळवणे हि खूप मोठी
अभिमानाची गोष्ट आहे असे गौरवोदगार औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भांबरे यांनी यावेळी काढले.
येथील पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात आयएसओ प्रमाणपत्र प्रदान सोहळ्यानिमित्त ते
बोलत होते.उस्मानाबाद मध्ये हि गोष्ट घडणे हि खूप मोठी बाब आहे, दैनंदिन ताणतणाव
असताना संघटितपणे काम करणे हि खूप कौतुकास्पद गोष्ट आहे. एका ध्येयासाठी सर्वाना प्ररीत करून ध्येय साध्य केले, त्याबद्दल उस्मानाबाद
जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांचे त्यांनी अभिनंदन केले.
जनतेला उत्तम सेवा
देण्यासाठी आपण काही मापदंड आखले पाहिजेत, त्यानुसार प्रयत्न करून यश मिळवावे आणि ह्या यशाला आयएसओ मानांकन मिळणे हे
उत्साहवर्धक आहे. सकारात्मक सेवाभाव मनावर बिंबवून ते आचरणातआणावे आणि यश मिळवावे
.स्वतःला तेवत ठेवणे आणि टिकवणे आवश्यक आहे, असा विश्वास त्यांनी यावेळी कार्माचार्याप्रती व्यक्त केला.
या वेळी जिल्हाधिकारी
राधाकृष्ण गमे यांनी उस्मानाबाद पोलीस दलासाठी हा सुवर्ण क्षण असून या आनंदाबरोबरच
आपली जबाबदारी देखील वाढली आहे असे बोलून
सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच अभिनंदन केलं.
याप्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर,मोतीचंद राठोड(उस्मानाबाद) सुनिल नेवसे ( उस्मानाबाद शहर), संभाजी
बापूराव पवार (उस्मानाबाद ग्रामीण), श्री .गाते (आनंद नगर), उत्तम जाधव(बेंबळी ), राजेंद्र बोकडे (तुळजापूर ), मिरकल (तामलवाडी), पी.सी
सूर्यवंशी (नळदुर्ग), माधव गुंडले (उमरगा), एम.आय शेख (मुरूम), एस ए भंडारे
(लोहारा), सूर्यवंशी (भूम), डंबाळे
(वाशी), मोताळे (परंडा), साबळे
(अंभी), डी.एस
बोरीगड्डे (कळंब), के एस
महानभाव (ढोकी), संजीवन मिरकले (शिरढोण ), राजेंद्र बनसोडे (येरमाळा) व त्या त्या
पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी व
कर्मचारी यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व
आभार प्रदर्शन पी.आय. अनिल सूर्यवंशी यांनी केले.