उस्मानाबाद.दि.28:-
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने वाशी येथे उभारण्यात आलेल्या नुतन
बसस्थानकाचे उदघाटन रविवार दि. 30 एप्रिल 2017 रोजी सायंकाळी 5 वाजुन 15 मिनिटांनी
राज्याचे परिवहन, खारभूमी विकास मंत्री तथा पालकमंत्री श्री.दिवाकर
रावते यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य मार्ग
परिवहन महामंडळाचे उस्मानाबाद विभाग नियंत्रक यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले
आहे.
खासदार श्री. रविंद्र गायकवाड यांच्या
अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार
श्री. मधुकरराव चव्हाण, आमदार श्री. ज्ञानराज चौगुले, आमदार श्री. सुजितसिंह
ठाकूर, आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार राहुल मोटे, आमदार तानाजी सावंत,
जिल्हाधिकारी श्री.राधाकृष्ण गमे, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते, वाशीच्या
नगराध्यक्षा श्रीमती. प्रतिभा सिंगणापूरे आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे,तरी
या कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे राज्य परिवहन
उस्मानाबादचे विभाग नियंत्रक यांनी कळविले आहे.