Saturday, 15 July 2017

"अवघा महाराष्ट्र फुटबॉलमय" प्रशिक्षण शिबीरांचा समारोप


उस्मानाबाद.दि.15:- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय उस्मानाबाद द्वारे आयोजित "अवघा महाराष्ट्र फूटबॉलमय" प्रशिक्षण शिबिराचा समारोप श्री. तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम येथे करण्यात आला.
यावेळी पोलीस अधीक्षक श्री. पंकज देशमुख, जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. संजय महाडिक, क्रीडा अधिकारी, अशोक बनसोडे, मदनलाल गायकवाड, क्रीडा मार्गदर्शक  श्री.जरार कुरेशी, गणेश पवार, व कार्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.
या प्रशिक्षण शिबिराचे गेल्या तीन दिवसापासून रोज सकाळी व संध्याकाळी श्री. तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम उस्मानाबाद येथे आयोजित करण्यात आलेले होते. उस्मनाबाद जिल्हयातील आठही  तालुक्यातील क्रीडा शिक्षकांनी मोठया प्रमाणात यात सहभाग नोंदविला होता.
या  प्रशिक्षण शिबिराकरिता  राज्य्‍ फुटबॉल क्रीडा मार्गदर्शक श्री. एम.झेड.शेख यांनी सर्व क्रीडा शिक्षकांना फूटबॉल या खेळाचे कौशल्य प्रात्यक्षिकाचे प्रशिक्षण दिले. सर्व सहभागी शिक्षकांना फूटबॉल खेळ कसा खेळावा व फूटबॉल् खेळाचा सराव  शाळेतील खेळाडूंकडून कसा करून घ्यावा याबाबतही क्रीडा मार्गदर्शकाकडून प्रशिक्षण देण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन हे कार्यालयाचे राज्य्‍ क्रीडा मार्गदर्शक श्री. गणेश पवार यांनी केले.