हातलाई देवी डोंगरावर वृक्षारोपण कार्यक्रम
उस्मानाबाद,दि.10:- राज्याचे परिवहन, खारभूमी विकास
मंत्री तथा पालकमंत्री श्री.दिवाकर रावते आणि सहपालकमंत्री महादेव जानकर यांनी
हातलाई देवी डोंगरावर वृक्ष लागवड केली. यावेळी आमदार ज्ञानराज चौगुले,
जिल्हाधिकारी राधाकष्ण गमे, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते, अतिरिक्त मुख्य
कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, विभागीय वन अधिकारी राजेश्वर सातेलीकर, उपायुक्त
पशुसंवर्धन श्री. भोसले, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी श्री. आघाव, सामाजिक वनीकरणचे
सहाय्यक संचालक श्री. मायकलवार, परिवहन विभाग नियंत्रक श्री. शेळके, तहसिलदार
सुजित नरहरे, अनिल खोचरे आदिंची उपस्थिती होती.