Saturday, 29 April 2017

जिल्हास्तर क्रीडा पुरस्कार जाहीर


उस्मानाबाद, दि.29:-  जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा पुरस्कार समितीच्या वतीने जिल्हास्तर क्रीडा पुरस्कार 2015-16  व जिल्हास्तर युवा पुरस्कार सन 2014-15 व 2015-16 यावर्षीचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
            जिल्हास्तरीय क्रीडा पुरस्कार सन 2015-16 चे मानकरी पुढीलप्रमाणे आहेत, गुणवंत खेळाडू पुरुष गटातून(खो-खो) श्री.ढोबळे नितीन वैजिनाथ, गुणवंत खेळाडु महिला गटातून(आटया-पाटया) कु.शिन्दे गंगासागर उत्तम,गुण्वंत क्रीडा मार्गदर्शक(आटया-पाटया) श्री.शिन्दे अनिल अभिमान, गुणवंत क्रीडा कार्यकर्ता,संघटक (हँडबॉल,कब्बडी) श्री.घाडगे प्रशांत विश्वनाथ आदींना तर जिल्हास्तरीय युवा क्रीडा पुरस्कारार्थी सन 2014-15 चे योगेश निवृत्ती थोरबोले,गोजवाडा ता.कळंब,सन 2015-16 चा सुहास बापूराव कांदे, सापनाई,ता.कळंब तर सन 2015-16 जिल्हास्तरीय युवा पुरस्कारार्थी संस्था संत गाडगेबाबा स्वयंसेवी संस्था देविसिंगा (तुळ),तुळजापूर ही आहे.

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 57 व्या वर्धापन दिनी समारंभ कार्यक्रमात या पुरस्कारांचे परिवहन, खारभूमी विकास मंत्री तथा पालकमंत्री दिवाकर रावते, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा पुरस्कार समिती उस्मानाबाद यांच्या हस्ते  वितरण करण्यात येणार आहे, असे जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. संजय महाडिक यांनी कळविले आहे.