स्व. वसंतराव नाईक विकास महामंडळाच्या वतीने विविध योजना
उस्मानाबाद,दि.10:- स्व. वसंतराव नाईक विमुक्त जाती व
भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत 24 टक्के बीजभांडवल योजनेंतर्गत विमुक्त जाती व
भटक्या समाजातील सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांकरीता वितरीत करण्यात येणा-या सन
2017-18 या वर्षाकरीता योजनेचे उदिष्ट 100 कर्ज प्रस्ताव इतके आहे. जास्तीत जास्त
गरजू उमेदवारांनी यासाठी दि. 31 जुलै 2017 पर्यंत अर्ज जिल्हा कार्यालयाकडे दाखल
करावे या अर्जासोबत जातीचा दाखला, उत्पन्न दाखला, रहिवाशी दाखला, रेशनींग कार्ड,
मतदान कार्ड, आधार कार्ड, व्यवसायाचे कोटेशन, ना हरकत प्रमाणपत्र, ग्रामपंचायत
किंवा नगर परिषदेचा जागेचा पुरावा, 7/12, 8 अ, भाडेपटटा/हमीपत्र, प्रकल्प अहवाल, 3
फोटो इत्यादी गरजेनुसार कागदपत्रांची पुर्तता करुन महामंडळाचे जिल्हा कार्यालय डॉ.
बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत जवळ, उस्मानाबाद
येथे दाखल करावे असे जिल्हा व्यवस्थापक श्रीमती एस.पी. काळे यांनी कळविले आहे.